तुम्ही 10 घेतले, आम्ही 100 घेतले; पक्षप्रवेशावरून शिंदेसेना-भाजप आमने-सामने, महायुतीत अंतर्गत कलह उफाळला

Kalyan Dombivli Shiv Sena BJP Worker Defection Controversy: कल्याण-डोंबिवलीत शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये पदाधिकाऱ्यांच्या पक्षप्रवेशावरून शाब्दिक चकमक रंगली आहे. महेश गायकवाड यांनी नंदू परबांना दिलेल्या प्रत्युत्तरामुळे महायुतीतील अंतर्गत वाद पुन्हा समोर आला आहे.
KALYAN DOMBIVLI POLITICAL CLASH | SHIV SENA VS BJP WORKER DEFECTION ROW HEATS UP
KALYAN DOMBIVLI POLITICAL CLASH | SHIV SENA VS BJP WORKER DEFECTION ROW HEATS UPsaam tv
Published On

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

कल्याण-डोंबिवलीत सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले असून शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये शाब्दिक चकमक रंगली आहे. पदाधिकाऱ्यांच्या पक्षप्रवेशावरून सुरू झालेल्या या वादामुळे महायुतीतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा उघड झाले आहेत. अलीकडेच शिंदेसेनेतून भाजपमध्ये अनेक नेत्यांसह पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रवेश केला होता. यावरून दोन्ही पक्षात आलबेल नसल्याचे दिसून आले. महापालिका निवडणुकीच्या दरम्यान या दोन्ही पक्षात घमासान पाहायला मिळाले होते. आता हाच वाद भरसभेत दिसून आला.

भाजप पदाधिकाऱ्यांच्या शिवसेना शिंदे गटात झालेल्या पक्षप्रवेशानंतर कल्याण-डोंबिवलीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी युतीतील पक्षांनी एकमेकांचे कार्यकर्ते घेऊ नयेत, असा करार झाल्याचा दावा करत शिवसेनेला इशारा दिल्यानंतर आता शिवसेना शिंदे गटचे विधानसभा संपर्कप्रमुख महेश गायकवाड यांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

KALYAN DOMBIVLI POLITICAL CLASH | SHIV SENA VS BJP WORKER DEFECTION ROW HEATS UP
Pune Politics: ठाकरेसेनेच्या शहरप्रमुखांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, नेमकं कारण काय?; वसंत मोरेंनी VIDEO केला पोस्ट

गुरुवारी रात्री झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमानंतर नंदू परब यांनी, युतीतील पक्षांनी एकमेकांचे कार्यकर्ते फोडू नयेत, असा करार झाला आहे. तुम्ही आमचा एक कार्यकर्ता घेतला तर आम्ही तुमचे चार कार्यकर्ते घेऊ, असे वक्तव्य केले होते. या विधानावर प्रतिक्रिया देताना महेश गायकवाड यांनी, तुम्ही चुका करा आणि आम्ही त्या सहन करू, असा कोणता लिखित किंवा अलिखित करार झाला आहे का? असा सवाल उपस्थित केला.

KALYAN DOMBIVLI POLITICAL CLASH | SHIV SENA VS BJP WORKER DEFECTION ROW HEATS UP
धक्कादायक! कल्याणमध्ये महिलांना जबरदस्तीने वेश्याव्यवसायात ढकलणाऱ्या टोळीच्या आवळल्या मुसक्या; 20 पीडितांची सुटका

पुढे बोलताना त्यांनी भाजपवर निशाणा साधत, तुमच्या आमदाराने आमचे दहा पदाधिकारी पक्षात घेतले. त्याच्या तुलनेत आम्ही तुमचे शंभर पदाधिकारी पक्षात घेतले आहेत, असा दावा केला. भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या स्थानिक नेत्यांमध्ये सुरू झालेल्या या शाब्दिक चकमकीमुळे महायुतीतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा उघड झाले आहेत. दोन्ही पक्षांच्या आरोप-प्रत्यारोपांमुळे कल्याण-डोंबिवलीच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले असून, येत्या काळात हा वाद आणखी तीव्र होण्यार की काय? अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com