Shagun Sharma: 'बिग बॉस १९'चा विजेता गौरव खन्ना पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी कारण ठरले आहे रिअॅलिटी शो 'खतरों के खिलाडी १५'. शो सुरू होण्यापूर्वीच त्यावर वादाचे सावट आले असून, अभिनेत्री शगुन शर्माने गौरव खन्नावर तिला त्रास दिल्याचा आणि उद्धटपणे वागल्याचा गंभीर आरोप केला आहे. तिच्या या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे.
'फिल्मीज्ञान'ला दिलेल्या मुलाखतीत शगुन शर्माने 'खतरों के खिलाडी १५'च्या शूटिंगदरम्यानचे अनुभव सांगितले. ती म्हणाली, "गौरव खन्नाने मला खूप त्रास दिला आणि माझ्याशी अतिशय वाईट वर्तन केले. भविष्यात मला अशा व्यक्तीला पुन्हा कधीच भेटायचे नाही." तिच्या या वक्तव्यामुळे चाहत्यांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
नेमके काय घडले
नेमके काय घडले ते सांगताना शगुन म्हणाली की, स्टंटदरम्यान अनेक स्पर्धक फेल होतात पण गौरव तिच्यावरच टीका करायचा. "पाचपैकी चार जण स्टंटमध्ये फेल झाले तरी तो फक्त मलाच बोलायचा. 'शगुनला काहीच जमत नाही,' अशा प्रकारच्या कमेंट तो सतत करत होता. त्याने अनेक वेळा मला वाईट वाटेल अशा गोष्टी बोलल्या आहेत. मात्र,रिअॅलिटी शोमध्ये परिस्थिती वेगळी असते. त्यामुळे तिथे जसे तो वागला, तसाच तो खऱ्या आयुष्यातही असेल, असे मी म्हणणार नाही," असेही तिने स्पष्ट केले.
दरम्यान, गौरव खन्नाचे वैयक्तिक आयुष्यही चर्चेत आहे. त्याची पत्नी आकांक्षा चमोला सध्या 'लॉक अप २'मध्ये सहभागी झाली असून, तिने दोघे गेल्या वर्षभरापासून वेगळे राहत असल्याचा आणि घटस्फोट घेणार असल्याचे सांगितले आहे. तसेच तिने स्वतःबाबत काही वैयक्तिक खुलासेही केले आहेत. या सर्व घडामोडींमुळे गौरव खन्ना सध्या अधिक चर्चेत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.