मेहनत करत नाहीत, गरीबांना त्रास देतात,गुंडगिरी करून पैसे उकळतात. अशा लोकांना तुम जीस स्कूल मे पढते हो उस स्कूल के हम हेडमास्टर है. हमने हत्यार कब के फेक दिये है. लेकीन चलाना भुले नही है. त्यामुळे येत्या काळात तुम्हाला या सगळ्या गोष्टीचं उत्तर मिळेल, असा सज्जड दम शिवसेना शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी एपीएमसी मार्केटमध्ये गुंडगिरी करून विक्रेत्यांकडून पैसे वसूल करणाऱ्यांना दिला आहे. एपीएमसी मार्केट मधील युनियनच्या उदघाटन प्रसंगी शहरप्रमुख गायकवाड यांनी केलेल्या भाषणाचा व्हिडियो सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
एपीएमसीमधील व्यापाऱ्यांना काही लोक जाणीवपूर्वक त्रास देऊन पैसे वसूल करत असतात. त्याला एपीएमसी प्रशासनाचा पाठिंबा असल्याचा आरोप व्यापाऱ्यांकडून करण्यात येतोय. कल्याणमधील एपीएमसी मार्केटमध्ये फूल मार्केट आहे. या फूल मार्केटमध्ये फूलविक्रेते महापालिकेचे भाडेकरू आहेत. हे फूल विक्रेते महापालिकेस भाडे भरतात. फूल विक्रेते महापालिकेस भाडे भरून देखील काही लोक त्यांना त्रास देऊन त्यांच्याकडून जबरदस्ताने पैसे वसूली करतात. हा सर्व प्रकार थांबविण्याकरीता कल्याणमधील काही फूल विक्रेत्यासह अन्य व्यापाऱ्यांनी एका युनियनची स्थापना केली.
जयहिंद कल्याण फूल मार्केट व्यापारी संघटना असे या युनियनचे नाव आहे. या युनियनच्या उद्घाटनप्रसंगी कल्याण पूर्व शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड, एपीएमसी संचालक आणि माजीनगरसेवक मयूर पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी महेश गायकवाड यांनी फूल मार्केटमध्ये व्यापाऱ्याकडून पैसे वसूल करणाऱ्यांची यापुढे दादागिरी खपवून घेतला जाणार नाही, असा सज्जड दम दिला आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.