'I Love You So Much' म्हणत मुलीनं संपवलं आयुष्य; प्रियकराने लग्नासाठी नकार देताच घेतला टोकाचा निर्णय

Uttar Pradesh Crime News: प्रियकराने लग्नाला नकार दिल्यानंतर एका १९ वर्षीय मुलीने आत्महत्या केली आहे. याप्रकरणात पोलिसांनी प्रियकराला अटक केली आहे.
Shocking: तरुणाने गर्लफ्रेंडसोबत संपवलं आयुष्य, शेतातील झाडाला घेतला गळफास; धक्कादायक कारण समोर...
Palghar Boyfriend and Girlfriend End lifeSaam Tv
Published On
Summary
  • हाथरसमध्ये 19 वर्षीय तरुणीची आत्महत्या

  • प्रियकराने लग्नाला नकार दिल्याचा आरोप

  • आत्महत्येपूर्वी भावनिक व्हिडिओ समोर

"आकाश, तू मला इतकं निराश केलं आहेस की माझ्याकडे मरण्याशिवाय पर्याय नाही. मी कधीही कोणाचीही फसवणूक केलेली नाही. मी पुढे जाऊ शकत नाही. मी तुझ्यावर खूप प्रेम करते, असं एका मुलीनं आयुष्य संपवलं. प्रियकराने लग्नाला नकार दिल्यानं तिने आत्महत्या केली. घटना उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी मृत मुलीच्या प्रियकराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मुलीला आत्महत्या करण्यास भाग पाडण्याप्रकरणी प्रियकराला पोलिसांनी बुधवारी अटक केली आहे.

आत्महत्या करणाऱ्या मुलीनंच नाव कामिनी (वय १९), उर्फ गुनगुन आहे. ती हाथरसमधील आवास विकास कॉलनीमध्ये राहत होती. या घटनेप्रकरणी मृत मुलीच्या मावसीनं दिलेल्या माहितीनुसार, मागील काही दिवसांपासून आकाश गुनगुनला त्रास देत होता. तिला मानसीक त्रास देत होता. त्यामुळे गुनगुनने आत्महत्या केली. दरम्यान गुनगुनच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबाने पोलिसांना न कळवता तिचे अंत्यसंस्कार केले. गुनगुनचा व्हिडिओ समोर आल्यानंतर आत्महत्येचं प्रकरण उघड झालं. मंगळवारी, गुनगुनची आई रश्मी यांनी सदर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

Shocking: तरुणाने गर्लफ्रेंडसोबत संपवलं आयुष्य, शेतातील झाडाला घेतला गळफास; धक्कादायक कारण समोर...
Shocking : सासूचा ५ महिन्यांपूर्वी मृत्यू, नवरा राहायला परराज्यात; रिटायर नेव्ही अधिकाऱ्याची सूनेनं केली हत्या, त्या दिवशी भयंकर घडलं

गुनगुन नोएडामध्ये नोकरी करत होती, आणि बीए पदवीचं शिक्षण घेत होती. शनिवारी नोएडाहून परतल्यानंतर ती आकाशला भेटली आणि त्यांच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. मात्र प्रियकराने लग्नाला नकार दिल्यानं निराश झालेली गुनगुन तिच्या मावशी रोशनीच्या घरी गेली तेथे तिने विष प्राशन केले. कुटुंबीयांनी तिला एका खासगी रुग्णालयात नेले, जिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

Shocking: तरुणाने गर्लफ्रेंडसोबत संपवलं आयुष्य, शेतातील झाडाला घेतला गळफास; धक्कादायक कारण समोर...
Crime: महिला पोलिसाच्या १३ वर्षीय मुलीवर बलात्कार, सावत्र बापाचं भयंकर कृत्य

गुनगुन ही तिच्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी होती. तिच्या वडिलांचे पाच वर्षांपूर्वी निधन झाले होते. पोलीस तपासात असे दिसून आले की गुनगुन आणि आकाश यांचे गेल्या चार वर्षांपासून प्रेमसंबंध होते. पोलीस अधीक्षक चिरंजीवी नाथ सिन्हा यांनी सांगितले की, आवास विकास कॉलनीतील धर्माचा मुलगा आकाश (२१) याला अटक करण्यात आली. आकाश आणि गुनगुनचे चार वर्षांपासून प्रेमसंबंध होते. गुनगुनला त्याच्याशी लग्न करायचे होते, परंतु आकाशने नकार दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com