August New Rules : 1 ऑगस्टपासून 5 मोठे नियम लागू; LPG सिलेंडर स्वस्त, तत्काळ तिकीट बुकिंगपासून KYC पर्यंत मोठे बदल

August 1 Brings Big Changes: 1 ऑगस्टपासून LPG चे दर, रेल्वे तिकीट, उज्ज्वला ई-केवायसी, KYC 2.0 आणि क्रेडिट कार्ड नियमांमध्ये मोठे बदल लागू झाले असून त्याचा सर्वसामान्यांवर थेट परिणाम होणार आहे.
Rules Changed From 1 August 2026
Rules Changed From 1 August 2026meta ai
Published On

Rules Changed From 1 August 2026: प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी काही महत्त्वाचे आर्थिक आणि प्रशासकीय नियमांमध्ये बदल होत असतात. १ ऑगस्ट २०२६ पासून सर्वसामान्य नागरिकांवर थेट परिणाम करणारे पाच मोठे बदल लागू झाले आहेत. यामध्ये व्यावसायिक LPG सिलेंडरच्या किंमतीत कपात, रेल्वेच्या तत्काळ तिकीट बुकिंगसाठी नवीन टोकन प्रणाली, उज्ज्वला योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी सक्ती, KYC 2.0 प्रणाली आणि क्रेडिट कार्ड बिलिंग नियमांमध्ये बदल यांचा समावेश आहे.

व्यावसायिक LPG सिलेंडर झाला स्वस्त

तेल कंपन्यांनी १ ऑगस्टपासून व्यावसायिक LPG सिलेंडरचे दर कमी केले आहेत. दिल्लीमध्ये १९ किलोच्या सिलेंडरची किंमत १९२ रुपयांनी, कोलकातामध्ये २०९ रुपयांनी , मुंबईमध्ये १९४ रुपयांनी आणि चेन्नईमध्ये २०० रुपयांनी किंमत कमी झाली आहे.पण घरगुती LPG सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आला नाही.

Rules Changed From 1 August 2026
IBPS Recruitment : सरकारी बँकांमध्ये मेगाभरती; ११००० पदे, अर्ज कसा कराल, महाराष्ट्रात किती पदे?

तत्काळ रेल्वे तिकीटासाठी नवीन टोकन प्रणाली

रेल्वे प्रशासनाने तत्काळ तिकीट बुकिंगसाठी नवीन टोकन प्रणाली लागू केली आहे. याआधी वेगवेगळ्या काउंटरवर लांबच्या लांब रांगा लागायच्या. आता प्रवाशांना सर्वात आधी टोकन दिले जाईल आणि क्रमांकानुसार तिकीट दिले जाईल. त्यामुळे गर्दी कमी आणि वेळेचीही बचत होईल.

उज्ज्वला योजनेसाठी ई-केवायसी अनिवार्य

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतगर्तत LPG सबसिडी मिळवणाऱ्या सर्व लाभार्थ्यांसाठी ई-केवायसी अनिवार्य करण्यात आली आहे. ई-केवायसी पूर्ण केली नाही की, सबसिडी मिळण्यात अडचणी येऊ शकतात.

Rules Changed From 1 August 2026
Aadhaar Card : आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झालं आणखी सोपं! नवीन Aadhaar App वरून घरबसल्या करा अर्ज, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

KYC 2.0 प्रणालीची अंमलबजावणी

आजपासून बँकिंग, विमा आणि म्युच्युअल फंड क्षेत्रामध्ये KYC 2.0 प्रणाली सुरू झाली आहे. या नव्या प्रणालीमुळे सर्व वित्तीय संस्था केंद्रीय डेटाबेसमधून ग्राहकांची पडताळलेली माहिती वापरतील. त्यामुळे सतत KYC करण्याची गरज कमी होणार आहे.

क्रेडिट कार्डधारकांना दिलासा

रिझर्व्ह बँकेने क्रेडिट कार्ड बिलिंग नियमांमध्ये बदल केले आहेत. ग्राहकांनी बिलाची संपूर्ण रक्कम वेळेवर भरली नाही, तरी शिल्लक रकमेवर काही दंडात्मक शुल्क आणि कर आकारणीबद्दल दिलासा मिळणार आहे. त्यामुळे व्याजाचा आर्थिक भार कमी होण्याची शक्यता आहे.

RBI बैठकीकडे सर्वांचं लक्ष

याशिवाय ५ ऑगस्ट २०२६ रोजी रिझर्व्ह बँकेची पतधोरण बैठक होणार आहे. या बैठकीत व्याजदरांबद्दल निर्णय घेतला जाणार असून, दरवाढ झाल्यावर भविष्यात मुदत ठेवींवरील (FD) व्याजदर वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com