Rajasthan News: भयंकर! साखळी तुटल्याने लिफ्ट १८०० फूट खोल खाणीत कोसळली; १४ जण अडकले, बचावकार्य सुरू

Rajasthan Breaking News : राजस्थानमधील झुंझुनू येथे मंगळवारी रात्रीच्या सुमारास मोठी दुर्घटना घडली. हिंदुस्थान कॉपर लिमिटेडच्या (HCL) कोलिहान खाणीत लिफ्टची साखळी तुटली. त्यामुळे १४ अधिकारी खाणीत अडकून पडले.
Rajasthan Breaking News
Rajasthan Breaking NewsSaam TV

राजस्थानमधील झुंझुनू येथे मंगळवारी रात्रीच्या सुमारास मोठी दुर्घटना घडली. खेत्री परिसरात असलेल्या हिंदुस्थान कॉपर लिमिटेडच्या (HCL) कोलिहान खाणीत लिफ्टची साखळी तुटली. त्यामुळे दक्षता पथकासह कंपनीचे १४ अधिकारी खाणीत अडकून पडले. त्यांची सुटका करण्यासाठी बचावपथकाचे प्रयत्न सुरू आहे.

Rajasthan Breaking News
DHFL: 34000 कोटींच्या बँक घोटाळ्या प्रकरणी CBI ची मोठी कारवाई, DHFL चे माजी संचालक धीरज वाधवान यांना अटक

आतापर्यंत तीन जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं आहे. अजूनही बरेच लोक खाणीत अडकून पडले असून त्यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. घटनास्थळी रुग्णवाहिका आणि डॉक्टरांच्या पथकाचे पाचारण करण्यात आले आहे. सर्व लोक सुमारे १८०० फूट खोल खाणीत अडकल्याची माहिती आहे.

खाणीत अडकून पडलेल्या लोकांना कोणत्याही प्रकारची अडचण होऊ नये म्हणून अन्नाच्या पाकिटांसह आवश्यक औषधींचा पुरवठा करण्यात येत आहे. प्राप्त माहितीनुसार, हिंदुस्थान कॉपरच्या कोलिहान खाणीमध्ये १३ मे २०२४ पासून तपासणीचे काम सुरू आहे.

मंगळवारी (ता. १४) खाणीची पाहणी करण्यासाठी कोकाटा येथील दक्षता पथक आले होते. यातील १४ जण लिफ्टच्या सहाय्याने खाणीत उतरले. कामाची पाहणी केल्यानंतर वर येत असताना अचानक लिफ्टची साखळी तुटली. त्यामुळे सर्वजण लिफ्टसहित खोल खाणीत कोसळले.

या दुर्घटनेचे वृत्त समजताच सर्वत्र घबराट पसरली. याची माहिती तातडीने स्थानिक प्रशासनाला देण्यात आली. यानंतर मदत आणि बचाव कार्य सुरू झाले. १० तासांहून अधिक काळ बचावकार्य सुरू आहे. आतापर्यंत १५ पैकी तीन जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आलंय. बचावकार्याचं काम अंतिम टप्प्यात आलं असून लवकरच सर्वांना बाहेर काढण्यात येणार आहे.

Rajasthan Breaking News
Delhi Fire News: दिल्लीतील आयकर विभागाच्या कार्यालयाला भीषण आग, अग्निशमन दलाच्या 21 गाड्या घटनास्थळी दाखल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com