Mumbai : मुंबईत राज ठाकरेंची डरकाळी! मनसेकडून 'मराठीची पाठशाळा', अमराठी व्यापाऱ्यांसाठी भाषेचा 'क्लास'

Marathi pathshala in Mumbai : मुंबईत मनसे पुन्हा सक्रिय झाली आहे. मनसेने मुंबईत 'मराठीची पाठशाळा सुरु केली आहे. अमराठी व्यापाऱ्यांसाठी पाठशाळा सुरु केली आहे.
raj thackeray news
mumbai saam tv
Published On

संजय गडदे, साम टीव्ही

मुंबई : राज्यात काही दिवसांपासून मराठी आणि हिंदी भाषेच्या वापरावरून सामाजिक आणि राजकीय वाद निर्माण झाला आहे. मराठी भाषेचा पदसाड मीरा रोड परिसरात अधिक उमटले. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एक सकारात्मक आणि विधायक उपक्रम हाती घेतलाय. बोरिवली पश्चिम येथे अमराठी व्यापाऱ्यांसाठी ‘मराठीची पाठशाळा’ हा उपक्रम राबवण्यात आलाय.

मनसेच्या उपक्रमाचा उद्देश म्हणजे मुंबईत व्यवसाय करणाऱ्या अमराठी व्यापाऱ्यांना मराठी भाषा शिकवून त्यांचं स्थानिकांशी सुसंवाद अधिक सुलभ करणं असा आहे. विशेष म्हणजे या उपक्रमात अनेक व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतलाय. मनसे कार्यकर्त्यांसोबत बसून व्यापाऱ्यांनी मराठीची बाराखडी, मूलभूत शब्द आणि व्यवहारात उपयोगी पडणाऱ्या वाक्यरचनांचं अध्ययन केलं.

raj thackeray news
Maharashtra Politics : उद्धव ठाकरे सुसाट, पण राज ठाकरेंचं मौन का? वाचा स्पेशल रिपोर्ट,VIDEO

मनसेच्या या उपक्रमामुळे सामाजिक सलोखा प्रस्थापित करण्यास मदत होईल, असा विश्वास स्थानिक नागरिकांमध्ये दिसून आलाय. एका व्यापाऱ्याने सांगितलं , 'आम्हाला येथे व्यवसाय करताना स्थानिक भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. मराठी भाषा शिकण्याची संधी मिळाल्यामुळे आम्हाला खूप आनंद झालाय'.

raj thackeray news
Train Accident : कर्जतजवळ मालगाडी रुळावरून घसरली; मुंबई- पुणे रेल्वे मार्ग ठप्प, नेमकं काय घडलं?

बोरिवलीतील मनसे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं की, "मराठी ही केवळ भाषा नाही, तर येथील मातीची ओळख आहे. महाराष्ट्रात जी लोकं व्यवसाय करतात, त्यांनी स्थानिक भाषेचा आदर ठेवावा, हेच आमचं उद्दिष्ट आहे. आम्ही कोणावरही दबाव टाकत नाहीये, पण मराठी शिकण्याचा हा आग्रह निश्चितच पुढेही सुरू राहील'.

raj thackeray news
Uddhav Thackeray : नक्षलवाद संपत आलाय, मग कायदा कुणासाठी? उद्धव ठाकरे जनसुरक्षा विधेयकावरून आक्रमक, VIDEO

मिरारोडमध्ये मराठी भाषेचा वाद चिघळला होता, त्यानंतर मनसेच्या या उपक्रमाने सौहार्दाचा मार्ग निवडलाय. पुढील काळात मुंबईतील इतर भागांमध्येही 'मराठीची पाठशाळा' हा उपक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती मनसेकडून देण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com