Delhi Red Fort Blast Case: एनआयएची काश्मीरमध्ये 8 ठिकाणी छापे, तीन जणांना अटक

NIA Raids In Kashmir: लाल किल्ला बॉम्बस्फोट प्रकरणी तपास करताना एनआयएने पुलवामा आणि कुलगाममधील ८ ठिकाणी छापे टाकले. या कारवाईदरम्यान तीन संशयितांना अटक करण्यात आली. दिल्ली स्फोटानंतर व्हाईट कॉलर दहशतवादी मॉड्यूल उघड झालं होतं.
NIA Raids  In Kashmir:
NIA officials conducting searches in Pulwama and Kulgam as part of the terror module investigation.saam tv
Published On
Summary
  • एनआयएनं पुलवामा आणि कुलगाममधील 8 ठिकाणी मोठी छापेमारी केली.

  • लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर 'व्हाईट-कॉलर' दहशतवादी मॉड्यूल उघडकीस आलं.

  • छापेमारीदरम्यान तिघांना अटक करण्यात आली

राष्ट्रीय तपास संस्थेनं (NIA) काश्मीरमधील पुलवामा आणि कुलगाम जिल्ह्यात 8 ठिकाणी छापेमारी केली. दिल्लीमधील लाल किल्ल्याजवळ दहशतवाद्यांनी स्फोट घडवून आणल्यानंतर 'व्हाईट-कॉलर' हे दहशतवाद्यांचे मॉड्यूल समोर आलं होतं. त्या संदर्भात एनआयएनं जम्मू काश्मीरमध्ये छापेमारी केली आहे. यात तिघांना अटक केली आहे.

शोपियामधील मौलवी इरफान अहमद वागेच्या घरात एनआयएनं झडती घेतली. व्हाईट कॉलरच्या दहशतवादी मॉड्यूलमधून कट्टरतावाद पसरविण्यासाठी आणि भरती करण्याच्या कारवाया करत होता. वागे हा मास्टरमाईंड असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. ऑक्टोबरमध्ये दिल्लीत दहशतवाद्यांनी कारमध्ये स्फोट घडवून आणला होता, यात १५ लोकांचा मृत्यू झाला.

NIA Raids  In Kashmir:
डोनाल्ड ट्रम्प यांना बसला टॅरिफचा 'डंक'; सहा देशांकडून F-35 लढाऊ विमानांचा करार रद्द

या हल्ल्याचा एनआयएकडून तपास सुरू आहे. एनआयएकडून संशयितांची चौकशी सुरू आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पुलवामा जिल्ह्यातील कोईल, चंदगाम, मलंगपोरा आणि संबूरा भागात छापेमारी करण्यात आली. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात उत्तर प्रदेश सहारनपूरमधून डॉ. अदील अहमद राथरला अटक करण्यात आली.

NIA Raids  In Kashmir:
Dantewada Naxal Surrender: डोक्यावर ६५ लाखांचं इनाम, भीमासह ३७ नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण, २३ महिन्यांत २,२०० हून अधिकांचं सरेंडर

या प्रकरणाचा तपास सुरू असताना एनआयएनं दिल्ली कार स्फोटातील प्रकरणी जम्मू काश्मीरमधील नादिगाम शोपियामधील इरफान मौलवीच्या घरी छापे मारले. एनआयएनं दक्षिण काश्मीरमधील शोपिया जिल्ह्यात शोध मोहिम राबविली. या मोहिमेत नादिगामध्ये इरफान अहमद मौलवीच्या घरात छापे टाकलेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com