Bhavesh Bhinde: घाटकोपर दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडेवर बलात्काराचा गुन्हा, खळबळजनक माहिती समोर

Ghatkopar Hoarding Collapse Case Accused: घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेमध्ये भावेश भिंडे हा आरोपी आहे. त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळतेय.
भावेश भिंडे
Bhavesh Bhinde Saam Tv
Published On

मयूर राणे, साम टिव्ही मुंबई

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेमध्ये भावेश भिंडे हा आरोपी आहे. त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळतेय. भिंडेविरूद्ध दोन महिन्यापूर्वी मुलुंड पोलीस स्टेशनमध्ये 376 चा गुन्हा दाखल करण्यात आला होता. 376 चा गुन्हा दाखल असतानाही त्याने अटक पूर्व जामीन घेतल्याची माहिती मिळतेय. भिंडेवर दोन महिन्यापूर्वी हा गुन्हा दाखल झाला होता. त्याच्या मैत्रिणीने पोलिसांत तक्रार दिल्याची माहिती मिळतेय.

घाटकोपरमध्ये कोसळलेल्या होर्डिंगचा मालक भावेश भिंडे (Bhavesh Bhinde) आहे. दुर्घटनेनंतर त्याच्याविरूद्ध मुंबई महापालिकेने कारवाई केली आहे. त्याला याप्रकरणी ६ कोटींचा दंड ठोठावल आहे. आता भिंडेविरूद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल असल्याचं समोर आलं आहे. घटनेनंतर भावेश भिंडे फरार आहे. त्याच्याविरुद्ध याप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा भावेश भिंडे मालक आहे. त्याच कंपनीचं होर्डिंग घाटकोपरमध्ये लावलेलं होतं. होर्डिंग पडल्यानंतर पोलिसांनी भिंडेविरोधात गुन्हा दाखल केलाय. त्याचं घर मुलुंड येथे असल्याची (Ghatkopar Hoarding Collapse Case) माहिती मिळतेय. घटनेनंतर त्याचा फोन देखील बंद आहे. फरार भिंडेचा पोलीस शोध घेत आहेत. २००९ साली भिंडेने आमदारकीची निवडणूक लढवली होती. त्याच्याविरूद्ध २१ गुन्हे दाखल असल्याचं तेव्हा समोर आलं होतं.

भावेश भिंडे
होर्डिंग दुर्घटनेत १४ बळी गेल्यानंतर BMC प्रशासन खडबडून जागं, बेकायदा होर्डिंग हटवण्यास सुरुवात| Ghatkopar Hoarding collapse

घाटकोपरमध्ये (Ghatkopar) झालेल्या दुर्घटनेत गेल्या दोन दिवस बचावकार्य मोठ्या शर्थीने सुरू आहे. आज सकाळी त्याच पेट्रोल पंपावर आग लागल्याची दुर्घटना घडली. मात्र अग्निशामक दलाकडून ही आग तातडीने विझविण्यात (Mumabi News) आली आहे. घटनास्थळी अजूनही बचाव कार्य मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचं पाहायला मिळालं. एनडीआरएफने दिलेल्या माहितीनुसार अजूनही बचाव कार्य सुरू आहे. गील्डर एक हा उचलण्यात आला आहे. गील्डर दोन उचलण्याचे काम सध्या सुरू आहे. एका बिल्डरखाली एक कार अडकली आहे. त्या कारमध्ये दोन व्यक्ती असल्याची माहिती सध्या एनडीआरएफने दिलेली आहे.

भावेश भिंडे
Ghatkopar Hoarding Collapse : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला; अनेकांची मृत्युशी झुंज, ४० तासानंतरही बचावकार्य सुरूच

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com