Bunty Jahagirdar Firing Case: श्रीरामपूर हादरलं! जंगली महाराज बॉम्ब स्फोटातील आरोपी बंटी जहागिरदारची हत्या; हल्ल्याचा CCTV व्हिडिओ Viral

Bunty Jahagirdar firing Case Video Viral : जंगली महाराज रोडवरील बॉम्बस्फोटातील आरोपी बंटी जहागीरदारची दिवसाढवळ्या गोळ्या घालून हत्या झाली आहे. या गोळीबाराच्या घटननेने श्रीरामपूर हादरले आहे. पोलिसांनी तपास सुरू करत आहे. दरम्यान या गोळीबाराचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले आहे.
CCTV visuals capture the moment unidentified attackers opened fire on Bunty Jahagirdar in Shrirampur.
CCTV visuals capture the moment unidentified attackers opened fire on Bunty Jahagirdar in Shrirampur.
Published On
Summary
  • बंटी जहागिरदार याच्यावर गोळीबाराने अहिल्यानगर जिल्ह्यात खळबळ

  • अस्लम शेख उर्फ बंटी जहागिरदार हा 2012 मधील पुणे जर्मन बेकरी बॉम्बस्पोटातील आरोपी

  • दुचाकीवरून आलेल्या आरोपींनी झाडल्या गोळ्या

सुशील थोरात, साम प्रतिनिधी

श्रीरामपूर येथील अस्लम शब्बीर शेख उर्फ बंटी जहागिरदार याची हत्या झाली आहे. भर दुपारी अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळीबार केला होता. या हल्ल्यात बंटी जहागिरदारला गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर जहागिरदारला अहिल्यानगर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालाय.

CCTV visuals capture the moment unidentified attackers opened fire on Bunty Jahagirdar in Shrirampur.
'I Love You So Much' म्हणत मुलीनं संपवलं आयुष्य; प्रियकराने लग्नासाठी नकार देताच घेतला टोकाचा निर्णय

श्रीरामपूर येथे कब्रस्तानातून बाहेर पडल्यानंतर बंटी जहागिरदारवर गोळीबार करण्यात आला होता. या हल्ल्याचा सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जहागिरदारवर कब्रस्तानातून बाहेर पडत असताना दुचाकीवरून आलेल्या दोघा जणांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. अनेकांनी हल्लेखोरांची व्हिडिओ देखील बनवल्याचं दिसत आहे. गोळीबार झाल्यानंतर परिसरात पळापळ सुरू झाली.

CCTV visuals capture the moment unidentified attackers opened fire on Bunty Jahagirdar in Shrirampur.
Gadchiroli Crime: पती ठरला प्रेमात अडसर; प्रियकराच्या मदतीने नवऱ्याचा केला गेम, नंतर रचला अपघाताचा बनाव

गोळीबाराच्या घटनेनंतर श्रीरामपूर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान राजकीय तसेच गुन्हेगारी क्षेत्रात बंटी जहागीरदार याचा नाव होतं. त्यामुळे नेमका हल्ला कोणत्या कारणातून झाला हे अद्याप अस्पष्ट झाले नाहीये. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून तेथून काडतुसे गोळा करण्यात आली आहेत. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीच्या शोधासाठी पाच टीम रवाना करण्यात आली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com