महायुतीतील अंतर्गत कुरघोडीचं राजकारण आणि ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चांमुळे कोंडीत सापडलेल्या एकनाथ शिंदेंनी नवा डाव टाकलाय... शिंदेंनी थेट अमित शाहांची भेट घेत ठाकरेंना रोखण्यासाठी सीएमपदाचा प्रस्ताव दिल्याचा गौप्यस्फोट राऊतांनी केलाय... यावेळी अमित शाहांनी मुख्यमंत्री हा भाजपचाच असेल, असं ठामपणे शिंदेंना सांगितलं...
मात्र मुख्यमंत्रिपद मिळणार असेल तर शिंदे गट भाजपमध्ये विलिन करण्याची तयारीही शिंदेंनी दाखवल्याचा दावा राऊतांनी केलाय.. तर भास्कर जाधवांनी राऊतांचे दावे खरे होतात, असं म्हणत शिंदेंवर अप्रत्यक्ष निशाणा साधलाय... मात्र सामंतांनी राऊतांचं वक्तव्य फेक नॅरेटिव्ह असल्याचं म्हटलंय..
खरंतर महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रिपदासाठी जोरदार फिल्डिंग लावल्याची चर्चा होती... मात्र भाजपनं मोठं यश मिळवलं. आणि आपसूकच देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ घातली गेली... त्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदेंचा प्रभाव कमी होण्यास सुरुवात झाली... मात्र आता दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत असल्याने शिंदे आणखीच अस्वस्थ असल्याचं म्हटलं जातंय... मात्र मुख्यमंत्रिपद शिंदेंसाठी इतकं महत्वाचं का आहे? पाहूयात....
मुख्यमंत्रिपदाच्या माध्यमातून शिवसैनिकांवर प्रभाव टाकणं शक्य
उपमुख्यमंत्रिपद मिळाल्यानंतर संघटनेवरची ढिली होत असलेली पकड
शिंदेंच्या चेहऱ्यामुळे भाजपापासून दुरावलेला मराठा मतदार शिंदेंकडे वळण्याची शक्यता
सत्तेच्या माध्यमातून ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांना आपल्याकडे वळवण्याची रणनीती
एकनाथ शिंदेंनी दिल्ली दौऱ्यात राजनाथ सिंह, नितीन गडकरी, अमित शाह आणि अजित डोवाल यांची भेट घेतलीय. त्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी राज्याच्या राजकारणात खांदेपालट होऊन शिंदेंच्या गळ्यात सीएमपदाची माळ पडणार का? की राज्याचं राजकारण आणखी नव्या वळणावर जाणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय..
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.