IBPS Recruitment : सरकारी बँकांमध्ये मेगाभरती; ११००० पदे, अर्ज कसा कराल, महाराष्ट्रात किती पदे?

IBPS Clerk Recruitment 2026: IBPS ने ११,४०३ क्लर्क पदांसाठी भरती सुरू केली असून ऑगस्टच्या ठरलेल्या तारखेपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत. पदवीधर उमेदवारांना ६४,४८० पर्यंत सॅलरीसह सहकारी बँकेत नोकरीची संधी मिळणार आहे.
IBPS Clerk Recruitment 2026
IBPS Clerk Recruitment 2026 meta ai
Published On

बँकिंग क्षेत्रात सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. इन्सिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS) ने CRP CSA-XVI अंतर्गत कस्टमर सर्व्हिस असोसिएट क्लर्क या पदांच्या ११,४०३ रिक्त जागांसाठी भरती प्रोसेस सुरू केली आहे. १ ऑगस्ट २०२६ पासून ऑनलाइन अर्ज स्वीकारायला सुरुवात झालेली आहे.

तुम्हालाही या पदावर काम करण्याची इच्छा असेल तर २१ ऑगस्ट २०२६ पर्यंत अधिकृत वेबसाईटवर अर्ज करू शकतात. या भरतीच्या मदतीने बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसीज बँक, यूको बँक यांसारख्या प्रमुख सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांमध्ये नियुक्ती केली जाणार आहे.

तसेच या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवी घेतलेली असणं अनिवार्य आहे. तसेच संगणकाचे ज्ञान असणंही गरजेचं आहे. उमेदवारांचे वय २० वर्षे ते २८ वर्षांपर्यंत असावे. म्हणजेच उमेदवाराचा जन्म २ ऑगस्ट १९९८ ते १ ऑगस्ट २००६ या कालावधीत झालेला असावा. अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्गीय आणि दिव्यांग उमेदवारांना नियमानुसार वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.

IBPS Clerk Recruitment 2026
Aadhaar Card : आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झालं आणखी सोपं! नवीन Aadhaar App वरून घरबसल्या करा अर्ज, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

राज्यातील रिक्त पदे

उत्तर प्रदेश 1,731

कर्नाटक 1,414

महाराष्ट्र 1,051

पश्चिम बंगाल 946

गुजरात 698

तामिळनाडू 675

मध्य प्रदेश 570

बिहार 491

पंजाब 481

दिल्ली 415

राजस्थान 392

आसाम 349

ओडिशा 337

छत्तीसगड 265

हरियाणा 196

तेलंगणा 191

आंध्र प्रदेश 186

झारखंड 182

उत्तराखंड 145

केरळ 108

हिमाचल प्रदेश 97

जम्मू-काश्मीर 67

गोवा 61

पुडुचेरी 26

दादरा व नगर हवेली 18

दमण व दीव 7

IBPS ने याआधी क्लार्कच्या मुख्य परिक्षेच्या स्वरुपात बदल केला आहे. प्राथमिक परीक्षा आधीप्रमाणेच राहणार असली तरी मुख्य परिक्षेतल्या प्रश्नांची संख्या १५५ वरून १६० करण्यात आली आहे. त्यासोबत परीक्षेचा कालावधीही वाढवण्यात आला आहे. त्यामुळे उमेदवारांनी नव्या अभ्यासक्रमानुसार तयारी करणे आवश्यक आहे.

निवड प्रोसेस प्राथमिक ऑनलाइन परीक्षा, मुख्य ऑनलाइन परीक्षा आणि स्थानिक भाषेच्या प्राविण्य चाचणी (LLPT) अशा तीन टप्यांमध्ये होणार आहे. प्राथमिक परीक्षा ऑक्टोबर २०२६ मध्ये, मुख्य परीक्षा डिसेंबर २०२६ मध्ये होणार असून अंतिम प्रोव्हिजनल अलॉटमेंट मार्च २०२७ मध्ये जाहीर केले जाईल.

IBPS Clerk Recruitment 2026
EPFO Update : PF धारकांसाठी मोठी खुशखबर! आता पीएफचे पैसे अवघ्या 2 दिवसांत खात्यात, UPI द्वारेही मिळणार रक्कम

निवड झालेल्या उमेदवारांना २४,०५० रुपये ते ६४,४८० पर्यंत मूलभूत वेतन मिळणार आहे. याशिवाय महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वैद्यकीय सुविधा आणि इतर विविध शासकीय भत्त्यांचाही लाभ मिळणार असल्यामुळे एकूण मासिक वेतन जास्त आकर्षक असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com