Fadnavis On Maratha Reservation: मराठा आरक्षणाला सर्वात जास्त विरोध शरद पवारांनीच केला, देवेंद्र फडणवींसाचा आरोप

Fadnavis On Maratha Reservation: मराठा आरक्षणाला सर्वात जास्त विरोध हा शरद पवार यांनी केला आहे. मराठा आरक्षणाशिवाय दुसरे प्रश्न नाहीत का असं बोलणाऱ्या सुप्रिया ताई, त्यांना आरक्षण द्यायचं नव्हतं. त्यांना समाजाला झुंजत ठेवायचं होत. असा गंभीर आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
Fadnavis On Maratha Reservation Fadnavis
Fadnavis On Maratha Reservation FadnavisSaam Digital
Published On

Fadnavis On Maratha Reservation

मराठा आरक्षणाला सर्वात जास्त विरोध हा शरद पवार यांनी केला आहे. मराठा आरक्षणाशिवाय दुसरे प्रश्न नाहीत का असं बोलणाऱ्या सुप्रिया ताई, त्यांना आरक्षण द्यायचं नव्हतं. त्यांना समाजाला झुंजत ठेवायचं होत. उद्धव ठाकरे जेव्हा आरक्षणाविषयी बोलतात. आपण उच्च न्यायालयात आरक्षण टिकवले, मात्र त्यांचं सरकार आलं आणि सर्वोच्च न्यायालयात आरक्षण गेलं. मंडल आयोगाला विरोध करणारे उद्धव ठाकरे होते. भुजबळ का बाहेर पडले होते? कारण त्यावेळी तुम्ही मंडल आयोगाला विरोध केला होता. असा गंभीर आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

आरक्षणाबाबत आपली भूमिका पक्की आहे. मराठा समाजाला टिकणारं आरक्षण मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नातून आम्ही देणार आहोत. कोणत्याही परिस्थितीत ओबीसीच्या आरक्षणाला आम्ही धक्का लागू देणार नाही. ही आमची कमिटमेंट आहे. कार्यकर्त्यांमध्ये जातीचे गट तयार होऊ देऊ नका. ओबीसी व मराठा समाजाच्या मनात तेवढीच कमिटमेंट हवी. मराठा समाजाला आम्ही न्याय देणार आहोत, पण ओबीसीवर अन्याय होऊ द्यायचा नाही, असं आश्वासन देताना विभाजनाचं लोण पसरू देऊ नका, असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

विरोधक डँमेजिंग मानसिकतेत

तीन राज्यांच्या निवडणुका हल्यामुळे विरोधक डँमेजिंग मानसिकतेत गेले आहेत. आपण जेव्हा विरोधक होतो तेव्हा विकासाचे विरोधक नव्हतो. देशाची हानी होईल असं आपण कधीच वागलो नाही. पण दुर्देवाने विरोधक ज्या मानसिकतेत गेले आहेत त्यांना देशाची चिंता नाही. एक एनर्टिक्स भूमिकेत गेले आहेत. रोज भूमिका बदलत आहेत. उद्धव ठाकरे यांची सेना, शरद पवार यांची राष्ट्रवादी , आणि काँग्रेस यांना देशाची समाजाची चिंता नाही, अशी टीका फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर केली आहे.

Fadnavis On Maratha Reservation Fadnavis
Ethanol Production: इथेनॉल निर्मिती बंदीचा निर्णय अखेर मागे; शेतकरी, कारखानदारांना मोठा दिलासा

सरकारमधील तीन पक्ष म्हणजे आपणच आहोत

सरकारमधील तीन पक्ष म्हणजे आपणच आहोत, त्यामुळे पुढचे नऊ दहा महिने आपला पूर्ण वेळ पक्षाकरिता आणि पक्षाच्या कामाकरिता द्यायला हवा.कोणतीही निवडणूक असो आपण निवडणुका एकत्र लढणार आहोत. जागांची काळजी करू नका तुमच्या मनात आहेत तेवढ्या जागा आपल्याला मिळाणार आहेत आणि इतर ठिकाणी जो निवडुन येणार तो मोदींजींसाठीच हात वर करणार आहे.

१२ बलुतेदारांचा विचार मोदींनी केला

१२ बलुतेदार यांचा विचार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. त्यांच हित हे सेंट्रल अजेंड्यावर देशाच्या स्वातंत्र्यनंतर पहिल्यांदा आलं. आज महाराष्ट्रात सामान्य माणसाला मोदीजींच आकर्षण आहे.काही माणसं काहीतरी वेगळ्या गोष्टी पसरवतात. मात्र सामान्य माणसाला वाटतं की जो काही विकास होईल तो मोदींजीमुळे, असा दावा त्यांनी केला आहे.

Fadnavis On Maratha Reservation Fadnavis
Manoj Jarange Patil: 'तुमच्या वाटेचं खावं, माझ्या नादाला लागू नये..' जरांगे पाटलांचा छगन भुजबळांवर पुन्हा हल्लाबोल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com