Yavatmal News : वाऱ्यामुळे वारंवार वीज खंडित; घारफळ उपकेंद्रात ग्रामस्थांची तोडफोड, ऑपरेटरलाही केली मारहाण

Yavatmal News : वादळी वाऱ्यामुळे वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने संतप्त नागरिक यवतमाळच्या बाभुळगाव उपविभागातील घारफळ उपकेंद्रात धडकले
Yavatmal News
Yavatmal NewsSaam tv
Published On

संजय राठोड

यवतमाळ : वादळी वाऱ्यामुळे वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने यवतमाळच्या बाभुळगाव उपविभागातील घारफळ उपकेंद्रात ग्रामस्थांनी प्रचंड तोडफोड केली. तसेच येथील ऑपरेटरला देखील मारहाण करून त्याला बांधून ठेवल्याचा प्रकार घडला. यानंतर पोलिसांनी मध्यस्थी केल्याने पुढील अनर्थ टळला.

Yavatmal News
Latur Water Crisis: लातूर जिल्ह्यात पाणीटंचाईची तीव्रता अधिक गडद; ग्रामीण भागात १५ दिवसांनी पाणी पुरवठा

राज्यात सध्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस होत आहे. जोरदार वाऱ्यामुळे विजेची समस्या निर्माण होत आहे. वादळी वाऱ्यामुळे वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने संतप्त नागरिक (Yavatmal) यवतमाळच्या बाभुळगाव उपविभागातील घारफळ उपकेंद्रात धडकले. काल बराचवेळ वीज नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी हा हल्ला चढविला. यात उपकेंद्राचे दरवाजे तोडून ग्रामस्थ आत शिरले.  दगडफेक करून खिडक्यांच्या काचा फोडण्यात आल्या. तसेच ऑपरेटरला देखील मारहाण करण्यात आली. 

Yavatmal News
Kharif Season : यंदा खरीप हंगामात कापूस लागवडीचे क्षेत्र घटण्याची शक्यता; गतवर्षी शेतकऱ्यांना बसला आर्थिक फटका

पोलीस झाले दाखल 

यावेळी संतप्त ग्रामस्थांनी फीडर देखील ५ ते ६ तास बंद करून ठेवले. त्यामुळे (Mahavitaran) महावितरणच्या कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. दरम्यान पोलिसांनी (Police) घटनास्थळी पोहचून जमावाला पांगवले. दरम्यान वीज अभियंता व कर्मचार्यांवरील हल्यांमुळे आता ते आंदोलनाच्या पावित्र्यात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com