US backtracks on India support : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पहलगाम हल्ल्याचा कठोर शब्दांत निषेध केलाय. पण भारताला पाकिस्तानी दहशतवाद्यांविरोधात साथ देण्याचं आश्वासन देणाऱ्या ट्रम्प यांनी ऐनवेळी पलटी मारलीय. भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झालाय.. त्यातच भारताला पाकिस्तानी दहशतवाद्यांविरोधात साथ देण्याचं आश्वासन देणाऱ्या अमेरिकेने मात्र ऐनवेळी सपशेल पलटी मारलीय.
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने पाकिस्तानी दहशतवाद्यांचा निषेध करत भारताला पाठींबा दिला होता.. त्यामुळे भारताचं मनोबल चांगलंच वाढलं होतं.. मात्र आता अमेरिकेने आपल्या भुमिकेवरुन यु-टर्न घेतलाय.. अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेच्या प्रमुख तुलसी गबार्ड यांनी नेमकं काय म्हटलं होतं? पाहूयात...
तुलसी गबार्ड काय म्हणाल्या?
पहलगामच्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर आम्ही भारताच्या पाठीशी आहोत
पहलगाममध्ये 26 हिंदूंना लक्ष्य करून मारण्यात आलं, याबद्दल आम्ही अतिशय व्यथित आहोत
आमच्या प्रार्थना आणि संवेदना पीडित कुटुंबासोबत आहेत
भारताला या हल्ल्याच्या दोषींना पकडण्यात आम्ही पाठिंबा देऊ
भारत पाकिस्तान युद्धाच्या प्रत्येक वेळी अमेरिका भारताची गळचेपी करण्याचं धोरण आखताना दिसला.. एवढंच नाही तर 1971 मध्ये भारताविरोधात पाकड्यांना मदत करण्यासाठी अमेरिकेने युद्धनौकाही पाठवली होती.. मात्र भारताने अमेरिकेला न जुमानता पाकड्यांना पराभवाची धूळ चारली... आताही भारतासारख्या प्रगत देशाला युद्धाच्या खाईत लोटून स्वतःची पोळी भाजून घेण्याचा अमेरिकेचा डाव असल्याचं दिसतंय... एवढंच नाही तर याबाबत पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्याने पाकिस्तानमधील दहशतवादामागे अमेरिका असल्याचं मान्य केलं होतं..
रशिया युक्रेन युद्ध असो वा इस्त्राईल पॅलेस्टाईन युद्ध प्रत्येक युद्धावेळी भूमिका घेण्याचा दावा करणारी अमेरिका ऐनवेळी पलटी मारते. आताही पाकड्यांविरोधात बोलणाऱ्या अमेरिकेची भूमिका बदललीय. त्यामुळे सरड्याप्रमाणे रंग बदलणाऱ्या अमेरिकेवर किती विश्वास ठेवायचा? याचा विचार भारताने करण्याची गरज आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.