Sakshi Sunil Jadhav
31 डिसेंबर रोजी दिसलेला सूर्यास्त हा 2025 मधील शेवटचा सूर्यास्त होता.
संध्याकाळच्या वेळी आकाशात केशरी, गुलाबी आणि लालसर छटा पाहायला मिळाल्या.
सरत्या वर्षाला निरोप देताना निसर्गाने जणू सुंदर भेट दिली, अशी भावना अनेकांच्या मनात आली.
हौशी आणि व्यावसायिक फोटोग्राफर्सनी हे दृश्य मोठ्या प्रमाणात टिपले आहे. लोक वर्षभर या फोटोसाठी वाट पाहत असतात.
सूर्यास्ताचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर झाले.
अनेकांनी “असा सूर्यास्त पाहायला मिळणं हे भाग्यच आहे” अशा प्रतिक्रिया दिल्या.
काहीच तासांत नवीन वर्ष सुरू होणार असल्याने वातावरणात उत्साह दिसून आला.
काहींसाठी हा क्षण आत्मचिंतनाचा, तर काहींसाठी नव्या सुरुवातीचा संकेत ठरला. तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.