Bunty Jahagirdar firing Case: श्रीरामपूर हादरलं! जर्मन बेकरी बॉम्ब स्फोटातील आरोपी बंटी जहागीरदारवर गोळीबार

Bunty Jahagirdar firing case : श्रीरामपूरमध्ये दिवसाढवळ्या गोळीबाराची घटना घडली आहे. पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातील आरोपी बंटी जहागीरदार या गोळीबारात गंभीर जखमी झाला. शहरात तणाव असल्याने पोलिस तपास सुरू आहे.
Police rush to the spot after German Bakery blast accused Banti Jahagirdar was shot in broad daylight in Shrirampur.
Police rush to the spot after German Bakery blast accused Banti Jahagirdar was shot in broad daylight in Shrirampur.saamtv
Published On
Summary
  • श्रीरामपूरमध्ये दिवसाढवळ्या गोळीबाराची थरारक घटना

  • जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातील आरोपी बंटी जहागीरदार जखमी

  • दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांचा गोळीबार

पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावरील जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी असलम शब्बीर शेख उर्फ बंटी जहागीरदारवर श्रीरामपूरमध्ये दिवसाढवळ्या बेधुंद गोळीबार झाला. यात बंटी जहागीरदार गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर श्रीरामपूर इथल्या कामगार हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दुचाकीवरून आलेल्या आरोपींनी जहागिरदारवर धाडधाड गोळ्या झाडल्या आहेत. गोळीबाराच्या घटनेनंतर श्रीरामपुरात तणावाची परिस्थिती निर्माण झालीय.

Police rush to the spot after German Bakery blast accused Banti Jahagirdar was shot in broad daylight in Shrirampur.
'I Love You So Much' म्हणत मुलीनं संपवलं आयुष्य; प्रियकराने लग्नासाठी नकार देताच घेतला टोकाचा निर्णय

अस्लम शेख उर्फ बंटी जहागिरदार हा २०१२ मधील पुणे जर्मन बेकरी बॉम्बस्पोटातील आरोपी आहे. त्याच्यावर बॉम्बस्फोटातील आरोपींना शस्त्र पुरविल्याच्या आरोप आहे. मद्रयान २०२३ पासून जहागिरदार जामिनावर बाहेर आहे. बंटी जहागिरदार याच्यावर गोळीबाराने अहिल्यानगर जिल्ह्यात खळबळ उडालीय. पोलिसांकडून अज्ञात हल्लेखोरांचा शोध सुरू आहे.

Police rush to the spot after German Bakery blast accused Banti Jahagirdar was shot in broad daylight in Shrirampur.
Delhi Red Fort Blast Case: एनआयएची काश्मीरमध्ये 8 ठिकाणी छापे, तीन जणांना अटक

बंटी जहागीरदार हा कब्रस्तानातून बाहेर पडला होता. त्यावेळी श्रीरामपूर शहरातील एका हॉस्पिटलसमोरील मुख्य दरवाजाजवळ दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळीबार केला. गोळीबाराचा आवाज होताच परिसरात एकच पळापळ झाली. हल्ला केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. गोळीबारानंतर शहरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी शहरात बंदोबस्त वाढवलाय.

दरम्यान गोळीबारात जखमी झालेल्या बंटी जहागीरदार याला तातडीने उपचारासाठी कामगार हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. सध्या त्याच्यावर वैद्यकीय पथकाकडून उपचार सुरू असून प्रकृतीबाबत वैद्यकीय पथकाने अजून कोणतीही अपडेट दिलेली नाहीये. पोलिसांनी घटनास्थळाता पंचनामा केलाय. घटनास्थळावरून काही रिकामं काडतुस जप्त केली आहेत. परंतु नेमक्या किती गोळ्या झाडल्या, याबाबत पोलिसांकडून कोणती माहिती देण्यात आलेली नाहीये.

हल्लेखोर दबा धरून बसले होते. बंटी जहागीरदार दुचाकीवरून येताच, त्याच्यावर गोळीबार सुरू केला. त्यामुळे हा हल्ला पूर्वनियोजित होता, असे पोलिसांनी प्राथमिक तपासातून सांगितलं. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधून हल्ल्याचे फुटेज मिळवले जात आहेत. श्रीरामपूर पोलिसांनी हल्ल्यातील आरोपींच्या शोधासाठी पथक देखील रवाना केली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com