Maharashtra News Live Update: नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयची 3 ठिकाणी घेतली झाडाझडती

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : राज्यात हवामान, पावसाचा अंदाज आणि विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा काय आहे. राजकीय घडामोडी, पेट्रोल-डिझेलचे दर , देशातील राजकारणातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Marathi Breaking Live Marathi Headlines Updates
Marathi Breaking Live Marathi Headlines UpdatesSaam Tv
Published On

Election : चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत 3 जण बिनविरोध

चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीमधून 13 जणांची माघार तर 3 जण बिनविरोध होणार

एकूण 17 जागांसाठी 60 अर्ज झाले होते दाखल

आता 3 बिनविरोध झाल्याने 14 जागांसाठी 47 उमेदवार रिंगणात

Neet : नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयची 3 ठिकाणी घेतली झाडाझडती

नीट पेपरफुटी प्रकरणात सी बी आय च्या पथकाने नांदेड शहरात पुन्हा हजेरी लावत तीन ठिकाणी घेतली झाडाझडती

शिवाजीनगर आणि भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन ठिकाणी धाड टाकत तपास

दोन विद्यार्थिनींची आणि कुटुंबाची करण्यात आली चौकशी.

Eknath shinde : एकनाथ शिंदे यांच्या सभास्थळी घिरट्या मारणारे ड्रोन, पोलिस प्रशासनाने थांबवले

लातूरच्या अहमदपूर येथे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश व कार्यकर्त्यांचा मेळावा होतो आहे, दरम्यान कार्यक्रम स्थळी 5 ते 6 ड्रोन एकाच वेळी गिरट्या घालत असल्याने , तात्काळ पोलीस प्रशासनाने, ड्रोन थांबून चौकशी केली आहे , सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी हे ड्रोन थांबवले.

alibaug : अलिबागचे आमदार महेंद्र दळवी सुनील तटकरेंवर बरसले

अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांची सुनील तटकरेंवर टीका

० सुनील तटकरे यांना पक्षातच कुणी विचारत नाही

० यावेळी वेगळा उमेदवार निवडून द्यायचा निर्धार

० तटकरेंची अवस्था पाहता त्यांच्या मुलाला तिकीट मिळेल का; आमदार महेंद्र दळवी यांना शंका

हिंगोलीत थोड्याच वेळात खासदार श्रीकांत शिंदे यांचे आगमन होणार

थोड्याच वेळात खासदार श्रीकांत शिंदे यांचे आगमन होणार

हिंगोलीत शिवसंवाद दौरा

शिवसैनिकांनी स्वागताला क्रेन, डिजे आणि फटाके आणले

नांदेड परिसरात स्वागताची तयारी

खेडमध्ये गावठी बॉम्बचा स्फोट; १३ वर्षीय मुलगा गंभीर जखमी

Summary

रत्नागिरी जिल्ह्यात गावठी बॉम्ब स्फोटाच्या घटनांनी पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. खेड तालुक्यातील मुरडे गोठलवाडी येथे शिकारीसाठी वापरला जाणारा गावठी बॉम्ब हातात फुटल्याने प्रणव प्रताप येसरे हा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. या भीषण स्फोटामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. प्रणव हा गुरे राखण्यासाठी परिसरात गेला असताना त्याला शिकारीसाठी वापरला जाणारा गावठी बॉम्ब आढळून आला. उत्सुकतेपोटी तो हाताळत असताना अचानक त्याचा स्फोट झाला. स्फोट इतका भीषण होता की प्रणवच्या हाताला, छातीला तसेच डोळ्याला गंभीर दुखापत झाली. स्फोटानंतर तो रक्तबंबाळ अवस्थेत कोसळला. स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेत त्याला उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आलेय.

आनंद परांजपे आता राष्ट्रवादीत नाहीत शिवसेनेत आहेत- खासदार श्रीकांत शिंदे

आनंद परांजपे यांना शिवसेनेने महामंडळ देऊ नये असे पत्र राष्ट्रवादीने दिले आहे. यावर शिवसेना युवा नेते खासदार श्रीकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.आनंद परांजपे आता राष्ट्रवादीत नाहीत शिवसेनेत आहेत.असे खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले.

बुलढाण्यात ५ कोटी खर्चूनही गाव तहानलेली

बुलढाण्यात ५ कोटी खर्चूनही गाव तहानलेली

साखळी बु.मध्ये रिकाम्या घागरींसह ग्रामपंचायतीवर संतप्त मोर्चा!”..

“महिनाभर नळ कोरडेच; महिलांचा ग्रामपंचायतीला घेराव, उग्र आंदोलनाचा इशारा!”...

ग्रामपंचायतिसमोर असंख्य महिलांनी घागरी फोडून केला प्रशासनाचा निषेध..

वर्धा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस

- वर्धा जिल्ह्याच्या अनेक भागात वादळी वाऱ्यासह पाऊस

- वर्धा जिल्ह्यातील वर्धा,सेलू, घोराड, देवळी तालुक्यातील परिसराला अवकाळी पावसासह वादळाचा तडाखा

- सेलू तालुक्यातील काही ठिकाणी घरांचे, तसेच गोठ्याचे टीनपत्रांचे छत उडाल्याची माहिती

- घोराड येथे जोरदार हवेमुळे उडालेला पलंग थेट विद्युत खांबाला जाऊन अडकला

- जोरदार हवेमुळे केळी पिकांचेही नुकसान झाल्याची माहिती

- काही ठिकाणी झाडांची पडझड, विद्युत तारा तुटल्याने काही भागात विद्युत पुरवठा प्रभावीत

- उकाड्याने त्रस्त नागरिकांना अवकाळी पावसामुळे दिलासा

- अचानक बदललेल्या वातावरणाचा उन्हाळी पिकांना फटका बसण्याची शक्यता

अमरावतीत मान्सूनपूर्व पावसाची हजेरी...

तब्बल महिनाभराच्या घेण्या उकाड्याने नंतर आज अमरावती जिल्ह्यात पावसाने तात्पुरता दिलासा दिला... सायंकाळी अमरावती शहर आणि जिल्ह्यात वादळीवारासह पावसाची हजेरी पाहायला मिळाली... हा मान्सून पूर्व पाऊस असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे... ग्रामीण भागातील ब्राह्मणवाडा सह रेवसा येथे गारपिटीसह पाऊस झाला.. मागील महिना पासून अमरावती शहर जणू उष्णतेचा भट्टीत भाजून निघत होते.. नागरिक या जीवघेण्या उकाड्यापासून त्रस्त झाले आहेत, कारण दिवसा रात्री गरम हवा चालत होत्या... त्यामुळे सुरू असलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आणि महिनाभरानंतर तात्पुरता दिलासा या माणसांपूर्व पावसाने नागरिकांना मिळाला..

पिंपरी चिंचवड शहर पोलीस आयुक्त कार्यालय परिसरात मोठ झाड कोसळले; 12 दुचाकी झाडाखाली अडकल्या

झाड अचानक कोसळल्याने झाडाखाली पार्क असलेल्या जवळपास दहा-बारा दुचाकी वाहन या झाडाच्या फांद्या खाली दाबल्या गेल्या होत्या. घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड महापालिकेचा अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन झाडे हटविण्याचा कामाला युद्धपातळीवर सुरुवात केली आहे. तसेच चेन सॉ कटर मशीन च्या साह्याने झाडाच्या फांद्या एका बाजूला करून झाडाखाली दाबली गेलेली दुचाकी वाहन अग्निशमन दलाने बाजूला काढून संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.

बकरी ईदच्या दिवशी पुसद ग्रामीण पोलिसांची अवैध शस्त्राविरोधात कारवाई

यवतमाळच्या पुसद ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत सांडवा परिसरात देशी बनावटीचा कट्टा बाळगणाऱ्या एका 25 वर्षीय तरुणास बकरी ईदच्या दिवशी पोलिसांनी अटक केली.शेख अतीक शेख रशीद,राहणार पुसद असे आरोपीचे नाव असून पुसद ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई करत आरोपीकडून देशी कट्टा जप्त केलाय.

भंडाराच्या जुनी पिंपरी चिंचोलीत चक्रीवादळाचा भीषण तडाखा...

भंडारा जिल्ह्यातील जुनी पिंपरी-चिंचोली परिसरात आज दुपारी आलेल्या भीषण चक्रीवादळाने मोठा हाहाकार माजवला आहे. सोसाट्याच्या वाऱ्यांमुळे अनेक घरांची छपरे उडाली असून, दोन जनावरांचा मृत्यू झाला आहे. वादळाचा वेग इतका प्रचंड होता की, घरांवरील पत्रे आणि छपरे अक्षरशः हवेत उडाली. या नैसर्गिक आपत्तीत मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. परिसरातील अनेक विद्युत खांब आणि झाडे उन्मळून पडल्याने संपूर्ण भागातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. या दुर्घटनेनंतर स्थानिक नागरिक हवालदिल झाले असून, प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी येऊन पंचनामा करावा आणि बाधित कुटुंबांना लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.

कसारा रेल्वे स्थानकात महानगरी एक्सप्रेसच्या जनरेटर व्हॅनमधून निघाला धूर

मध्य रेल्वेच्या कसारा रेल्वे स्थानकावर आली असता महानगरी एक्सप्रेसच्या जनरेटर व्हॅन मधून अचानक धूर निघाल्याने प्रवाश्यांमधे घबराट पसरली होती

मध्य रेल्वेच्या कसारा रेल्वे स्थानकात इगतपुरी हुन मुंबई च्या दिशेने जाणारी महानगरी एक्स्प्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर आली असता धूर निघत असल्याचे लक्ष्यात आले जास्त उष्णतेने ब्रेक लायनर गरम होऊन जाम झाल्याने धूर निघाल्याची रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली गार्डने प्रसंगावधान राखत ही माहिती रेल्वे विभागाला दिली रेल्वे कर्मचाऱ्यांनी तत्काळ दाखल होत लायनर केले मोकळे पंधरा मिनिटानंतर गाडी मुंबई च्या दिशेने रवाना झाली.

गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाच्या अहिल्यानगर कार्यालयाचे स्थलांतर होणारच- विखे पाटील

गोदावरी, मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे विभागीय अधीक्षक अभियंता कार्यालय आता अहिल्यानगर ऐवजी शिर्डी मतदारसंघातील लोणी येथे स्थलांतरित होणार आहे.. या निर्णयाला जलसंपदाच्या कर्मचाऱ्यांनी विरोध दर्शवला आहे.. मात्र कामकाजाच्या सोयीसाठी हे करण्यात आल्याचं जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केलं असून, अनेक लोकांना एकाच ठिकाणी बसण्याची सवय झालीये.. काही लोकांना या निर्णयाचा त्रास होईल पण त्याला काही पर्याय नसल्याचे विखे पाटील म्हणालेत..

राज्य शासनाने पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट व सरचार्ज तात्काळ रद्द करण्याचा निर्णय घ्यावा-जयंत पाटील

राज्याचे माजी अर्थमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंतराव पाटील यांनी कठीण आर्थिक परिस्थितीत नागरिकांच्या हिताचा विचार करून राज्य शासनाने पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट व सरचार्ज तात्काळ रद्द करण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

तळेगाव दाभाडेतील गणपती मंदिरात चोरट्याकडून चोरीचा प्रयत्न

मावळच्या तळेगाव दाभाडे शहरातील गणपती चौकातील ऐतिहासिक गणपती मंदिरामध्ये चोरीचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्याला नागरिकांच्या सतर्कतेमुळे पकडण्यात यश आले.

यावेळी संतप्त नागरिकांनी चोराला चांगलाच चोप देत तळेगाव पोलिसांच्या ताब्यात दिले. दरम्यान चोरीची सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात मध्ये कैद झाली आहे.

पावसाळी गटार लाईनमध्ये सांडपाणी सोडणाऱ्यांविरोधात महापालिकेने केली कारवाई

वाघोली मध्ये पुणे-अहिल्यानगर रोडलगत असलेल्या वाघोली परिसरात पावसाळी गटार लाईनमध्ये सांडपाणी सोडणाऱ्यां विरोधात महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. टोयोटा शोरूमकडून पावसाळी गटार लाईनला सांडपाण्याची जोडणी केल्याचे निदर्शनास आल्यानंतर संबंधित शोरूमवर ५० हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली.

इंधन टंचाईची अफवा करून हळदीचे लिलाव बंद करणाऱ्या हिंगोलीच्या बाजार समितीला जिल्हाधिकाऱ्यांची नोटीस

इंधनाचा कोणताही तुटवडा नसताना बाजार समिती बंद का ठेवली याचा 24 तासात खुलासा करण्याचे आदेश

बाजार समितीमध्ये व्यापाऱ्यांनी हळदीचे लिलाव बंद पाडत डिझेल उपलब्ध नसल्याचे कारण देत शेतकऱ्यांचा माल खरेदी करण्यासाठी दिला होता नकार

मालवाहू गाड्यांना डिझेल मिळत नसल्याने व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांची हळद खरेदी न करण्याचा निर्णय घेतल्यानंतर साम टीव्ही ने दाखवली होती बातमी

पुण्यात स्कूल बस ओनर्स असोसिएशनने केली पंधरा ते वीस टक्के भाडेवाढ

देशभरात इंधन दरवाढीचा फटका आता स्कूल बस चालक-मालक आणि पालकांना बसणार आहे. पुणे जिल्हा शहर आणि पिंपरी चिंचवड येथील स्कूल बस ओनर्स असोसिएशनच्या बैठकीत पंधरा ते वीस टक्के भाडेवाढ प्रस्तावित केली आहे. जून महिन्यात सुरू होणाऱ्या सर्व बोर्डांच्या शाळांसाठी सेवा देणारे स्कूल बस, व्हॅन आणि रिक्षा चालकांकडून पंधरा ते वीस टक्के भाडेवाढ करण्यात येणार आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा आक्रमक

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा आक्रमक झालेत.अंतरवाली सराटीत 30 मे पासून मनोज जरांगे पाटील पुन्हा उन्हात बाज टाकून आमरण उपोषण करणार आहे.सरकारला आता वेळ देणार नाही नसून कठोर उपोषण करणार असल्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

अमरावती जिल्ह्यात आज आणि उद्या उष्णतेचा ऑरेंज अलर्ट

अमरावती जिल्ह्यात आजही तापमानाचा पारा ४४ अंश सेल्सिअस

30 तारखेनंतर अमरावती मध्ये पावसाचा इशारा

तीस तारखेनंतर उष्णतेपासून अमरावतीकरांना मिळणार दिलासा

नसरापूर प्रकरणात आरोपी भीमरावविरोधात आरोप निश्चित

नसरापूर अत्याचार अत्याचार प्रकरणातील सगळ्यात मोठी बातमी

28 दिवसात आरोपी भीमराव कांबळे विरोधात आरोप निश्चित

नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणात आरोपीविरोधात आरोप निश्चित

न्यायालयाकडून आरोपीविरोधात prima facie पुरावे असल्याचे निरीक्षण

खटल्याची रोज सुनावणी; सुनावणी ‘इन कॅमेरा’ पद्धतीने होणार

भीमराव कांबळे याला पहिल्यांदाच प्रत्यक्ष कोर्टात हजर करण्यात आलं होतं

पिंपरी-चिंचवड संशयातून प्रियकराची कपड्यांच्या दुकानात घुसून प्रेयसीला बेदम मारहाण

पिंपरी चिंचवड शहरात मोशी परिसरातील एका कपड्यांच्या दुकानात घुसून प्रियकराने आपल्याच प्रेयसीला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

संशयावरून झालेल्या वादातून हा प्रकार घडला असून, संतप्त तरुणाने तरुणीला लाथा-बुक्क्यांनी आणि चापटांनी अमानुषपणे मारहाण केली.

दुधात भेसळ केल्याप्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल

दुधात भेसळ केल्याप्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल

पोमोलीयन तेल यांच्यापासून तयार केलेले कृत्रिम दूध चांगल्या दुधात मिसळून कृत्रिम रित्या वाढवत होते

सोमनाथ माळी वय 32 राहणार भवरखेडा असx ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव

कुकडी प्रकल्पातील डिंभेसह धरणांतील पाणीसाठा झपाट्याने घटला

कुकडी प्रकल्पातील धरणांमध्ये केवळ १४ टक्के पाणीसाठा शिल्लक असून सर्वात मोठ्या डिंभे धरणातही अवघा १३ टक्के पाणीसाठा उरल्याने भविष्यात पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.उत्तर पुणे जिल्ह्यासह आहिल्यानगर जिल्ह्यासह जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या कुकडी प्रकल्पातील धरणांचा पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत आहे. वाढते तापमान आणि कडाक्याच्या उन्हामुळे धरणांतील पाणी झपाट्याने आटत असल्याचे चित्र दिसत आहे.

नीट पेपरफुटी प्रकरण; मनोज शिरुरेच्या लातूर मधल्या फ्लॅटवर भरायचे "विशेष क्लासेस"

शिरुरेच्या फ्लॅटवर प्राध्यापक प्रल्हाद कुलकर्णी घ्यायचा क्लासेस

मोटेगावकर क्लासेस मध्ये सुद्धा होती "प्लॅटिनम गोल्ड बॅच"

प्लॅटिनम गोल्ड बॅचसाठी विद्यार्थ्यांकडून आकारले जायचे भरमसाठ शुल्क

कुलकर्णी - मोटेगावकर - शिरुरे नेक्ससबाबत सी बी आय कडून तपास सुरू

पुण्यातील येरवडा जेलमध्ये कायद्यांची तुफान हाणामारी

तंबाखूच्या कारणावरून कैद्यांमध्ये हाणामारी

अजय राठोड आणि संतोष भालेराव या दोन कैद्यानी शुभम पोखरकर याला कारागृहात हाणामारी केली आहे

येरवडा पोलीस स्टेशन मध्ये जीव घेणे हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला

अनेर नदीच्या पुलावर भीषण अपघात, कठडे तोडून मालवाहू ट्रक थेट नदीत चालक गंभीर जखमी

अंकलेश्वर–बऱ्हाणपूर महामार्गावरील अनेर नदीच्या पुलावर आज पहाटे भीषण अपघात घडला, शिरपूरहून चोपड्याकडे भरधाव जाणाऱ्या मालवाहू ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रकने पुलावरील कठडे तोडत थेट नदीपात्रात झेप घेतली, जोरदार आवाजामुळे परिसरातील नागरिक घटनास्थळी धावले, अपघातात ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून चालक गंभीर जखमी झाला आहे, जखमी चालकास तत्काळ बाहेर काढून शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी टळली आहे.

मनोज जरांगे पाटील उपोषण करण्यावर ठाम 

माझा उष्माघातमुळे बळी गेला तर सरकार जबाबदार असेन. पण मी उपोषण करणार असल्याचं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाचे एल्गार केला आहे.

संगमनेरमध्ये अंगावर वीज पडून तरुण शेतकऱ्याचा जागीच मृत्यू

- संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पठार परिसरात काल वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसात दुर्दैवी घटना घडली आहे.. गिर्हेवाडी येथील मच्छिंद्र झुंबर दुधवडे या तरुण शेतकऱ्यावर वीज अंगावर पडून जागीच मृत्यू झालाय. काल सायंकाळी संगमनेर तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यामुळे नागरिकांची एकच धावपळ उडाली. दरम्यान, पाऊस सुरू झाल्याने मच्छिंद्र दुधवडे हे मोटारसायकलवरून घराकडे निघाले होते.. घरी पोहचण्यासाठी काही अंतर असताना अचानक आकाशातून वीज त्यांच्या अंगावर कोसळली. या भीषण घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मंचरमध्ये पांडवकालीन बारव आणि दर्गा वादावरून तणाव; शहरात जमावबंदी, पोलिसांचा तगडा बंदोबस्त!

ईदनिमित्त वक्फ बोर्डाने मुस्लिम समाजाला या ऐतिहासिक बारव परिसरात नमाज पठणाची परवानगी दिल्याने हिंदू संघटना आक्रमक झाल्या असून नवा वाद उफाळून आला आहे. या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून प्रशासनाने संपूर्ण मंचर शहरात जमावबंदी लागू केली असून ठिकठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, लोकप्रतिनिधींच्या नेतृत्वात काढण्यात येणारा जनआक्रोश मोर्चा सध्या स्थगित करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली जात असली तरी मंचरमध्ये तणावपुर्ण वातावरण आहे

पुण्यातील जनता वसाहतमध्ये गाड्यांची तोडफोड

पुण्यातील जनता वसाहत मध्ये गाड्यांची तोडफोड

पर्वती पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गाड्यांची तोडफोड

कोयत्याने केले गाड्यांची तोडफोड

जनता वसाहत मधी दहशत वाजवण्याचा प्रयत्न

दोन चाकी चार चाकी टेम्पो गाडीची तोडफोड

उल्हासनगरात ऑनलाइन पेमेंटच्या बहाण्याने दुकानदाराला गंडा

उल्हासनगरच्या कॅम्प ३ मधील टील्सन मार्केटसमोर दिशा मशिनरी या दुकानात ऑनलाइन पेमेंटच्या नावाखाली तब्बल साडेसहा हजार रुपयांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. दोन जणांनी दुकानदाराला गंडा घालत पाण्याची मोटार घेऊन पलायन केलं असून संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

भागूरच्या सावरकर वाड्यात आज सावरकर जयंतीचा उत्साह

* भागूरच्या सावरकर वाड्यात आज सावरकर जयंतीचा उत्साह

* दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन

* सावरकर वाड्यापासून शोभायात्रा देखील काढणार

* तर सावरकर वाड्यात आज दिवसभर सावरकरांनी रचलेल्या कवितांचे वाचन आणि गायन होणार

* सावरकरांच्या प्रतिमेची आरती देखील होणार

* भगूरच्या सावरकर वाड्यात सावरकरप्रेमींची गर्दी

मिरारोडच्या पुनम क्लस्टर इमारतीच्या समोर शांततापूर्ण वातावरण

मिरारोडच्या पुनम क्लस्टर इमारतीच्या समोर शांततापूर्ण वातावरण

इमारतीच्या बाहेर पोलिसांचा चौक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे

कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी विशेष खबरदारी घेतलेली आहे.

Pune : मंचरमधील पांडवकालीन बारव-दर्गा वाद तापला

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे पांडवकालीन बारव आणि दर्गा परिसरावरून पुन्हा वाद उफाळण्याची चिन्हे दिसत आहेत.

ईद निमित्ताने वक्फ बोर्डाकडून नमाज पठणास परवानगी दिल्याच्या निषेधार्थ आज हिंदू जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आमदार संग्राम जगताप आणि संग्रामबापू भंडारे महाराज यांनी दिली आहे.

आमदार चिखलीकरांनी मध्य रात्री घेतली खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट

आमदार चिखलीकरांनी मध्य रात्री घेतली खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट

बंद दाराआड झाली राजकीय चर्चा

नांदेड विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार नाही.असं वाटतं - चिखलीकरांच्या वक्तव्याने नांदेड मध्ये महायुतीत आलबेल नसल्याचे चित्र.

Buldhana : खामगाव ग्रामीण पोलिसांची गोडाऊन वर कारवाई

खामगाव ग्रामीण पोलिसांची गोडाऊन वर कारवाई ..

गोडाऊन मधून ४ किलो गांजासह 47 कट्टे तांदूळ जप्त ..

राशनचा तांदूळ असल्याचा संशय, एक आरोपी ताब्यात

Pune : अल्पवयीन मुलांच्या हाती गाडी दिल्यास तुरुंगवास

अल्पवयीन मुलांच्या हाती गाडी दिल्यास तुरुंगवास

25 हजार रुपयांचा दंडही होणार

गाडी चालवण्याचे वायरल व्हिडिओ पाहून पुणे आरटीओचा इशारा

Pune : धनकवडीत चेहऱ्यावर ‘स्प्रे’ मारून २६ लाख लुटले

एका दुचाकीस्वाराच्या चेहऱ्यावर चोरट्यांनी स्प्रे मारून, २६ लाखांची रोकड असलेली बॅग हिसकावून नेली.

ही घटना धनकवडी परिसरात घडली.

या प्रकरणी सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Kalyan : कल्याणमध्ये दुर्गाडी किल्ल्यावर शिंदेसेनेचे आंदोलन

कल्याणमध्ये दुर्गाडी किल्ल्यावर शिंदेसेनेचे आंदोलन

दरवर्षी कल्याणमध्ये दुर्गाडी किल्ल्याजवळ नमाज पडला जातो

याचा निषेध म्हणून कल्याणमध्ये दुर्गाडी किल्ल्यावर शिंदेसेनेचे आंदोलन

साताऱ्याच्या राजकारणात उदयन राजे पुन्हा ऍक्टिव्ह मोडवर

साताऱ्याच्या राजकारणात उदयन राजे पुन्हा ऍक्टिव्ह मोडवर...

रक्षक प्रतिष्ठानच्या बैठकीतून उदयन राजेंचे मोठे संकेत..

विधान परिषदेच्या निवडणुकीच्या तोंडावर राजे पुन्हा ऍक्टिव्ह मोडवर आल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

संजय ऑइल ट्रेडिंग कंपनीचे गोदाम जळून खाक

रायगडच्या महाड बाजार पेठेतील संजय ऑईल ट्रेडींग कंपनीच्या गोदामाला मध्यरात्री भिषण आग लागली. खाद्य तेलाचा मोठ्या प्रमाणात साठा असल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्नीशमन दलाला मोठी मेहनत करावी लागली. दरम्यान या आगीत संपूर्ण गोदाम आणि लगत असलेल एक घर जळून खाक झाले. सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. महाड नगर परिषद, महाड MIDC सह इतर कारखान्यांचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले होते.

यवतमाळ जिल्ह्यात शेतकऱ्यांना आठ कोटीचे बियाणे मिळणार मोफत

यवतमाळ जिल्ह्यात शेतकऱ्यांना आठ कोटीचे बियाणे मिळणार मोफत

सोयाबीन बियाणासाठी केंद्र शासनाची उपायोजना

14 हजार क्विंटल बियाणे बाजारात, महाडीबीटी पोर्टलवर करता येणार अर्ज

Bhanadara : भंडाऱ्यात तीन दिवसात वाघाचा दुसरा बछडा मृतावस्थेत आढळला

भंडारा जिल्ह्यातून वन्यजीव प्रेमींची चिंता वाढवणारी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे.

अड्याळ वन परिक्षेत्रातील पिलांद्री भागात अवघ्या दोन महिन्यांच्या वाघाच्या बछड्याचा मृतदेह आढळल्यानं वन विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

विशेष म्हणजे, गेल्या तीन दिवसांतील बछड्याच्या मृत्यूची ही दुसरी घटना आहे.

ईदच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांच्या कडक बंदोबस्त

कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी डेक्कन पोलिसांकडून रूट मार्च

पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता आणि जंगली महाराज रस्ता या ठिकाणी पोलिसांनी काढला रूट मार्च

डेक्कन पोलिस ठाण्याचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी यावेळी होते उपस्थित

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com