Saam Tv
माटुंगा स्टेशन जवळच तुम्हाला अनेक फेमस आणि ऐतिहासिक काळातील हॉटेल्स सापडतील.
तुम्ही कमी किमतीत विविध Street Foods चा कमी पैशात आनंद घेऊ शकता. चला तर जाणून घेऊया माटुंग्यातील प्रसिद्ध हॉटेल्सची नावे आणि पदार्थ.
तुम्हाला साऊथ इंडियन पदार्थांची चव घ्यायची असेल तर तुम्ही शारदा भवन या हॉटेलला भेट देऊ शकता.
तुम्हाला कमी किमतीत गरमा गरम चवदार पुरी भाजी खायची असेल तर सातकर हॉटेल बेस्ट आहे.
अननसाचा शिरा, म्हैसूर सादा डोसा असे अनेक पदार्थ तुम्ही माटुंगातील भाऊदाजी रोडवर खाऊ शकता.
तुम्ही फिल्टर कॉफी प्रेमी असाल तर आर्य भवन हा उत्तम पर्याय आहे.
डीपीस हॉटेलमध्ये डोसा, पाव भाजी, इडली, पाणी पुरी, मिसळ पाव असे सगळे पदार्थ एकदम स्वस्त आणि चविष्ठ मिळतात.
तुम्हाला साऊथ इंडियन स्ट्रीट फूड्सचा आस्वाद घ्यायचा असेल तर तेलंग रोडजवळ बालाजी स्टॉलला भेट द्या.
रुईया कॉलेजच्या जवळच असलेलं मणीस कॅफे हे अस्सल मणीस लंच होम साउथ इंडियन फुटसाठी प्रसिद्ध आहे.
South Indian Foods साठी सगळ्यात जुनं आणि प्रसिद्ध हॉटेल म्हणजे रामाश्रय हॉटेल.