Maharashtra Politics: हा मोर्चा धारावीकरांचा नाही, तर.... , मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल

Maharashtra Politics: उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वात शिवसेनेने ( उद्धव बाळासाहेब ठाकरे )काढलेल्या मोर्चावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ज्या लोकांना धारावीचा विकास नको आहे त्या लोकांनी हा मोर्चा काढला आहे. त्यांना जनता जशाच तसं उत्तर देईल, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता केली आहे.
Maharashtra Politics
Maharashtra PoliticsSaam Tv
Published On

Maharashtra Politics

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वात शिवसेनेने ( उद्धव बाळासाहेब ठाकरे )काढलेल्या मोर्चावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. धारावीच्या मोर्चात संपूर्ण महाराष्ट्रातून लोक बोलावले असून धारावीमधील लोक कमी आहेत. ज्या लोकांना धारावीचा विकास नको आहे त्या लोकांनी हा मोर्चा काढला आहे. त्यांना जनता जशाच तसं उत्तर देईल, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता केली आहे.

जे अहंकारी घमंडी आहेत त्यांना जमिनीवर आणण्यासाठी शिव पुराण महत्त्वाचं आहे. मी आज आजही कार्यकर्ता आहे. लोकांच्या अडचणी मी समजून घेतो. शेतकाऱ्यांच्या पाठीशी आहे. त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. शेतकऱ्यांसाठी चांगले निर्णय घेण्याचं काम मी करत असल्याचं ते म्हणाले.

मला विश्वास आहे हनुमानाच्या 111 फुटाच्या मूर्तीचं दर्शन लवकर होईल. हे स्थान नावारूपाला येईल. ज्यांनी एका भगिनील जेलमध्ये टाकलं त्यांच सरकार मी बदललं. तसेच 22 तारखेला अयोध्येला जायच आहे.तारीख सांगून मोदी यांनी मंदिर बनवलं. कितीही संकट आली तरी हननुमान शक्तिमान आहे म्हणून आपलं सरकार आलं. खासदार श्रीकांत शिंदे यांनी संसदेत हनुमान चालीसा म्हणून दाखवली हे आमचे हिंदुत्व आहे हे आमची हनुमान भक्ती आहे.

Maharashtra Politics
Ethanol Production: ..म्हणून केंद्राने इथेनॉल निर्मितीवर बंदी घातली होती, देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं कारण

अहंकारी लोकांना जमिनीवर आणण्यासाठी शिवपुराण कथेची गरज आहे. सामान्य घरातून मी मुख्यमंत्री झालेलो आहे त्यामुळे सर्व सामान्य माणसाचे शेतकरी कष्टकरांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करतो. शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या माध्यमातून थेट सामान्य जनतेला न्याय देण्याचे काम आमचे सरकार करते, असं ते म्हणाले

Maharashtra Politics
Kalyan Politics News: 'हमने हत्यार कब के फेक दिये ,लेकीन चलाना भुले नही है', गुंडगिरी करणाऱ्यांना शिवसेना नेत्याचा सज्जड दम

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com