Gadchiroli Crime: पती ठरला प्रेमात अडसर; प्रियकराच्या मदतीने नवऱ्याचा केला गेम, नंतर रचला अपघाताचा बनाव

Wife Killed Husband In Gadchiroli: गडचिरोलीच्या कुरखेडा येथे धक्कादायक घडलीय. प्रेमात नवरा अडचण ठरत होतो म्हणून पत्नी आपल्या प्रियकरसोबत कट रचत पतीचा खून केला. त्यानंतर अपघाताचा बनाव केला.
Wife Killed  Husband In Gadchiroli:
Police investigation underway after a shocking murder case exposed in Kurkheda, Gadchiroli.saamtv
Published On
Summary
  • गडचिरोलीतील कुरखेडामध्ये धक्कादायक हत्याकांड

  • प्रेमात अडसर ठरलेल्या पतीची पत्नीने केली हत्या

  • प्रियकराच्या मदतीने अपघाताचा बनाव रचल्याचा आरोप

गणेश शिंगाडे, साम प्रतिनिधी

गडचिरोलीमधील कुरखेडा शहरात नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच एक धक्कादायक हत्याकांड उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीची निघृण हत्या केल्याची घटना बुधवार, 31 डिसेंबर रोजी समोर आली असून या प्रकरणी पत्नी व तिच्या प्रियकरास पोलिसांनी अटक केली आहे.

Wife Killed  Husband In Gadchiroli:
'I Love You So Much' म्हणत मुलीनं संपवलं आयुष्य; प्रियकराने लग्नासाठी नकार देताच घेतला टोकाचा निर्णय

प्राप्त माहितीनुसार, मृतक दिनेश सूर्यभान डोंगरावर (वय 33, रा. गेवर्धा) व पत्नी रेखा दिनेश डोंगरावर (वय 28) यांचा आंतरजातीय विवाह झाला होता. मात्र, विवाहानंतर दोघांमध्ये वारंवार वाद होत असल्याची माहिती आहे. दरम्यान, रेखा हिचे विश्वा सांगोळे (वय 25, राहणार भरनुली) याच्याशी प्रेमसंबंध असल्याचे निष्पन्न झाले आहे.

Wife Killed  Husband In Gadchiroli:
Bunty Jahagirdar firing Case: श्रीरामपूर हादरलं! जर्मन बेकरी बॉम्ब स्फोटातील आरोपी बंटी जहागीरदारवर गोळीबार

30 डिसेंबर रोजी रात्री दिनेश व रेखा यांच्यात घरीच जोरदार भांडण झाले. तेव्हा पत्नी रेखाने आपल्या प्रियकराच्या मदतीने धारदार शस्त्राने पती दिनेशची हत्या केली. नवऱ्याचा खून केल्यानंतर आरोपींनी पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह दुचाकीवरुन सती नदी पुलाजवळ नेला. तेथील पुलावरून तो नदीत फेकून दिला. त्याच बाजुला दुचाकी पाडून अपघात झाल्याचा बनाव रचला.

मात्र, मृतदेह नदीपर्यंत नेत असताना ठिकठिकाणी पडलेले रक्ताचे डाग व घटनास्थळी आढळलेल्या पुराव्यांमुळे पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी केलेल्या तपासानंतर हा अपघात नसून हत्याकांड असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर पोलिसांनी कुरखेडा शहरातील प्रताप वॉर्ड येथे जाऊन आरोपी पत्नी रेखा व तिचा प्रियकर विश्वा यांना ताब्यात घेतले. पोलिसी खाकी दाखवताच दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com