Amravati News: निवडणुकीच्या धामधुमीत ६६ शेतकऱ्यांनी मृत्युला कवटाळलं; धक्कादायक आकडेवारी समोर

Amravati Farmers News : गेल्या मार्च आणि एप्रिल महिन्यात अमरावतीत तब्बल ६६ शेतकऱ्यांनी मृत्युला कवटाळलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे यातील ४० आत्महत्या मार्च महिन्यातील आहे.
Amravati Farmers News
Amravati Farmers NewsSaam TV

अमर घटारे, साम टीव्ही अमरावती

राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. राजकीय नेत्यांनी प्रचारसभांचा धडाकाच लावला आहे. मतदारांना आपल्याकडे खेचून आणण्यासाठी अनेक मोठमोठी आश्वासने दिली जात आहे. निवडणुकीचा हा रणसंग्राम सुरू असताना अमरावती जिल्ह्यातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Amravati Farmers News
Rajasthan News: भयंकर! साखळी तुटल्याने लिफ्ट १८०० फूट खोल खाणीत कोसळली; १४ जण अडकले, बचावकार्य सुरू

गेल्या मार्च आणि एप्रिल महिन्यात अमरावतीत (Amravati News) तब्बल ६६ शेतकऱ्यांनी मृत्युला कवटाळलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे यातील ४० आत्महत्या मार्च महिन्यातील आहे. एका आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे.

दुष्काळ, अतिवृष्टीने झालेलं नुकसान आणि अंगावर झालेला कर्जाचा बोजा यामुळे शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलं आहे. त्यामुळे आतातरी सरकारने जागे व्हावे आणि शेतकरी प्रश्नांकडे लक्ष द्यावे, अशी मागणी अनेकजण करीत आहेत.

दुसरीकडे जगाचा पोशिंदा बळीराजा (Farmers) आर्थिक अडचणीत असताना राजकारण्यांकडून मात्र प्रचारासाठी पैशांची उधळपट्टी केली जात आहे. यामुळे अनेकांकडून संताप व्यक्त केला आहे.

आकडेवारीनुसार, जानेवारी ते एप्रिल या ४ महिन्यांच्या कालावधीत अमरावती जिल्ह्यात एकूण १८८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ, नापिकी, सावकारांसह बँकांचे कर्ज, कर्ज वसुलीचा तगादा, मुलामुलींचे लग्न, यासह अन्य कारणांमुळे शेतकरी आत्महत्या करीत आहेत.

राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या अमरावती विभागात होत असल्याचंही आकडेवारीतून समोर आलंय. २००१ पासून २०२४ पर्यंत विभागातील ५ हचार २९४ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळलं आहे. विशेष बाब म्हणजे यातील बहुतांश शेतकऱ्यांना सरकारकडून अद्याप कोणतीही मदत मिळालेली नाही.

Amravati Farmers News
Rain Alert : मुंबई, ठाण्यासह राज्यातील 'या' भागात कोसळणार तुफान पाऊस; IMD कडून अलर्ट, वाचा वेदर रिपोर्ट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com