रामू ढाकणे
छत्रपती संभाजीनगर : दिवसेंदिवस वाढत चाललेल्या उन्हाच्या तडाख्यामुळे पाणी साठा घटत चालला आहे. तर काही ठिकाणी पाण्याचे बाष्पीभवन होऊन पाणी पातळी कमी होताना दिसत आहे. मराठवाड्यातील एकूण ८२४ लघुउद्योग प्रकल्प पैकी जवळपास १४४ प्रकल्प आता कोरडे पडले आहेत. यामुळे पाणी टंचाईची भीषणता अधिक जाणवत आहे.
कमी पाऊस (Rain) झाल्याने पाण्याची समस्या अधिक गडद झाली आहे. धरण, तलावात देखील पाणी कमी साचल्याने (sambhajinagar) आता उन्हाच्या तीव्रतेमुळे बाष्पीभवन होऊन असलेला पाणी साठा देखील घटत आहे. आता यंदाच्या मान्सून लांबल्यास ही भीषणता अधिक तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हीच परिस्थिती मराठवाड्यात निर्माण झाली असून सद्यस्थितीला मराठवाड्यातील तब्बल १४४ प्रकल्प कोरडे पडल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे.
आटत चाललेला पाणीसाठा आणि घटता भूजल साठा यामुळे सद्यस्थितीला मराठवाड्यात पाणी टंचाईची भीषण स्थिती पाहायला मिळत असून नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे. दरम्यान (Jayakwadi dam) जायकवाडी धरणात पाणीसाठा हा केवळ सात टक्केच असल्याने पाणी टंचाईची भीषण स्थिती निर्माण होत चालली आहे. यामुळे काही गावांना टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.