Sachin Tendulkar's Body Guard: सचिन तेंडुलकरच्या सुरक्षारक्षकाने गोळी झाडून स्वत:ला संपवलं; घटनेनं परिसरात खळबळ

Jalgaon's Jamner SRPF Jawan News | राज्य राखीव दलाच्या जवानाने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात घडली.
Jalgaon News: Sachin Tendulkar's Body Guard SRPF Jawan Prakash Kapade Ended his life in Jamner
Jalgaon News: Sachin Tendulkar's Body Guard SRPF Jawan Prakash Kapade Ended his life in JamnerSaam TV

संजय महाजन, साम टीव्ही जळगाव

टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याचा सुरक्षारक्षक म्हणून काम करणाऱ्या एका एसआरपीएफ (SRPF)  जवानाने गोळी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना जळगाव (Jalgaon News) जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात घडली. प्रकाश कापडे असं मृत जवानाचे नाव आहे. कापडे हे गेल्या १५ वर्षांपासून मुंबई येथे आरपीएफ दलात कार्यरत होते.

Jalgaon News: Sachin Tendulkar's Body Guard SRPF Jawan Prakash Kapade Ended his life in Jamner
Amravati News: निवडणुकीच्या धामधुमीत ६६ शेतकऱ्यांनी मृत्युला कवटाळलं; धक्कादायक आकडेवारी समोर

त्यांनी इतकंच टोकाचं पाऊल का उचललं? याची माहिती अद्यापही समोर आलेली नाही. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर कापडे यांचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.

प्राप्त माहितीनुसार, प्रकाश कापडे हे मुंबई पोलीस दलात आरपीएफ म्हणून काम करत होते. ते क्रिकेटर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांचा सुरक्षारक्षक म्हणून काम करीत होते. गेल्या ८ दिवसांपासून कापडे हे जामनेर परिसरात असलेल्या गणपती नगर येथे त्यांच्या राहत्या घरी आले होते.

बुधवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास कापडे यांनी बंदुकीतून स्वत:वर गोळी झाडली. गोळीचा आवाज झाल्यानंतर परिसरातील नागरिकांनी कापडे यांच्या घराच्या दिशेने धाव घेतली. तेव्हा कापडे हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसून आले.

स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी हजर झाले. त्यांनी कापडे यांचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. प्रकाश कापडे यांनी इतकं टोकाचं पाऊल का उचललं? याचा तपास पोलीस करीत आहेत.

Jalgaon News: Sachin Tendulkar's Body Guard SRPF Jawan Prakash Kapade Ended his life in Jamner
Rajasthan News: भयंकर! साखळी तुटल्याने लिफ्ट १८०० फूट खोल खाणीत कोसळली; १४ जण अडकले, बचावकार्य सुरू

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com