Buldhana News : ग्रामसेवकाला फिरवले चिखल साचलेल्या रस्त्यावर; गावाचा विकास थांबल्याने गावकरी संतप्त

Buldhana News : ग्रामसेवक हा ग्रामविकासाचा कणा मानला जातो. याच ग्रामसेवकांनी गावाकडे दुर्लक्ष केल्यास गावचा विकास हा खोळमल्याशिवाय राहत नाही.
Buldhana News
Buldhana NewsSaam tv
Published On

बुलढाणा : ग्रामसेवक ग्रामविकासाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत गावकऱ्यांनी ग्रामसेवकाला (Gram Sevak) चक्क चिखल साचलेल्या रस्त्यातूनच फिरायला भाग पाडले. हा प्रकार (Buldhana) बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव तालुक्यातील निपाणा येथे समोर आला आहे. (Live Marathi News)

Buldhana News
Prakash Ambedkar: ओबीसी आणि मराठा समाजाच्या आरक्षण वादावर मी मध्यस्थी करण्यास तयार; प्रकाश आंबेडकर यांचं वक्तव्य

ग्रामसेवक हा ग्रामविकासाचा कणा मानला जातो. याच ग्रामसेवकांनी गावाकडे दुर्लक्ष केल्यास गावचा विकास हा खोळमल्याशिवाय राहत नाही. गावात विकास होत नसल्याने गावकऱ्यांना त्रास सहन करावा लागत असतो. (Gram Panchayat) अशाच प्रकारे गावाचा विकास होत नसल्याचा आरोप करत संतप्त ग्रामस्थांनी ग्रामसेवकाला चिखल असलेल्या रस्त्यावरून चालायला लावले. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Buldhana News
Turmeric Crop : हिंगोलीत शेतकऱ्यांची उभी हळद करपली; दोन दशकानंतरचे पहिल्यांदाच भीषण चित्र

दोन गावांचा कारभार 

एकाच ग्रामसेवकाकडे पिंपळगाव राजा आणि निपाणा अशा दोन गावांचा पदभार असल्याने दोन्ही गावांच्या मूलभूत सुविधेकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. निपाणा गावामध्ये अनेक ठिकाणी नाल्या रस्ते झाले नसल्याने नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी ग्रामसेवकाला चक्क चिखल आणि सांडपाणी साचलेल्या रस्त्यावरूनच फिरायला भाग पाडले, हा व्हिडिओ सोशल माध्यमावर चांगलाच व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com