Crime News: मुलाचे मित्रांसोबत समलैंगिक संबंध; वडिलांनी नको त्या अवस्थेत बघितलं; नंतर घडलं भयंकर

Uttar Pradesh Crime News: समलैंगिक संबंधांना विरोध केल्याने तरुणाने मित्राच्या मदतीने आपल्या वडिलांची चाकून भोसकून हत्या केली. हत्येनंतर त्याने मृतदेह दूर जंगलात नेऊन जाळून टाकला.
मुलाचे मित्रांसोबत समलैंगिक संबंध; वडिलांनी नको त्या अवस्थेत बघितलं; नंतर घडलं भयंकर
Uttar Pradesh Crime NewsSaam TV

समलैंगिक संबंधांना विरोध केल्याने तरुणाने मित्राच्या मदतीने आपल्या वडिलांची चाकून भोसकून हत्या केली. हत्येनंतर त्याने मृतदेह दूर जंगलात नेऊन जाळून टाकला. पण, पोलिसांनी या हत्येकांडाचा अवघ्या १० दिवसांतच छडा लावत आरोपींना बेड्या ठोकल्या. ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यात घडली.

मुलाचे मित्रांसोबत समलैंगिक संबंध; वडिलांनी नको त्या अवस्थेत बघितलं; नंतर घडलं भयंकर
Jalgaon News: सचिन तेंडुलकरच्या सुरक्षारक्षकाने गोळी झाडून स्वत:ला संपवलं; घटनेनं परिसरात खळबळ

मोहनलाल शर्मा (वय ५५) असं मृत व्यक्तीचं नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी अजित शर्मा (वय २१) कृष्ण वर्मा, लोकेश (वय २१) आणि दीपक (वय २३) यांना अटक केली आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अजित शर्मा याचे आपल्या मित्रांसोबत समलैंगिक संबंध होते. या संबंधाची कुणकुण मोहनलाल शर्मा यांना लागली होती. एकेदिवशी मोहनलाल यांनी मुलगा अजित याला मित्रांसोबत नको त्या अवस्थेत पाहिलं होतं.

त्यावेळी मोहनलाल यांनी अजितच्या कानशिलात लगावली होती. तसेच यापुढे असं केल्यास माझ्या इतकं कुणी वाईट नसेल, अशी तंबीही दिली होती. याच गोष्टीचा राग मनात धरून अजित याने मोहनलाल यांचा काटा काढण्याचं ठरवलं.

त्याने आपल्या मित्रांना सोबत घेऊन मोहनलाल यांची चाकूने भोसकून हत्या केली. हत्येनंतर मृतदेह एका लाकडाच्या पेटीत टाकून दूर जंगलात नेऊन पेटवून दिला. घटनेनंतर आरोपींनी तिथून पळ काढला. दरम्यान, जंगलात काहीतरी वस्तू जळत असल्याचं स्थानिकांनी पाहिलं.

त्यांनी आग विझवून लाकडी पेटी उघडून बघितली असता, आत मृतदेह असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मोहनलाल यांचा मृतदेह ताब्यात घेतला.

मोहनलाल आणि त्यांच्या मुलामध्ये नेहमी वाद व्हायचे, अशी माहिती पोलिसांना समजली. त्यांनी अजितला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता, त्याने आपला गुन्हा कबूल केला. समलिंगी संबंधाला विरोध असल्याने आपण मित्रांच्या मदतीने वडिलांची हत्या केल्याचं अजितने कबूल केलं.

मुलाचे मित्रांसोबत समलैंगिक संबंध; वडिलांनी नको त्या अवस्थेत बघितलं; नंतर घडलं भयंकर
Sangli News: आंघोळीच्या साबणावरून बायकोने नवऱ्याला धुतलं, पकडीने अंगठाच फोडला; सांगलीतील धक्कादायक प्रकार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com