Eknath Shinde Saam TV Marathi
महाराष्ट्र

शिंदेसेनेच्या नगरसेवकाला बेदम मारहाण; लोखंडी रॉडने दोघांनी केला हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ

Shiv Sena Shinde Group News : यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी नगरपरिषदेत शिंदे सेनेचे नगरसेवक पवन चाफले यांच्यावर लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला करण्यात आला. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Namdeo Kumbhar

संजय राठोड | यवतमाळ प्रतिनिधी | साम टीव्ही मराठी

Shinde Sena corporator attacked in Arni : यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी नगरपरिषदेमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. किरकोळ कारणावरून शिवसेना (शिंदे गट) नगरसेवकावर पालिका इमारतीतच लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात नगरसेवक गंभीर जखमी झाले असून या घटनेमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. पवन चाफले असे मारहाण झालेल्या शिंदे सेनेच्या नगरसेवकाचे नाव आहे.

उपनगराध्यक्षांच्या केबिनमध्येच राडा

मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे सेनेचे नगरसेवक पवन चाफले हे आर्णी पालिकेच्या उपनगराध्यक्षांच्या केबिनमध्ये बसलेले होते. दरम्यान, दोन जण अचानक केबिनमध्ये घुसले आणि त्यांनी केवळ शुल्लक कारणावरून नगरसेवक चाफले यांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. हल्लेखोरांनी लोखंडी रॉडने केलेल्या हल्ल्यात पवन चाफले यांच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे.

रात्री उशिरा गुन्हा दाखल

या घटनेनंतर रात्री उशिरा आर्णी पोलीस ठाण्यात दोन्ही हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी नगरसेवकाचा वैद्यकीय अहवाल (Medical Report) आल्यानंतर आरोपींविरोधात कलमांमध्ये वाढ केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. चाफले यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर आर्णीतील शिवसैनिक संतप्त झाले आहेत. हल्लेखोराला अटक करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.

पालिकेत सीसीटीव्ही नाही!

आर्णी पालिकेत हा एवढा मोठा प्रकार घडला, तिथे सीसीटीव्ही (CCTV) कॅमेरेच कार्यरत नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या दोन हल्लेखोरांपैकी एकाची ओळख पटली असून दुसरा आरोपी अद्याप अज्ञात आहे. पोलीस सध्या आरोपींचा शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Supreme Court : केंद्र सरकारचा मोठा निर्णय! महाराष्ट्रासह ८ राज्यातील उच्च न्यायालयांना नवे मुख्य न्यायाधीश; पाहा कोणाची कुठे नियुक्ती

Best Teas For Weight Loss: वजन कमी करण्यासाठी 5 चहा ठरतील फायदेशीर; जाणून घ्या कोणते आहेत?

Ukadiche Modak Recipe : उकडीचे मोदक फाटतात? 'ही' ट्रिक वापरा, प्रत्येक मोदक बनेल परफेक्ट

Maharashtra News Live Update: कृष्णराज महाडिक नेमके काँग्रेसचे की भाजपचे?

कॅबिनेट मंत्र्यांचं निधन, मध्यरात्री आला हार्ट अटॅक, राजकीय वर्तुळात शोकाकूल वातावरण

SCROLL FOR NEXT