Maratha Protest  Saam tv
महाराष्ट्र

Maratha Protest : धाराशिवमध्ये मराठा समाज आक्रमक; आंदोलकांनी रस्त्यावर उतरत जाळले टायर

Vishal Gangurde

बालाजी सुरवसे, साम टीव्ही प्रतिनिधी

धाराशिव : धाराशिव जिल्ह्यात सकल मराठा समाज आक्रमक झाला आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती उत्सवादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केल्याच्या निषेधार्ध समाज आक्रमक झाला. या लाठीचार्जच्या विरोधात एकत्र येत मराठा समाजाच्या आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. या घटनेनंतर जिल्ह्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धाराशिवमध्ये सकल मराठा समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. धाराशिवमध्ये संभाजी महाराज यांच्या जयंतीच्या कार्यक्रमादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्यानंतर मराठा समाजाच्या आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेत लाठीचार्ज केल्याच्या निषेधार्थ रस्त्यावर टायर जाळले.

पोलिसांनी लाठीचार्ज केल्याच्या कारणावरून मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. मराठा समाजाच्या आंदोलकांनी पोलीस अधिक्षक कार्यालयासमोर एकत्र येत जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलकांनी पोलीस अधिक्षक कार्यालयासमोरील रस्त्यांवर टायर जाळले. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल राठोड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

दरम्यान, पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जच्या विरोधात मराठा समाजाने आक्रमक भूमिका घेत मोठ्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोहोचले. यावेळी घोषणाबाजी केलील. त्यानंतर समाजाच्या कार्यकर्त्यांनी पोलिस अधिक्षकांना निवेदन दिल्यानंतर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. त्यानंतर त्यांनी लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी केली.

मराठा समाजाकडून बेमुदत बंदचा इशारा

लाठीचार्ज करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर रविवारपर्यंत कारवाई न केल्यास मराठा समाजाकडून सोमवारपासून बेमुदत धाराशिव बंदचा इशारा दिला आहे. देवेंद्र फडणवीस, प्रशास आणि जिल्हाधिकाऱ्यांनी संबधितावर लवकरात लवकर कारवाई करावी. उत्सवादरम्यान डिजेच्या रेडीएटरवर मारुन फोडल्याचा समाज बांधवांचा आरोप आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Governemnt Job: अन्न आणि औषध प्रशासनात नोकरीची सुवर्णसंधी; महिना १,१२,००० रुपये पगार; जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंचा डबल धमाका, महायुतीला 'दे धक्का',भाजप- राष्ट्रवादीचे २ बडे नेते शिवबंधन बांधणार; आज मातोश्रीवर पक्षप्रवेश

Viral Video: ना रोमान्स, ना कपल डान्स; दिल्ली मेट्रोत आता कुटाकुटी, viral video

Maharashtra Politics : गुहाटीवरून परतलेल्या ठाकरेंच्या शिल्लेदाराच्या मतदारसंघात काय घडतंय? वंचित'चं ठरलं, महायुतीत रस्सीखेच सुरूच

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी मिळणार? समोर आली मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT