Maharashtra Live News Update: धनंजय मुंडेंना मोठा दिलासा करुणा शर्मा मुंडे यांची याचिका परळीच्या न्यायालयाने फेटाळली

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates: आज बुधवार, दिनांक ३१ डिसेंबर २०२५, वर्षाअखेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त, महायुती आणि मविआमध्ये जागावाटप, राज्यात थंडी ओसरली, आजच्या ताज्या बातम्या, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live News Update
Maharashtra Live News UpdateSaam tv
Published On

धनंजय मुंडेंना मोठा दिलासा विधानसभा निवडणुकीच्या शपथपत्राविरोधातील करुणा शर्मा मुंडे यांची याचिका परळीच्या न्यायालयाने फेटाळली

धनंजय मुंडे यांच्या विधानसभा निवडणुकीतील शपथपत्राविरोधात दाखल करण्यात आलेली करुणा शर्मा मुंडे यांची याचिका परळी येथील प्रथमवर्ग न्यायालयाने फेटाळून लावली आहे. करुणा शर्मा मुंडे यांनी लोकप्रतिनिधी अधिनियमाच्या अंतर्गत ऑनलाइन पद्धतीने ही याचिका दाखल केली होती.

असलम शब्बीर शेख उर्फ बंटी जहागिरदार याचा उपचारादरम्यान मृत्यू

बंटी जहागिरदारवर श्रीरामपूर शहरात भर दुपारी अज्ञात हल्लेखोरांनी केला होता गोळीबार

माजी उप महापौर लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद

भाजप सोडून ऐनवेळी शिंदेंच्या शिवसेनेकडून उमेदवारी केली होती दाखल

भुसावळात शहरात हॉटेल मधील भांडणाच्या कारणावरून गोळीबार

जळगांव - जिल्ह्यातील भुसावळ येथे जुना सातारा भागात हॉटेल मधील भांडणाचा कारणावरून तरुणांनी मारण्याचा उद्देशाने पिस्टलमधुन गोळी झाडली त्यावेळी सदर आरोपीला हाताला हात लागल्यामुळे अनर्थ टळला आहे.सदरील घटना घडली असून पोलिसांनी तरुणाांना ताब्यात घेतले आहे.याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी आरोपींना न्यायालयात हजर केले असता तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

पुण्यात टोळक्याकडून कोयत्याने वाहनांची तोडफोड

पुण्यातील मंगळवार पेठेतील कमला नेहरू हॉस्पिटलच्या मागील परिसरात, कागदीपुरा ते संग्राम चौक दरम्यान काही अज्ञात तरुणांनी हातात मोठे कोयते आणि पालघन घेऊन दहशत माजवली. हा सगळा प्रकार रात्री १.३० वाजता घडला.

या टोळक्याने परिसरातील टेम्पो, रिक्षा आणि दुचाकींची तोडफोड केल्याने संपूर्ण भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून, घटनेत अनेक मेहनती रिक्षा व टेम्पो चालकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही सर्व घटना सी सी टिव्ही मध्ये कैद झाली आहे.

Parbhani: परभणीत एकनाथ नगर येथील रहिवाशांचा मतदानावर बहिष्कार

परभणी-

परभणीत एकनाथ नगर येथील रहिवाशांचा मतदानावर बहिष्कार

परभणीत 1986 पासून मूलभूत सुविधा नसल्याने एकनाथ नगर येथील रहिवाशांनी टाकला चक्क मतदानावर बहिष्कार

Chandrapur: चंद्रपूरमध्ये  भाजपचे महानगर अध्यक्ष कासनगोट्टुवार यांना पदावरून हटवले

चंद्रपूर -

भाजपचे महानगर अध्यक्ष कासनगोट्टुवार यांना पदावरून हटवले

प्रदेशाध्यक्षांची उमेदवार यादी बदलणे भोवले

Pune: पुण्यातील नाराज भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांची पोस्ट चर्चेत

पुणे -

"कुछ कह गए, कुछ सह गए, कुछ कहते-कहते...भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांची पोस्ट

भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी केली फेसबुक पोस्ट

मेधा कुलकर्णी यांची नाराजी आली समोर

जवळच्या सहकाऱ्यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केली खंत?

पुणे महापालिका निवडणुकीसाठी काल अनेकांनी केले उमेदवारी अर्ज दाखल

Nashik: शिवसेनेच्या उमेदवारांचे अर्ज बाद करा, निवडणूक अधिकाऱ्यांकडे भाजपची मागणी

नाशिक -

- निवडणूक अधिकाऱ्यांकडे भाजपची मोठी मागणी

- ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांचे अर्ज बाद करा

- एबी फॉर्मवर डिजिटल स्वाक्षरी असल्यानं बाद करण्याची केली मागणी

- भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांनी केला पत्रव्यवहार

- भाजपने केलेल्या मागणीवर निवडणूक अधिकारी काय निर्णय घेतात याकडं लक्ष

Mumbai: मुंबईतील भाजप उमेदवाराचा अर्ज रद्द करण्याची मागणी, अनधिकृत बांधकामाचा आरोप

वार्ड ८७ मध्ये राजकारण तापले

भाजप उमेदवार महेश पारकर यांच्यावर अनधिकृत बांधकामाचा आरोप

अपक्ष उमेदवार पवार यांची अर्ज रद्द करण्याची मागणी

पुण्यात शिवसेना पक्ष काँग्रेसला विकला, कार्यकर्त्याचे ठाकरेंना पत्र

ठाकरेंच्या शाखा प्रमुखाने थेट उद्धव ठाकरे यांना पाठवले पत्र

पुण्यात शिवसेनेने काँग्रेस सोबत युती केली मात्र समाधानकारक जागा मिळाल्या नाही, शाखा प्रमुखाचा आरोप

त्यामुळे शाखा प्रमुख शशिकांत साटोटे यांनी पत्र लिहून उद्धव ठाकरे यांना पोस्टाने पाठवले आहे आणि खंत व्यक्त केली आहे

मालेगाव इस्लाम पार्टीच्या उमेदवार बिनविरोध

नाशिकच्या मालेगाव मधील मालेगाव मध्य च्या प्रभाग क्रमांक 6 च्या हजार खोली भागातील इस्लाम पार्टीच्या उमेदवार मुनिरा शेख ह्या बिनविरोध निवडून आल्या,त्याच्या विरोधात असलेल्या महिला उमेदवाराने 2 भागात उमेदवारी अर्ज दाखल केले होते,मात्र आज छाननी दरम्यान त्यांचा एक अर्ज बाद झाल्याने मुनिरा शेख ह्या बिनविरोध निवडून आल्याने माजी आमदार आसिफ शेख यांच्या इस्लाम परतीचा पहिला नागरसेव निवडून आल्याने कार्यकर्त्यांनी जल्लोष केला

पुण्यात भाजपने दिली सर्वाधिक महिलांना उमेदवारी

सर्वसाधारणमधून पुरुषांना वगळून ९ महिलांना दिली संधी

१६५ पैकी तब्बल ९० महिलांना भाजपाने निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे

यंदांच्या निवडणुकीतील पक्षातील सर्वाधिक महिलांना संधी दिलेला हा भाजप एकमेव पक्ष

निवेदिता एकबोटे

संगीता दांगट

अर्चना जगताप

विनया बहुलिकर

कविता वैरागे

वीणा घोष

पल्लवी जावळे

रेश्मा भोसले

रंजना टिळेकर

Amravati: अमरावतीमध्ये अजित पवार गटाचे सर्वाधिक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

अजितदादा गटाचे सर्वाधिक अमरावती महानगरपालिकेत उमेदवार रिंगणात

87 पैकी 85 उमेदवार घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवणार

दोन जागेसाठी उबाठासोबत युती

पनवेल आणि नवी मुंबईच्या फार्म हाऊस वर पोलिसांची नजर

नवी मुंबईमध्ये नववर्षाच्या स्वागतासाठी पोलिसांकडून अडीच हजार पेक्षा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे तसेच पनवेल आणि नवी मुंबईच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात फार्म हाऊस असल्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा पोलिसांची नजर असणार आहे त्या ठिकाणी नवी मुंबई क्राईम ब्रांच लक्ष असणार आहे

ठाकरेंच्या सेनेतून भाजपमध्ये गेलेल्या सुधाकर बडगुजर यांची भाजपमध्ये खेळी

- विद्यमान आमदार सीमा हिरे यांच्या समर्थकांना डावलत सुधाकर बडगुजर यांना एकाच घरात तीन उमेदवाऱ्या

- सुधाकर बडगुजर स्वतः त्यांचा मुलगा दीपक बडगुजर आणि पत्नी हर्षा बडगुजर यांना भाजपकडून उमेदवारी

- हर्ष बडगुजर यांच्या जागेवर आमदार सीमा हिरे समर्थक भाग्यश्री ढोमसे यांनाही पक्षाने दिला होता एबी फॉर्म

- मात्र हर्षा बडगुजर यांचा उमेदवारी अर्ज अगोदर आल्याने तो ठरला वैध

- आमदार सीमा हिरे समर्थकांसह कार्यालयात दाखल

सोलापुरात शिंदेसेना,काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये वाद

सोलापुरात शिंदेसेना,काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये सुरूय वाद

आज मनपा निवडणूक उमेदवारांच्या अर्ज छाणनीसाठी उमेदवारांच्या वकिलांना गेटच्या आत सोडत नसल्याने सुरूय वाद

पोलीस आणि शिंदेसेना - काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये सुरु आहे वाद

पनवेल मध्ये भाजपचा उमेदवार बिनविरोध

पनवेल मध्ये भाजपचा उमेदवार बिनविरोध

शेकापचा अर्ज बाद झाल्याने प्रभाग क्रमांक 18 मधून नितीन पाटील बिनविरोध

पनवेल महानगरपालिकेत भाजपने खाते खोलले आहे.

भाजपने तिकीट कापलं, कार्यकर्त्याने थेट शापच दिला

भाजपने तिकीट कापलं भाजप कार्यकर्त्याने थेट शापच दिला

मुरलीधर मोहोळ, योगेश टिळेकरांवर भाजप कार्यकर्ता भडकला

भाजपचे हडपसर विधानसभा मतदारसंघाचे झोपडपट्टी आघाडीचे अध्यक्ष युवराज कुचेकर यांचा मोहोळ टिळेकर यांच्यावर संताप

मी 22 वर्षांपासून भाजप मध्ये काम करतोय पण भाजपने माझ्यावर अन्याय केलाय

काँग्रेसचे आयात उमेदवार आमच्या बोकांडी आणून ठेवलेत

आमदाराने सांगितलं त्या मुरली मोहोळने केलंय मुरली अण्णा मोहोळ म्हणाला तुमच्या योगेशअण्णा टिळेकरने केलंय

नागपुरातील सुप्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. चंद्रशेखर पाखमोडे यांचं निधन

- नागपुरातील सुप्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. चंद्रशेखर पाखमोडे यांचं निधन

- हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या ५० व्या वर्षी डॉ. चंद्रशेखर पाखमोडे यांचं निधन

- २५ वर्षांहून अधिक काळाच्या प्रदीर्घ सेवाकाळात त्यांनी अनेकांना जीवनदान दिलंय

- आरोग्य क्षेत्रात त्यांच्या जान्याने शोककळा पसरली

कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोस्टर वॉर

पोस्टरच्या माध्यमातून महाविकास आघाडीला महायुतीचा प्रत्युत्तर

काँग्रेसच्या कोल्हापूर कस्सं तुम्ही म्हणाल तस्सं या टॅगलाईनला महायुतीचं जोरदार प्रत्युत्तर

सत्ता असताना भरलं खीसं... आता म्हणताय कोल्हापूर कसं ?

कोल्हापूरच्या प्रवेशद्वाराजवळ झळकले बॅनर्स

मंदाकिनी खामकर यांची संधी हुकली!

मंदाकिनी खामकर यांची संधी हुकली!

हातात एबी फॉर्म असूनही मंदाकिनी खामकर यांची संधी हुकली

फॉर्म भरण्यास उशीर झाल्याने संधी हुकली

बोईसर ग्रामीण रुग्णालयाच्या उभारणीचा प्रश्न अखेर सुटला

अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या बोईसर ग्रामीण रुग्णालयाच्या उभारणीचा प्रश्न अखेर सुटला आहे. या रुग्णालयासाठी १८ कोटी ५४ लाख ४३ हजार ४३० रुपयांच्या निधीला प्रशासकीय मंजुरी मिळाली असून, यामुळे अनेक वर्षांपासून आरोग्य सुविधांअभावी त्रस्त असलेल्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. संजयनगर भागातील आरक्षित जमिनीवर आता या रुग्णालयाची हक्काची इमारत उभी राहणार असून रुग्णालयात दर्जेदार मोफत आरोग्य सेवा उपलब्ध केली जाणार आहे .

BJP: भाजपने उमेदवारी नाकारल्यानंतर माजी नगरसेवक किरण बारटक्के आक्रमक

भाजपने उमेदवारी नाकारल्यानंतर माजी नगरसेवक किरण बारटक्के आक्रमक झाले

सोशल मीडियावर त्यांची पोस्टर व्हायरल झाली

शेवटच्या क्षणी त्यांनी राष्ट्रवादीतून उमेदवारी मिळवली.

त्यांच्या असंच कार्यकर्त्यांनी भाजपचा निषेध नोंदवला

कार्यकर्ते आक्रमकपणे आपल्या भावना व्यक्त केल्या ..

Maharashtra: महाराष्ट्राच्या दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणमाळ येथे पर्यटकांची गर्दी...

महाराष्ट्रातील क्रमांक दोन चे थंड हवेचे ठिकाण असलेले नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ येथे 31 डिसेंबर आणि नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. तोरणमाळ येथे रात्रीच्या ववेळेत तापमान 8 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचत असून कडाक्याची थंडी मुळे दिवसभर धुक्याची चादर राहत आहे. तोरणमाळ येथे असलेल्या महादेव मंदिर , गोरक्षनाथ मंदिर आणि प्रसिद्ध सुताखाई पॉईंट, यशवंत तलाव, या पर्यटन स्थळावर पर्यटकांची गर्दी वाढली असून महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि गुजरात राज्यातील पर्यटज मोठ्या संख्येने तोरणमाळ मध्ये दाखल झाले आहे. तोरणमाळची खासियत असलेल्या यशवंत तलावात बोटिंग करताना पर्यटक दिसून येत आहेत.

Pune: किल्ल्यांवर 'थर्टी फर्स्ट'ला बंदी

गैरप्रकार टाळण्यासाठी वन विभागाकडून गस्त,बंदोबस्तात वाढ

पुणे परिसरातील टेकड्या, संरक्षित वनक्षेत्र आणि जिल्ह्यातील किल्ल्यांच्या परिसरात विभागातर्फे आज सकाळपासूनच गस्त वाढविण्यात येणार आहे.

नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जंगल, टेकड्यांवर मद्यपानासह होणारे गैरप्रकार टाळण्यासाठी वन विभागातर्फे रात्रीही बंदोबस्त वाढविण्यात येणार आहे. सिंहगड,राजगड-तोरणा, लोहगड, विसापूर, राजमाची अशा विविध किल्ल्यांवर ३१ डिसेंबरला मुक्काम करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला होणारे गैरप्रकार टाळण्यासाठी 66 भांबुर्डा, तळजाई, वारज्यासह उपनगरांतील वन विभागाच्यां सर्व टेकड्यांवर आम्ही गस्त वाढवली..

वन क्षेत्रात कोठेही पार्त्या होणार नाहीत, याची काळजी आम्ही घेणार आहोत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल.

करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात भाविकांची गर्दी

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी लाखो पर्यटक विविध पर्यटन स्थळांसह मंदिरांमध्ये दर्शनासाठी पोहोचलेले आहेत. कोल्हापुरातील करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात देखील हजारो भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केलेली आहे. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रणजीत माजगावकर यांनी.

Tuljabhavani: तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवानिमित्त जलदिंडी आयोजन

महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवातील मुख्य आकर्षण असलेल्या जल दिंडीचे तुळजापुरात आयोजन करण्यात आले.शाकंभरी नवरात्रानिमित्त निघणारी ही जल यात्रा देवीच्या उपासनेत विशेष महत्त्वाची मानली जाते. पारंपरिक वेशभूषा,आणि ढोल-ताशांच्या गजरात ही दिंडी पापनास कुंडाकडून तुळजाभवानी मंदिराकडे मार्गस्थ झाली.डोक्यावर कलश,ओठांवर देवीचं नाव आणि मनात अपार श्रद्धा…या जल यात्रेत हजारो महिला भाविक डोक्यावर कलश घेऊन सहभागी झाल्या असून, संपूर्ण तुळजापूर नगरी भक्तीरसात नाहुन गेल्याचे दृश्य पाहायला मिळत आहे. महत्त्वाचे म्हणजे विविध भाज्या एकत्र करून शाकंभरी देवीची मूर्ती साकारली जाते.पापनास पासून तुळजाभवानी मंदिरापर्यंत या देवीची मोठ्या जल्लोषात मिरवणूक काढली जाते.

अजित पवारांचा बीड दौरा ऐनवेळी रद्द ;1 हजार विकासकामांचे भूमिपूजन लांबणीवर

उपमुख्यमंत्री अजित पवारांचा आजचा बीड दौरा अचानक रद्द झाल्याने जिल्ह्याच्या राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. नगरपरिषद निवडणुकांमधील दणदणीत यशानंतर उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार आज पहिल्यांदाच बीड दौऱ्यावर येणार होते. सकाळी सहा वाजल्यापासून कार्यक्रमांची मालिकाच नियोजित होती. तब्बल 1 हजार विकासकामांची घोषणा तथा भूमिपूजन शहरातील छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावरती उभारण्यात आलेल्या मंडपातून बीडकरांना संबोधित करत ते करणार होते. तसेच सहकार भवनचे भूमिपूजन, टेनिस कोर्टचे उद्घाटन, मच्छिंद्रनाथ गड विकास आराखडा, औद्योगिक क्षेत्र, वन पर्यटन प्रकल्पांचे सादरीकरण आणि जिल्हा रस्ता सुरक्षेचा आढावा घेण्याचा कार्यक्रम होता. आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण आणि सशस्त्र ध्वज निधी संकलनातील राज्यात प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल विशेष सोहळाही नियोजित होता. मात्र ऐनवेळी महापालिका निवडणुका आणि कॅबिनेट बैठकीमुळे हा दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपकडून उमेदवारी मिळाली नाही म्हणून दोन महिला पदाधिकाऱ्यांचे अन्नत्याग आंदोलन

भाजपकडून उमेदवारी मिळाली नाही म्हणून दोन महिला पदाधिकारी अन्नत्याग आंदोलन करत आहेत

ज्यांना उमेदवारी दिली आहे, त्यांची उमेदवारी रद्द करावी

आमचा पक्षावर राग नाही तर स्थानिक नेत्यावर राग,

वर्षा साळुंके आणि दिव्या मराठे महिलांचे नावे

Nashik: नाशिक महापालिका निवडणुकीसाठी 122 जागांसाठी तब्बल 2357 उमेदवारांनी भरला अर्ज

- नाशिक महापालिका निवडणुकीसाठी 122 जागांसाठी तब्बल 2357 उमेदवारांनी भरला अर्ज

- काल उमेदवारी दाखल करण्यासाठी होता शेवटचा दिवस

- महापालिकेच्या सर्व विभागीय कार्यालयांमध्ये शेवटच्या दिवशी इच्छुकांनी आपल्या समर्थकांसह गर्दी करत भरला उमेदवारी अर्ज

- नाशिक महापालिका निवडणुकीत 2357 उमेदवार रिंगणात

- अर्ज माघारीपर्यंत किती उमेदवार अर्ज माघारी घेतात, याकडे लक्ष

आरपीआयचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे लढवणार कारागृहातून निवडणूक

नाशिकच्या सातपूरमधील एका पबमध्ये गोळीबार केल्याप्रकरणी अटकेत असलेले आरपीआय आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष आणि माजी नगरसेवक प्रकाश लोंढे यांनी अखेरीस प्रभाग क्रमांक ११ मधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. न्यायालयाने त्यांना आपले प्राधिकृत देण्यात आलेल्या व्यक्तिमार्फत त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्याच्याबरोबर त्यांची सून माजी नगरसेविका दीक्षा लोंढे यांनी देखील याच प्रभागातून अर्ज दाखल केला आहे. ​प्रकाश लोंढे यांनी रिपाई आठवले गटाच्या माध्यमातून नगरसेवकपद भूषवले आहे. मागच्या वेळी प्रभाग क्रमांक ९ मधून निवडणूक लढवली होती. त्यावेळी भाजप उमेदवाराने त्याचा पराभव केला होता. मात्र, सध्याच्या प्रभाग क्रमांक ११ मधून त्याची सून दीक्षा लोंढे यांनी विजय मिळवला होता. दोन ते अडीच महिन्यांपूर्वी आयटीआय सिग्नलजवळील एका पबमध्ये गोळीबार प्रकरणी पोलिसांनी प्रकाश लोंढे, मुलगा दीपक लोंढे आणि भूषण लोंढे याच्यासह अनेक सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला. त्यानंतर पोलिसांनी या टोळी विरोधात मकोका लागू केला असून सध्या ही टोळी नाशिकरोड कारागृहात स्थानबद्ध आहे. मात्र महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रकाश लोंढे याने इच्छा प्रदर्शित केल्यानंतर न्यायालयाच्या निर्देशानुसार परशुराम साठे यांच्या मार्फत त्याने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

ऐन वेळेवर उमेदवारी नाकारल्याने नाराज झालेले जाधव यांनी कार्यकर्त्यांसह केला राष्ट्रवादीत प्रवेश

ऐन वेळेवर उमेदवारी नाकारल्याने नाराज झालेल्या भाजपचे महानगर चिटणीस क्षितिज जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीचे नेते आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वात असंख्य कार्यकर्त्यांसह प्रवेश केला आहे. गेल्या दहा वर्षांपासून जाधव हे भारतीय जनता पक्षात काम करत होते. वेगवेगळ्या पदावर त्यानी काम केलं मात्र ऐन वेळेवर उमेदवारी नकारल्याने जाधव यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यासह राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला आहे.

Solapur: सोलापुरात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या निवडणूक प्रमुखांचा राजीनामा

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे निवडणूक प्रमुख सुधीर खरटमल यांचा राजीनामा

निवडणूक पूर्वी सुधीर खरटमल यांनी शरद पवार गटाच्या शहराध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन अजित पवार गटात आले होते

अजित पवार गटात आल्यानंतर त्यांना निवडणूक प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली होती

मात्र खरटमल यांनी ऐन निवडणुकीत पक्षाचा आणि निवडणूक प्रमुख पदाचा ही राजीनामा दिलाय

Yavatmal: नव्या वर्षाचा आनंद कायदा पाळूनच करा; जिल्हा पोलीस अधीक्षक

सरत्या वर्षाला निरोप आणि नव्या वर्षचा जल्लोष करतांना कायदा व सुव्यवस्था बाधित होणार नाही आणि कायद्याच्या चौकटीत राहून जल्लोष करावा असे आवाहन यवतमाळचे जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी केले असून रात्री आठ वाजेपासून तर पहाटेपर्यंत शहरासह ग्रामीण भागातील प्रमुख ठिकाणी पोलिसांची गस्त राहणार आहे मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या थेट गुन्हा दाखल होणार आहे.नववर्षाचा आनंद हा कायदा पाळूनच साजरा करावा असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Pune: पुणे विमानतळावरून तीन विमाने झाली रद्द

दाट धुक्याचा विमान कंपन्यांना फटका

पुणे विमानतळावरून तीन विमाने झाली रद्द

दिल्ली , अमृतसर , आणि लखनौ जाणारी विमान झाली रद्द

दाट धुक्याने धावपट्टी दिसत नसल्याने विमान सेवेवर परिणामन

उत्तर भारतात थंडी मोठ्या प्रमाणावर असल्याने विमान सेवेला फटका

31st December: ३१ डिसेंबरला पुण्यातील वाहतूक व्यवस्थेत बदल

लष्कर आणि डेक्कन भागातील वाहतुकीत केला बदल

मद्यपी चालकाच्या विरोधात होणार कारवाई

महात्मा गांधी रस्ता आणि जंगली महाराज रस्ता राहणार बंद

संध्याकाळी ५ नंतर रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार

एफ सी रोडवर रात्री तरुणाईची मोठी गर्दी होते त्यासाठी वाहतूक पोलीस विभागाचा निर्णय

Jalna: जालन्यात 31 डिसेंबरच्या पार्टीसाठी अवैधरित्या देशी दारूची कारमधून वाहतूक करणारा जेरबंद...

जालन्यात 31 डिसेंबरच्या पार्टीसाठी अवैधरित्या देशी दारूची कारमधून वाहतूक करणाऱ्या एकाला पोलिसांनी जेरबंद केलंय.जालना स्थानिक गुन्हे शाखेने हि कारवाई केली असून या कारवाईत अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय.जालना - राजुर रोडवर स्वतःच्या फायद्यासाठी विनापरवाना बेकायदेशीर देशी दारू बाळगून चोरटी वाहतूक करत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती आणि या माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई करत एकाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून जवळपास अडीच लाखांचा देखील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Pune: पुण्यात भाजपला शिवसेनेचच आव्हान

जवळपास १५८ अर्ज भरले शिवसेनेने

अजून ही आमची युती तुटली नाही उदय सामंत यांचा दावा

मात्र पक्षाच्या आदेशानंतरही अनेक जण आहे माघार घेणार नसल्याची माहिती

काल युती तुटल्यावर जवळपास १५८ जणांनी भरले आपले उमेदवारी अर्ज

PMC Election: पुणे महापालिका निवडणकीत १६५ जागांसाठी ३ हजार ४१ अर्ज दाखल

पुणे महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी मंगळवारी २ हजार २९८ अर्ज दाखल झाले. तर, अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवसापासून अखेरच्या दिवसापर्यंत १६५ जागांसाठी ३ हजार ४१ अर्ज दाखल झाल्याची माहिती निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.रात्री उशिरापर्यंत दाखल झालेल्या अर्जाची माहिती नोंदविण्याचे काम सुरू होते. या अर्जाची छानणी आज ३१ डिसेंबरला होणार आहे.मंगळवारी एका दिवसात सायंकाळी ७ वाजेपर्यंत एकूण २ हजार २९८ अर्ज आले. ४१ प्रभागातील १६५ जागांसाठी ३ हजार ४१ अर्ज दाखल झाले.

Ratnagiri: रत्नागिरीत आरटीओची धडक मोहीम...

सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी रत्नागिरी जिल्ह्यात पर्यटकांची मोठी मांदियाळी कोकणात जमली आहे. या पार्श्वभूमीवर वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवणाऱ्यांविरुद्ध रत्नागिरी आरटीओ विभागाने धडक मोहीम हाती घेतली आहे. मुंबई गोवा महामार्गावर आरटीओ विभागाच्या अधिकाऱ्यांकडून विशेषतः मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांची कसून तपासणी केली जात आहे.. त्यासाठी आरटीओची विशेष पथकं देखील तैनात करण्यात आली आहेत. दरम्यान नवीन वर्षाचे स्वागत उत्साहात करा, मात्र रस्त्यावर वाहन चालवताना स्वतःच्या आणि इतरांच्या जिवाची काळजी घ्या. मद्यपान करून वाहन चालवू नका. आनंद साजरा करताना नियमांचे पालन करा आणि सहकार्य करा असं आवाहन आरटीओ विभागाकडून करण्यात आलं आहे..

Amravati: अमरावती महापालिका मध्ये ८७ नगरसेवक निवडीसाठी १०२१ उमेदवारांचे उमेदवारी अर्ज..

अमरावती महापालिका निवडणुकीसाठी काल उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी तब्बल ७१५ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. आतापर्यंत १०२१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहे. २२ प्रभागांत ८७ सदस्य निवडीसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून, १६ जानेवारी मतमोजणी होणार आहे.अमरावती महापालिका प्रशासनाने उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सात ठिकाणी व्यवस्था केली होती. 2017 मध्ये भाजपमधून 45 नगरसेवक विजयी झाले होते...काँग्रेसचे मागील वेळी 15 नगरसेवक विजयी झाले होते.. त्यापैकी पाच नगरसेवकांचे तिकीट कापण्यात आले... काँग्रेसकडे यंदा 65 नव्या चेहऱ्यान्या उमेदवारी देण्यात आली आहे

थर्टीफर्स्टच्या रात्री कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी रायगड पोलिस सज्ज

थर्टी फर्स्टच्या रात्री कायदा आणि सुव्यस्था बिघडवाल तर तुम्हाला जेल वारी करावी लागणार आहे. रायगड पोलिस अधीक्षक आँचल दलाल यांनी तसे निर्देश सर्व पोलिस ठाण्यांना दिले आहेत. रात्रीच्‍या वेळी समुद्र किनारी नववर्ष स्‍वागतासाठी मोठी गर्दी होत असते. यात महिला आणि मुलींची त्‍यांची छेडछाड होवू नये यासाठी दामिनी पथक सक्रिय झाले असून त्‍यांचीदेखील गस्‍त राहणार आहे. दारू पिवून गाडी चालवण्‍याचे प्रकार बऱ्याच ठिकाणी घडतात. त्‍यातून अपघात होण्‍याची भीती असते. हे लक्षात घेवून पर्यटन स्‍थळी गस्‍तीवर असणारया पोलीस पथकांकडे ब्रेथ ॲनालायझर उपलब्‍ध करून देण्‍यात आले आहेत. पहाटेपर्यंत नाकाबंदी सुरू राहणार असून यात दारू पिवून गाडी चालवणारयांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.

नवीन वर्षाला दारू विकणाऱ्या आणि पिणाऱ्यांची गाढवावरुन धिंड काढण्याचा इशारा अवैध दारूविरोधात महिलांचा एल्गार

राज्य शासन आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने अहिल्यानगर जिल्ह्यातील निघोज येथील दारूबंदी कायम ठेवण्याचा निर्णय दिल्यानंतर गावातील दारूबंदी चळवळ पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. निघोज दारूबंदी समितीच्या नेतृत्वाखाली महिलांनी आणि कार्यकर्त्यांनी अवैध दारूविक्रीविरोधात थेट कृतीचा इशारा देत गावात जोरदार प्रचारफेरी काढली. परवानाधारक दारू दुकाने बंद असतानाही गावात अवैध मार्गान गावठी दारूची खुलेआम विक्री सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी महिलांनी पुढाकार घेत गावात प्रचारफेरी काढून दारूबंदीचा ठाम संदेश दिला.

KDMC निवडणूक,  भाजपाने खाते उघडले

पॅनल क्रमांक 18 अ मध्ये भाजपच्या उमेदवार रेखा चौधरी यांचा एकच अर्ज

भाजपच्या उमेदवार रेखा चौधरी बिनविरोध होण्याची शक्यता

18 अ प्रभागात ओबीसी महिला आरक्षित जागेसाठी भाजपच्या रेखा चौधरी याचा एकच अर्ज आल्याने जवळपास त्यांची उमेदवारी बिनविरोध झाल्याची माहिती

मात्र कागदपत्र पडताळणी उद्या होणार असून यानंतरच अधिकृत घोषणा

एक वेळी मुलांच्या शाळेची फी भरली नाही पण शाखेच भाडे भरले- उमेदवारी नाकारलेल्या कल्याणच्या मनसेच्या उपविभाग प्रमुखाची व्यथा

उमेदवारी नाकारल्याच्या कारणावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत अंतर्गत अस्वस्थता उफाळून आली आहे. कल्याणमधील मनसेचे उपविभाग अध्यक्ष ज्ञानेश्वर पावडे यांनी पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ करत थेट नांदीवली परिसरातील मनसे कार्यालय बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणुकीच्या तोंडावर घडलेल्या या घटनेमुळे मनसेच्या स्थानिक संघटनेत खळबळ उडाली आहे.

उल्हासनगर महापालिका निवडणूक २०२५ :नामनिर्देशन अर्जांच्या शेवटच्या दिवशी ६९५ नामनिर्देशन अर्ज उमेदवारांकडून सादर

उल्हासनगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी मंगळवारी नामनिर्देशन अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. या दिवशी महानगरपालिका क्षेत्रातील सहा ठिकाणी असलेल्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांमध्ये इच्छुक उमेदवारांनी नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यासाठी मोठी गर्दी केली होती. सकाळपासूनच विविध पक्षांचे उमेदवार, अपक्ष उमेदवार तसेच त्यांचे समर्थक अर्ज भरण्यासाठी कार्यालयांमध्ये दाखल झाले होते.दिवसभर चाललेल्या या प्रक्रियेनंतर दिवसाअखेरीस उल्हासनगर महानगरपालिका निवडणुकीसाठी एकूण सहा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे ६९५ नामनिर्देशन अर्ज उमेदवारांकडून सादर करण्यात आले. अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांमध्ये मोठी चुरस दिसून आली.आता नामनिर्देशन अर्जांची छाननी, त्यानंतर अर्ज माघारीची प्रक्रिया आणि निवडणूक चिन्ह निश्चिती झाल्यानंतरच निवडणुकीचा खरा रंग स्पष्टपणे समोर येणार आहे. त्यानंतर उमेदवारांचे प्रचार रणधुमाळी सुरू होऊन उल्हासनगर महापालिका निवडणूक अधिकच रंगतदार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com