India vs Pakistan : युद्धासाठी पाकड्यांना चीन्यांची फूस, शस्त्रांचा पुरवठा | VIDEO

China is supplying weapons to Pakistan : पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढला असताना चीनकडून पाकिस्तानला शस्त्रांचा पुरवठा सुरू असल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. भारताविरोधात चीनची खेळी उघड.
China supplying weapons to Pakistan
China supplying weapons to PakistanSaam TV News
Published On

China supplying weapons to Pakistan : पहलगाम हल्ल्यासाठी पाकड्यांना फूस लावणारा भारताचा शेजारीच असल्याचं समोर आलंय.. ते नेमकं कसं? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झालाय.. तर पाकडे युद्धाच्या वल्गना करताना दिसत आहेत. मात्र पाकड्यांच्या वल्गनामागचं आंतरराष्ट्रीय कनेक्शन समोर आलंय.. पडद्यामागे पाकिस्तान नाही तर चीनच भारताविरोधात युद्धासाठी सूत्रं हलवत असल्याचं समोर आलंय... चीनने पाकिस्तानला शस्त्रांचा पुरवठा करत असल्याचं उघड झालंय..

चीनकडून पाकड्यांना शस्त्रांचा पुरवठा

पाकिस्तानचा 81 टक्के शस्त्रपुरवठा चीनकडून

चीनकडून पाकला 100 पेक्षा जास्त PL-15 मिसाईलचा पुरवठा

PL-15 लांब पल्ल्याचं मिसाईल

हवेतून हवेत मारा करणारं शक्तीशाली क्षेपणास्त्र

रेथियॉन एआयएम-120 मीडियम-रेंज मिसाईल

चीनने पाकिस्तानला युद्धसाहित्य पुरवण्यामागे नेमकी काय कारणं आहेत? पाहूयात...

पाकड्यांना चीनींची फूस का?

भारत-अमेरिकेतील मजबूत व्यापारी संबंध

चीनच्या शस्त्र निर्यातीपैकी 63 टक्के निर्यात पाकिस्तानसोबत

ग्वादर बंदराला जोडणाऱ्या इकॉनॉमिक कॉरिडॉरसाठी पाकची मदत

भारतावर नियंत्रण ठेवण्यासाठी चीनला पाकची मदत

China supplying weapons to Pakistan
US India Relations : पाकविरोधात अमेरिकेची डबल ढोलकी?|VIDEO

एवढंच नाही तर चीनी ड्रॅगन पाकड्यांना शस्त्र पुरवून भारतावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत आहेत.. त्यामुळेच पाकड्यांचे लष्कर प्रमुख असिफ मुनीर वळवळत असल्याचं चित्र आहे. भारताच्या आत्म्यावर हल्ला करणाऱ्या दहशतवादी पाकड्यांना चीनी ड्रॅगन मदत करत असेल तर भारतानंही आता चीनची सर्वाथानं कोंडी करण्याची गरज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com