Dhananjay Munde Saam tv
महाराष्ट्र

Anil Gote : आमदार रावल यांच्यावर धनंजय मुंडेंचा दबाव; माजी आमदाराच्या दाव्याने खळबळ

Bharat Jadhav

भूषण अहिरे, साम प्रतिनिधी

आजी-माजी गृहमंत्री यांच्यामध्ये सध्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू असतानाच माजी पोलीस अधिकारी परमबीर सिंह यांनी एका मुलाखतीत केलेल्या धक्कादायक खुलासामुळे राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघाले. माजी आमदार अनिल गोटे यांनी त्यांच्यावर लावण्यात आलेले आरोप फेटाळत उलट सध्या सत्तेत असलेल्या मंत्री धनंजय मुंडे यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री असताना आताच्या सत्ताधारी पक्षाचे आमदार जयकुमार रावल यांच्याबाबत तक्रार केली असल्याचा खुलासा केलाय.

माजी आमदार अनिल गोटे यांनी अनिल देशमुख हे गृहमंत्री असताना त्यांच्यावर दबाव आणला. आमदार जयकुमार रावल आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना आत टाकण्यासाठी दबाव आणला होता, असा धक्कादायक खुलासा परमवीर सिंह यांनी केला होता. त्यांच्यानंतर माजी आमदार अनिल गोटे यांनी परमवीर सिंह हे खोटं बोलत आहेत. आपण दबाव तंत्र न वापरता तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे रीतसर तक्रार केली होती. आपणच नव्हे तर सध्या देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सत्तेत असलेले मंत्री धनंजय मुंडे यांनीदेखील जयकुमार रावल यांच्याविरोधात तक्रार केली होती. असा आणखी खळबळजनक खुलासा गोटे यांनी केलाय.

आपण तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडेच नव्हेतर त्यावेळचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे रावल यांनी घोटाळा केल्याची तक्रार केली होती. जयकुमार रावल यांनी सारंखेडा फेस्टिवलमध्ये ३२० कोटी रुपयांचा घोटाळा केला असल्याची तक्रार केली होती, असे गोटे म्हणाले. गोटे यांनी परमवीर सिंह हे भोगोडे असून त्यांच्यावर फक्त त्यांचे चमचे, दलाल, सुपारी बहाद्दर गद्दारच विश्वास ठेवू शकता, अशी भावना व्यक्त केलीय.

यावर ज्यांच्यावर आरोप झालेले आहेत ते आमदार जयकुमार रावल यांनी देखील यावर बोलतांना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडी सरकारमध्ये प्रतिस्पर्धी उमेदवाराला पराजित करता येत नसेल तर त्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याच षडयंत्र करण्यात येत होतं. परंतु सुदैवाने आपल्या मतदारसंघातील जनतेच्या आशीर्वादामुळे आपण यातून बचावलो असे मत रावल यांनी व्यक्त केले .

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jasprit Bumrah: नाद करा पण बुमराहचा कुठं.. चेंडू सोडण्याच्या प्रयत्नात बांगलादेशी फलंदाजाची दांडी गुल- VIDEO

Smell Free Shoes Tips : बुटांचा खराब वास येत आहे? या टिप्सने दुर्गंधी होईल मिनिटांत छुमंतर

Sanjay Raut Video : मुख्यमंत्रीपदावरून मविआमध्ये वाद? राऊत काँग्रेसवर भडकले !

PM Vishwakarma Yojana: वर्षभरात ६ लाख लाभार्थी, २ कोटींपेक्षा जास्त लोकांनी केलेय रजिस्ट्रेशन, योजनेचा कसा घ्याल लाभ?

Maharashtra News Live Updates: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील वाद चव्हाट्यावर

SCROLL FOR NEXT