Mega Block : रविवारी मध्य-हार्बर रेल्वे मार्गावर ५ तासांचा मेगा ब्लॉक; कधी, कुठे आणि किती वाजता?

Mumbai News : मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर रविवारी १३ जुलै रोजी मेगा ब्लॉक असणार आहे. यानुसार, रेल्वेच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आले आहेत. मेगाब्लॉकमुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम होणार आहे.
mumbai mega block
mumbai mega blockSaam Tv
Published On

Mumbai Local Mega Block News : रविवार दि. १३.०७.२०२५ रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मध्य रेल्वे, मुंबई विभाग विद्याविहार आणि ठाणे स्थानकांदरम्यान मुख्य मार्गावर ५व्या आणि ६व्या मार्गावर आणि कुर्ला आणि वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक परीचालीत करणार आहे.

mumbai mega block
Mumbai : मुंबईत राज ठाकरेंची डरकाळी! मनसेकडून 'मराठीची पाठशाळा', अमराठी व्यापाऱ्यांसाठी भाषेचा 'क्लास'

मुख्य मार्गावरील ब्लॉक विभाग – विद्याविहार आणि ठाणे स्थानकांदरम्यान ५व्या व ६व्या मार्गावर ०८.०० ते १३.३० वाजेपर्यंत ब्लॉक राहणार आहे. कुर्ला आणि वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते संध्याकाळी ४.१० पर्यंत ब्लॉक असणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.३४ ते दुपारी ३.३६ पर्यंत वाशी/बेलापूर/पनवेल येथे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील फेऱ्या आणि

पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी १०.१६ ते दुपारी ३.४७ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील फेऱ्या रद्द राहतील.

ब्लॉक काळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई - कुर्ला आणि पनवेल - वाशी विभागांवर विशेष उपनगरीय गाड्या चालवल्या जातील.

ब्लॉक काळात हार्बर मार्गावरील प्रवाशांना ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान सकाळी १०.०० ते संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत प्रवास करण्याची परवानगी आहे.

mumbai mega block
Sindhudurg : विवाहितेची आत्महत्या, पतीसह माजी नगराध्यक्षाच्या विरोधात तक्रार; ठाकरे गटाचे नेते पोलीस स्टेशनवर धडकले

ब्लॉकमुळे रेल्वे वाहतुकीवर होणारे परिणाम पुढीलप्रमाणे आहेत:

डाऊन मेल गाड्यांचे /एक्सप्रेस गाड्यांचे डायव्हर्जन

पुढील डाऊन मेल/एक्सप्रेस गाड्या विद्याविहार स्टेशनवर डाऊन जलद मार्गावर वळवल्या जातील, पाचव्या मार्गावर ठाणे येथे पुन्हा वळवल्या जातील आणि ब्लॉक कालावधीत १० ते १५ मिनिटे उशिराने धावतील.

•ट्रेन क्रमांक 11055 – लोकमान्य टिळक टर्मिनस - गोरखपूर एक्सप्रेस

•ट्रेन क्रमांक 11061 – लोकमान्य टिळक टर्मिनस - जयनगर पवन एक्सप्रेस

•ट्रेन क्रमांक 16345 – लोकमान्य टिळक टर्मिनस - तिरुवनंतपुरम नेत्रावती एक्सप्रेस

•ट्रेन क्रमांक 17222 – लोकमान्य टिळक टर्मिनस - काकीनाडा टाउन एक्सप्रेस

mumbai mega block
Ind Vs Eng : शुभमन गिल थेट अंपायर्संना भिडला, एका चेंडूवरुन मोठा राडा; लॉर्ड्सच्या मैदानात काय घडलं?

अप मेल/एक्सप्रेस गाड्यांचे डायव्हर्जन

खालील अप मेल/एक्सप्रेस (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस्ट कडे जाणाऱ्या) गाड्या ब्लॉक कालावधीत ठाणे येथे अप जलद मार्गावर वळवण्यात येणार असून, त्या त्यांच्या अंतिम स्थानकावर १० ते १५ मिनिटे उशिराने पोहोचतील.

• ट्रेन क्रमांक 11010 पुणे - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सिंहगड एक्सप्रेस

• ट्रेन क्रमांक 12124 पुणे - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस डेक्कन क्वीन

• ट्रेन क्रमांक 12126 पुणे - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस प्रगती एक्सप्रेस

• ट्रेन क्रमांक 12140 नागपूर - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सेवाग्राम एक्सप्रेस

• ट्रेन क्रमांक 22226 सोलापूर - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वंदे भारत एक्सप्रेस

• ट्रेन क्रमांक 12321 हावडा - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेल

• ट्रेन क्रमांक 11012 धुळे - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस

mumbai mega block
Shubman Gill : सारा तेंडुलकरची आई शुभमन गिलसमोर बसली, रवींद्र जडेजानं चांगलीच फिरकी घेतली; पाहा Video

खालील अप मेल/एक्सप्रेस (लोकमान्य टिळक टर्मिनसकडे जाणाऱ्या) गाड्या ब्लॉक कालावधीत ठाणे स्थानकावर अप जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत, तसेच विद्याविहार स्थानकावर ६व्या लाईनवर पुन्हा वळवण्यात येतील आणि आपल्या अंतिम स्थानकावर १० ते १५ मिनिटे उशिराने पोहोचतील.

• ट्रेन क्रमांक 13201 पटना - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस

• ट्रेन क्रमांक 17221 काकीनाडा टाउन - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस

• ट्रेन क्रमांक 12168 बनारस - लोकमान्य टिळक टर्मिनस सुपरफास्ट एक्सप्रेस

• ट्रेन क्रमांक 12812 हटिया - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस

mumbai mega block
Kalyan Crime : धावत्या एक्स्प्रेसमध्ये अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणी आरोपीला अटक

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com