
संजय गडदे, साम टीव्ही
मुंबईत पु्न्हा एकदा मराठी भाषेच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापलं आहे. राज ठाकरेंच्या मनसेने पुन्हा एकदा मराठी भाषेसाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मराठी भाषेवरील भूमिकेला उत्तर भारतीय विकास सेनेने आव्हान दिलं आहे. उत्तर भारतीय विकास सेनेने राज ठाकरेंच्या विरोधात थेट सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. त्याचबरोबर राज ठाकरे हिंदूविरोधी, नास्तिक असून त्यांनी सुपारी घेतली आहे, असा आरोप करत उत्तर भारतीय विकास सेनेच्या सुनील शुक्लांनी अरेतुरेच्या भाषेचा वापर केला आहे.
निवडणूक आयोगाने मनसे पक्षाची मान्यता रद्द करावी, अशी मागणी उत्तर भारतीय विकास सेना प्रमुख सुनील शुक्ला यांनी केली. सुनील शुक्ला यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या विरोधात सुप्रिम कोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यानंतर आज सुनील शुक्ला यांनी मनसेवर तोफ डागली आहे. सुनील शुक्ला म्हणाले, 'राज ठाकरे हे हिंदू विरोधी आहेत. त्यांनी नेहमीच हिंदू विरोधी भूमिका घेतली आहे. त्यांनी ब्राह्मण, क्षत्रियांना मारहाण केली. मात्र कधी मु्स्लिमांना मारहाण केली नाही. राज ठाकरे हे नास्तिक आहेत'.
'राज ठाकरेंनी गंगामातेचा अपमान केलाय. त्यांनी महादेवाचा अपमान केला. एवढेच नाही तर त्यांनी हर हर महादेव बोलणाऱ्या मावळ्यांचा अपमान केलाय. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला. कुंभमेळ्यासाठी महाराष्ट्रातून कोटी लोक गेले. त्यांचा तिकडे सन्मान झाला. त्यामुळे हिंदू म्हणून लोक येऊ लागल्याने त्यांनी मराठी भाषेचे राजकारण केले. राज ठाकरे यांचा नारा हा गजवा ए हिंद की करो तैयारी, आ रहा है सुपारीधारी, असं शुक्ला म्हणाले.
'उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे देखील मुस्लिमधार्जीनी आहेत. एकनाथ शिंदे यांनी आपल्या मुलाला खासदार म्हणून जिंकून आणण्यासाठी तेथील मुस्लिम समाजाला पैसे वाटले, असा आरोप सुनील शुक्ला यांनी म्हटलं .
मनसेच्या संदीप देशपांडे यांच्या ट्वीटवर भाष्य करताना शुक्ला यांनी म्हटलं की,'मी संदीप देशपांडे यांना ओळखत नाही. मी धमक्यांना घाबरत नाही'.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.