Pune Accident : पुण्यात भीषण अपघात, फ्लायओव्हरच्या कड्याला दुचाकी जोरात धडकली; २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

Pune : पुण्याच्या कर्वे रोडवरील नळ स्टॉप मेट्रो स्थानकाजवळ भीषण अपघात झाला होता. एका तरुणाची दुचाकी फ्लायओव्हरला धडकली होती. अपघातात जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
Pune Accident
Pune Accidentx
Published On

Pune Accident News : पुण्यातील कर्वे रोडवर भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात एका २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. हा तरुण उड्डाणपुलावरुन वेगाने दुचाकी चालवत होता. मेट्रो स्टेशनजवळ त्याचे दुचाकीवरचे नियंत्रण सुटले. अपघातात तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, २ जुलै रोजी मध्यरात्री बारा-साडेबाराच्या सुमारास राजसिंग तमट्टा हा तरुण दुचाकीवरुन येत होता. कर्वे रोडवरील नळ स्टॉप मेट्रो स्टेशनजवळीच उड्डाणपुलाच्या कड्याला त्याची दुचाकी आदळली. त्याला जवळच्या रुग्णालयात उपचारांसाठी नेण्यात आले. आज उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

Pune Accident
Pune : दोनदा घटस्फोट, लग्नाचं आमिष दाखवून बलात्कार; तरीही पुणे कोर्टाने दिली क्लीन चीट, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

'राजसिंग तमट्टा हा कोथरूड येथील कम्युनिटी कॅफेचा रहिवासी होता. २ जुलैच्या मध्यरात्री कर्वे रोड उड्डाणपुलावरून वेगाने दुचाकी चालवत असताना मेट्रो स्टेशनजवळ त्याचे नियंत्रण सुटले. उड्डाणपुलाच्या कड्याला दुचाकीने जोरदार धडक दिली. राजसिंगच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली', अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

Pune Accident
Beed Shocking : डॉक्टरांनी मृत घोषित केलेले बाळ अंत्यसंस्कारावेळी अचानक रडू लागले

घोरपडी गावातील रहिवासी विनोद पिल्ले यांनी या अपघाताची माहिती अलंकार पोलीस स्थानकातील पोलीस कर्मचाऱ्यांना दिली होती. अपघाताबाबत समजताच पोलिसांनी राजसिंगला रुग्णालयात नेले. त्याच्यावर उपचार सुरु होते. रुग्णालयातच राजसिंगचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

Pune Accident
Viral Video : शुभमन गिल आणि सारा तेंडुलकर पुन्हा एकत्र? लंडनच्या पार्टीतला व्हिडीओ व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com