honor killing in Jalgaon, Maharashtra Saam TV News
महाराष्ट्र

Crime : भरलग्नात घुसून बापाने मुलीला धाडधाड गोळ्या घातल्या, ऑनर किलिंगने महाराष्ट्र हादरला

honor killing in Jalgaon, Maharashtra : जळगावच्या चोपडामध्ये ऑनर किलिंगची धक्कादायक घटना घडली आहे. वडिलांनी भरलग्नात प्रेमविवाह केलेल्या मुलीवर गोळ्या झाडून ठार केलं. पोलिस तपास सुरू आहे.

Namdeo Kumbhar

संजय महाजन, जळगाव प्रतिनिधी

Father Kills Daughter At Wedding : जळगावमधील ऑनर किलिंगच्या घटनेनं महाराष्ट्र हादरला आहे. मुलीने प्रेमविवाह केलेला बापाला रूचले नाही. हाच राग मनात धरून बापाने भरलग्नात मुलीवर आणि जावायावर धाडधाड गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात मुलीचा रक्ताच्या थारोळ्यात पडून मृत्यू झाला. ही घटना जळगाव जिल्ह्याच्या चोपडामध्ये घडली. या धक्कादायक घटनेनंतर लग्नात आलेल्या वऱ्हाडींनी गोळीबार करणाऱ्या बापावर हल्ला करत त्यालाही गंभीर जखमी केलं आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास करत आहेत.

किरण अर्जुन मंगले असे गोळीबार करणाऱ्या पित्याचे नाव आहे. ते सीआरपीएफचे सेवानिवृत्त अधिकारी असल्याची माहिती मिळाली आहे. या हल्ल्यात मृत्यू झालेल्या मुलीचे नाव तृप्ती अविनाश वाघ असे आहे. तर अविनाश ईश्वर वाघ हा गोळीबारात गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी घटनेतील पिस्तूल जप्त केलं आहे.

दोन वर्षांपूर्वी तृप्ती आणि अविनाश यांचा प्रेमविवाह झाला होता. हा प्रेमविवाह किरण मंगले यांनी कधीच मान्य केला नाही. अविनाशच्या बहिणीच्या हळदीच्या कार्यक्रमानिमित्त हे दांपत्य चोपडा येथे आले होते. याची कानकून किरण मंगले याला लागली. त्याने हळदीच्या ठिकाणी येऊन तृप्ती आणि अविनाशवर तीन राउंड गोळीबार केला. यात तृप्ती जागीच ठार झाली, तर अविनाशच्या पाठीत आणि हाताला गोळ्या लागल्या. अविनाश याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, “या घटनेचा तपास सुरू आहे. आरोपी किरण मंगले यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल,” असे जळगावचे पोलिस अधीक्षकांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना कर्ज नाही; अजित पवारांचं आश्वासन हवेत विरलं, कारण काय?

Maharashtra Live News Update: आज राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र; तब्बल १९ वर्षानंतर एकत्र

Saturday Horoscope : मोठी स्वप्न पूर्ण होतील, दिवस चांगला जाणार; ५ राशींच्या लोकांचं नशीब उजळणार

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

SCROLL FOR NEXT