Shiv Sena and NCP Workers Clash Saam Tv
महाराष्ट्र

Dharashiv Politics: धाराशिवमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी आमने-सामने, १० ते १२ वाहनांची तोडफोड; ४५ जणांविरोधात कारवाई

Shiv Sena and NCP Workers Clash: धाराशिवमध्ये महायुतीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आमने-सामने आले. त्यांनी दगडफेक केली आणि १२ वाहनांच्या काचा फोडल्या.

Priya More
  • धाराशिवच्या तेरखेडा गावात शिवसेना आणि राष्ट्रवादी गटांमध्ये तुफान राडा

  • दगडफेकीत १० ते १२ वाहनांचे नुकसान

  • पोलिसांनी दोन्ही गटांतील ४५ जणांविरोधात गुन्हा दाखल

  • गावात तणावपूर्ण शांतता

  • गावात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात

बालाजी सुरवसे, धाराशिव

धाराशिवमध्ये राजकारण चांगलेच तापले आहे. तेरखेडा गावात जिल्हा परिषद निवडणुकीच्या कारणातून सत्ताधारी महायुतीतील शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या दोन गटात तुफान राडा झाला. आमदार तानाजी सावंत आणि माजी आमदार राहुल मोटे यांचे गट आमने- सामने आले. १० ते १२ वाहनांची तोडफोड करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. सध्या गावामध्ये पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धाराशिवच्या तेरखेडा येथे सत्ताधारी महायुतीतील राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये तुफान राडा झाल्याचे पाहायला मिळाले. रात्री दोन गटांमध्ये तुफान दगडफेक झाली. यावेळी १० ते १२ वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या. आमदार तानाजी सावंत गटाचा जिल्हा परिषद निवडणुकीतील विजयानंतर उन्माद सुरू असून त्यातूनच हल्ला केल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात येत आहे.

तर विधानसभा आणि जिल्हा परिषदेतील पराभव प्रस्थापितांना पचवता येत नाही त्यामुळे आमच्यावर आरोप केले जात असून कायम वाद उकरून काढला जात असल्याचं मत तानाजी सावंत यांच्या गटाने व्यक्त केलं. राहुल मोटे यांच्या सांगण्यावरूनच हे सारं होत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे. तर राष्ट्रवादीने स्वतःच्या गाड्या फोडून आमच्यावर आरोप केले असल्याचं सावंत गटाच्या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले.

या प्रकरणी दोन्ही गटांनी परस्परविरोधी तक्रारी दिल्या नसल्याने पोलिसांनी या प्रकरणात स्वतःहून तक्रार दाखल केली. पोलिसांकडून दोन्ही गटांच्या ४५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तेरखेडा गावात तणावपूर्ण शांतता असून बंदुकधारी पोलिसांचा फौजफाटा गावात तैनात करण्यात आला आहे. सध्या पोलिसांकडून आरोपींची शोध मोहीम सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MP Disqualification: आता सुप्रीम कोर्टात लागणार बंडखोर खासदारांचा निकाल; २० खासदारांवर अपात्रतेची टांगती तलवार

Chandrapur Firing: न्यायालयासमोरच गोळीबार! नाराळपाणी दुकानावर उभ्या असलेल्या तरुणावर धाडधाड झाडल्या गोळ्या

साखरेचे दर शंभरी पार जाणार? ऐन सणासुदीत साखर क़डू

नागपूरमध्ये क्लोरीन वायूची गळती, 40 जणांवर उपचार, 5 गंभीर, जलशुद्धीकरण प्रकल्प भरवस्तीत कसा?

कचोरी आणि बिर्याणीत उंदरांच्या लेंड्या, किळसवाण्या प्रकारामुळे नागरिकांचा संताप

SCROLL FOR NEXT