Dhule Cold Wave Saam tv
महाराष्ट्र

Cold Wave : धुळ्यात सर्वात कमी तापमानाची नोंद; थंडीची लाट कायम

Dhule News : उत्तर भारतात निर्माण झालेल्या गारठ्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात थंडीत वाढ झाली आहे. दरम्यान धुळे शहरासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कडाक्याच्या थंडीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली

भूषण अहिरे

धुळे : मागील आठवडाभरापासून थंडीची लाट आली आहे. यात उत्तर महाराष्ट्रात देखील थंडीचा जोर वाढला असून (Dhule) धुळ्यात आज तापमानामध्ये प्रचंड घट झाली असून सर्वत कमी ४.७ अंश सेल्सिअस इतक्या निच्चांकी तापमानाची (Temperature) नोंद करण्यात आले आहे. या वर्षातील सर्वात निच्चांकी तापमान असून धुळेकरांना या वाढत्या थंडीमुळे चांगलीच हुडहुडी भरली आहे. (Tajya Batmya)

उत्तर भारतात निर्माण झालेल्या गारठ्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात थंडीत वाढ (Cold Wave) झाली आहे. दरम्यान धुळे शहरासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कडाक्याच्या थंडीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असून मागील दोन दिवसांपासून ७ अंश सेल्सिअस इतके तापमान राहत आहे. मात्र २३ जानेवारीला रात्रीच्या सुमारास गारठा अधिक वाढून यंदाच्या निच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

गेल्या काही दिवसांपासून १० अंशपेक्षा कमी तापमानाची धुळ्यात नोंद केली जात आहे. परंतु आता आज चार पूर्णांक सात अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली असल्याने धुळेकर चांगलेच गारठले आहेत. धुळेकरांना या वाढत्या थंडीपासून आपल्या शरीराचं संरक्षण करण्यासाठी गरमोबदार कपडे त्याचबरोबर शेकोटीचा आधार घ्यावा लागत आहे. पुढील काही दिवस हि थंडी अशीच  अंदाज वर्तविला जात आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नांदूर-मध्यमेश्वर धरणातून पाणी विसर्ग वाढवला

Anil Gote : भ्रष्टाचाऱ्यांसाठी जेल म्हणजे भाजप कार्यालय; माजी आमदार अनिल गोटेंचा सरकारवर हल्लाबोल

Weekly Horoscope: या आठवड्यात मोठे खर्च करण्याची तयारी ठेवा; वाचा साप्तहिक राशीभविष्य

गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडच्या मांडीवर बसली, धावत्या बसमध्ये शारीरिक संबंध; VIDEO व्हायरल करत प्रवाशांनी झापलं

Dhodhadi Waterfall: मुंबईपासून फक्त साडेतीन तासांच्या अंतरावर आहे हा सुंदर धबधबा, पुढचा प्लान इथे नक्की करा

SCROLL FOR NEXT