Pune Shivneri Bus : दारु पिऊन शिवनेरी चालवत होता, प्रवाशांनी दारुड्या चालकाला रंगेहाथ पकडले अन् पुढे...

Pune News : पुण्यातील स्वारगेटहून ठाणे येथे निघालेल्या एका शिवनेरी बसचा चालक बस चालवत असताना दारु पित होता. बसमधील प्रवाशांनी मद्यधुंद चालकाला पकडून पोलिसांच्या हवाली केले.
Pune Shivneri Bus
Pune Shivneri Busx
Published On

पुण्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. पुण्यात शिवनेरी बसचालक हा दारु पिऊन बस चालवत होता. बसमधील प्रवाशांनी दारु पिताना मद्यधुंद चालकाला रंगेहाथ पकडले. त्यानंतर प्रवाशांनी बस मध्येच रस्त्यात थांबवली आणि पोलिसांना संपर्क केला. पोलिसांनी तात्काळ बस चालकाला ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना आज (११ जुलै) सायंकाळी ६ वाजता घडली आहे. स्वारगेटवरुन ठाणे येथे जाणाऱ्या शिवनेरी बसवरील बसचालक हा दारु पित होता. स्वारगेट येथे असताना प्रवाशांनी दारु पिताना त्याला पाहिले होते. पण तो काहीतरी वेगळं पित असल्याचे समजून प्रवाशांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

Pune Shivneri Bus
Pune Shocking : पुण्यात प्रेमीयुगुलाने जीवन संपवले, खडकवासला धरणाजवळ आढळले दोघांचे मृतदेह; परिसरात खळबळ

थोड्याच वेळात शिवनेरी बस स्वारगेट बस स्थानकाकडून ठाण्याच्या दिशेने निघाली. तेव्हा बसचालकाने दारु पिण्यास सुरुवात केली. त्यानंतर नळ स्टॉप परिसरात चालकाचा दारु पिताना प्रवाशांनी रंगेहाथ पकडले. सर्व प्रवाशांनी बस नळ स्टॉप चौकार थांबवली, पोलिसांना बोलावण्यात आले. पोलिसांनी लगेचच बसच्या चालकाला ताब्यात घेतले.

Pune Shivneri Bus
Pune : पुण्यात महिलेने मागवलेल्या सूपमध्ये सापडलं झुरळ, कॅम्प परिसरातील हॉटेलमधील किळसवाणा प्रकार समोर

शिवनेरीच्या मद्यधुंद चालकाला दारु पिताना प्रवाशांनी रंगेहाथ पकडले. स्वारगेटहून ठाण्याला जाणाऱ्या शिवनेरी बसचा चालक दारु पिऊन बस चालवत होता. ही बाब प्रवाशांच्या लक्षात आली. चालकाला रंगेहाथ पकडल्यानंतर प्रवाशांनी पोलिसांना बोलावले आणि बसचालकाला पोलिसांच्या हवाली केले. चालकावर कारवाई व्हावी असे प्रवाशांनी म्हटले आहे.

Pune Shivneri Bus
Kalyan Crime : धावत्या एक्स्प्रेसमध्ये अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणी आरोपीला अटक

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com