Pune : पुण्यात महिलेने मागवलेल्या सूपमध्ये सापडलं झुरळ, कॅम्प परिसरातील हॉटेलमधील किळसवाणा प्रकार समोर

Pune News : पुण्याच्या कॅम्प परिसरातील एका हॉटेलमध्ये किळसवाणा प्रकार घडला आहे. या हॉटेलमध्ये एका महिलेच्या सूपमध्ये झुरळ सापडले आहे. या प्रकरणी पोलिसांनी हॉटेलचे मालक आणि व्यवस्थापकावर गुन्हा दाखल केला आहे.
Pune News
Pune NewsSaam Tv
Published On

अक्षय बडवे, साम टीव्ही, प्रतिनिधी

पुण्यातील गुडलक कॅफेमधील बनमस्कामध्ये काचेचा तुकडा आढळल्याे खळबळ उडाली. ही घटना ताजी असताना पुण्यात आणखी एक किळसवाणा प्रकार उघडकीस आला आहे. पुण्यातील कॅम्प परिसरातील भिवंडी दरबार हॉटेलमध्ये एका महिलेच्या सूपमध्ये झुरळ सापडल्याचे समोर आले आहे. महिलेच्या तक्रारीनंतर हॉटेलवर कारवाई झाल्याचे म्हटले जात आहे.

सूपमध्ये झुरळ आढळल्यानंतर ३१ वर्षीय महिलेने लष्कर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. अन्न व औषध प्रशासनाच्या अहवालानंतर हॉटेलवर कारवाई करण्यात आली आहे. हॉटेल मालकासह व्यवस्थापकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा किळसवाणा प्रकार समोर आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

Pune News
Pune Accident : पुण्यात भीषण अपघात, फ्लायओव्हरच्या कड्याला दुचाकी जोरात धडकली; २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा सगळा प्रकार १६ जून रोजी पुण्यातील कॅम्प परिसरात असणाऱ्या भिवंडी दरबार या हॉटेलमध्ये रात्री ९ च्या सुमारास घडला. फिर्यादी या त्यांच्या कुटुंबासह हॉटेल भिवंडी दरबार येथे जेवणासाठी गेल्या होत्या. मुख्य जेवणापूर्वी त्यांनी सूप मागवले होते. यावेळी सूपमध्ये त्यांना झुरळ आढळून आले. या गोष्टीची तक्रार केल्यानंतर हॉटेल व्यवस्थापकाने त्याची दखल न घेतल्यामुळे त्याठिकाणी पोलिसांना बोलावण्यात आले.

Pune News
Pune Shocking : पुण्यात प्रेमीयुगुलाने जीवन संपवले, खडकवासला धरणाजवळ आढळले दोघांचे मृतदेह; परिसरात खळबळ

पोलिसांनी हे सूप जप्त केले व ते अन्न व औषध प्रशासनाकडे पाठवले. या सूपची तपासणी केल्यानंतर त्याबाबत अन्न व औषध प्रशासनाने प्रमाणपत्र दिले. त्यात हे सूप आरोग्यास अपायकारक असल्याचे आढळून आले आणि हॉटेल मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. हॉटेल व्यवस्थापनाकडून कसल्याही प्रकारची स्वच्छतेची दक्षता न घेता ग्राहकांच्या जीवितास अपायकारक खाद्य पदार्थ खाण्यास दिले व ग्राहकाच्या जीवितास धोका निर्माण केल्याने लष्कर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune News
Pune : दोनदा घटस्फोट, लग्नाचं आमिष दाखवून बलात्कार; तरीही पुणे कोर्टाने दिली क्लीन चीट, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com