Aadhaar Card : आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झालं आणखी सोपं! नवीन Aadhaar App वरून घरबसल्या करा अर्ज, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Aadhaar Address Update : UIDAI च्या नवीन Aadhaar App मुळे आधार कार्डातील पत्ता आता घरबसल्या अपडेट करता येतो. आवश्यक कागदपत्रे अपलोड करून फेस ऑथेंटिकेशन पूर्ण करा आणि ७५ रुपये शुल्क भरून अर्ज सहज सबमिट करा.
Aadhaar Address Update
Aadhaar Card meta ai
Published On

आधार कार्डामधला पत्ता बदलण्यासाठी आता आधार सेवा केंद्रात जाण्याची गरज नाही. UIDAI ने सुरु केलेल्या नवीन Aadhaar App मुळे नागरिकांना घरबसल्या मोबाईलवरूनच पत्ता अपडेट करण्यासाठी अर्ज करता येणार आहे. त्यामुळे संपूर्ण प्रोसेस जलद, सोपी आणि वेळेची बचत करणारी ठरणार आहे. तसेच काही प्रकरणांमध्ये कुटुंब प्रमुखाच्या (Head of Family) मदतीनेही पत्ता अपडेट करण्याची सुविधा उपलब्ध आहे.

Aadhaar App वरून पत्ता अपडेट करण्याची प्रोसेस

आधार कार्डाचा पत्ता बदलण्यासाठी सर्वातआधी मोबाईलमध्ये UIDAI चे Aadhaar App डाउनलोड करा. अॅप सुरू केल्यानंतर ६ अंकी PIN वापरून लॉगिन करा. त्यानंतर Services विभागात जाऊन Address Update हा पर्याय निवडा. आता नवीन पत्ता अचूकपणे भरून त्यासंबंधित आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.

Aadhaar Address Update
Gold Prices Today: आनंदाची बातमी! महिन्याच्या सुरुवातीलाच सोनं झालं स्वस्त, वाचा २४, २२ आणि १८ कॅरेटचे आजचे दर

कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

पत्ता अपडेट करण्यासाठी खालीलपैकी कोणताही वैध पत्त्याचा पुरावा वापरता येईल.

वीजेचे बिल

बँक पासबुक

रेशन कार्ड

किंवा UIDAI ने मान्य केलेले इतर पत्त्याचे पुरावे

कागदपत्रे स्पष्ट आणि वाचण्यायोग्य असणं गरजेचं आहे. चुकीची किंवा अस्पष्ट कागदपत्रे अपलोड केल्याने अर्ज नाकारला जाऊ शकतो.

अर्ज पूर्ण करण्याआधी भरलेला नवीन पत्ता नीट तपासा. इंग्रजी आणि स्थानिक भाषेतली माहिती योग्य असल्याची खात्री करा. त्यानंतर Face Authentication प्रोसेस पूर्ण करा आणि ७५ रुपये शुल्क ऑनलान भरा. अर्ज यशस्वीरीत्या सबमिट झाल्यावर SRN (Service Request Number) असलेली पावची जतन करून ठेवा. याच क्रमांकाच्या मदतीने अर्जाची स्थिती (Status) ऑनलाइन तपासता येते.

Aadhaar Address Update
DA Hike : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! पगारात लवकरच होणार वाढ, 'या' महत्त्वाच्या तारखा नोट करा

या महत्त्वाच्या बाबी लक्षात ठेवा

ऑनलाइन पत्ता अपडेट करण्यासाठी मोबाईल क्रमांक आधारशी लिंक असणं गरजेचं आहे. सध्या Aadhaar App च्या मदतीने पत्ता आणि काही इतर सेवा ऑनलाइन उपलब्ध आहेत. पण नाव, जन्मतारीख किंवा इतर मोठे बदल करण्यासाठी अद्याप आधार सेवा केंद्रालाच भेट द्यावी लागू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com