सागर निकवाडे
नंदूरबार : गतवर्षी कापसाची मोठ्या प्रमाणात कापूस लागवड करण्यात आली होती. परंतु पावसाच्या लहरीपणामुळे उत्पादनात घट झाल्याचे पाहण्यास मिळाले. शिवाय कापसाचे जे उत्पादन मिळाले त्याला देखील अपेक्षित दर मिळाला नसल्याने शेतकऱ्याचे नुकसान झाले. यामुळे यंदाच्या हंगामात कापूस लागवडीचे क्षेत्र घटण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
नंदुरबार जिल्ह्यात सरासरीपेक्षा ३० टक्के कमी पाऊस झाला असल्यामुळे खरीप हंगामातील कापूस उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट आली होती. तसेच मध्यंतरी आलेल्या अवकाळी पावसामुळे देखील शेतकऱ्यांच्या (Farmer) मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या परिस्थितीशी दोन हात करत शेतकऱ्यांनी जे उत्पादन घेतले. त्याला देखील समाधानकारक भाव मिळाला नसल्यामुळे खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हातातून पूर्णतः वाया गेला होता. या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या खरीप हंगामात (Kharif Season) कापसाच्या पेरणी क्षेत्रात घट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अन्य पिकांवर असेल भर
कापसाची लागवड कमी करून शेतकरी अन्य पिकांवर भर देण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यात प्रामुख्याने मका व सोयाबीन लागवडीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. इतकेच नाही तर उदीड, मूग व नंदुरबार जिल्ह्यात भट शेती देखील केली जात असून याचे क्षेत्र देखील वाढण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.