धाराशिव जिल्ह्यात पेट्रोलचा काळाबाजार? किराणा दुकानात पेट्रोलची विक्री, VIDEO

Dharashiv news : एकीकडे इंधन टंचाईमुळे नागरिक हैराण झालेले असताना दुसरीकडे राज्यात पेट्रोलचा काळाबाजार सुरु झालाय. चक्क किराणा दुकानातून पेट्रोल विक्री कुठे सुरु आहे? साम टिव्हीनं इंधनाच्या नफेखोरीचा कसा पर्दाफाश केलाय ? पाहूयात या स्पेशल इन्व्हेस्टिगेशनमधून...
Dharashiv news
Dharashiv news Saam tv
Published On

धाराशिव जिल्ह्यात किराणा दुकानात आणि टपऱ्यांवर इंधनाचा काळाबाजार होत असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होती... त्याचाच रिअलॅटी चेक करण्यासाठी साम टिव्ही गावातील एका किराणा दुकानात पोहचलं.....आणि त्याचवेळी समोर आला नफेखोरीचं गोरखधंदा...

साम टीव्हीच्या या स्टिंग ऑपरेशननं प्रशासकीय यंत्रणांचे डोळे उघडले....पेट्रोल पंपावर अधिकृत दर 113 रुपये प्रति लिटर असताना, या अवैध बाजारात मात्र 130 रुपये लिटर दरानं पेट्रोलची सर्रास विक्री सुरू आहे. म्हणजेच एका लिटरमागे तब्बल 17 रुपयांची थेट लूट केली जातेय..मात्र या काळ्याबाजाराला रोखण्यासाठी जिल्हा पुरवठा विभागाची यंत्रणा पूर्णपणे अपयशी ठरलीय.

पुरवठा विभागाच्या वतीने कागदावर पथके नियुक्त केल्याचा दावा केला जातोय, मात्र प्रत्यक्षात या पथकांची कारवाई शून्य असल्याचं दिसतयं... साम टिव्हीच्या स्टिंग ऑपरेशनमधून ही नफेखोरी उघड झाल्यावर जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी कारवाईचं आश्वासन दिलंय.

Dharashiv news
Maharashtra News Live Update: नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयची 3 ठिकाणी घेतली झाडाझडती

पुरवठा विभागाने आता कारवाईचं आश्वासन दिलं असलं, तरी साम टीव्हीच्या स्टिंग ऑपरेशननं प्रशासनाचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर आणलाय. ज्वलनशील पदार्थाचा असा छुप्या पद्धतीने साठा करणं म्हणजे एका मोठ्या अपघाताला आमंत्रण देण्यासारखं आहे, पण पैशाच्या हव्यासापोटी नियमांची सर्रास पायमल्ली होतेय...

Dharashiv news
Maharashtra News Live Update: - महागडा मोबाईल नदीपात्रात पडला, थेट गोताखोरांना बोलावून मध्यरात्री राबवली शोधमोहीम

मात्र पेट्रोल पंपांवर तुटवडा असतानाकाळ्या बाजारात इंधन पोहचतच कसं? याची पाळंमुळं शोधायला हवीत..हा प्रकार फक्त एका गावापुरता मर्यादीत नाही...तर इंधनाचा हा गोरखधंदा अनेक ठिकाणी सुरु असल्याचा संशय आहे... त्यामुळे साम टीव्हीच्या या इनेव्हेस्टिगेशननंतर जिल्हा प्रशासन झोपेतून जागं होणार की नफेखोरांना अभय देणार?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com