अजय सोनवणे
मनमाड (नाशिक) : धुळे लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीकडून काँग्रेसने उमेदवार जाहीर करत (Nashik) नाशिकच्या डॉ, शोभा बच्छाव यांना उमेदवारी जाहीर केली. यामुळे धुळे व नाशिकचे पदाधिकारी नाराज झाले असून कॉंग्रेसचे नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉ.तुषार शेवाळे यांनी राजीनामा दिल्यानंतर धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटे (Anil Gote) यांनी मालेगावमध्ये भेट घेतली. (Latest Marathi News)
धुळे (Dhule) मतदारसंघात कॉंग्रेसने डॉ. शोभा बच्छाव यांना उमेदवारी दिली. यामुळे नाराजी व्यक्त करत डॉ. तुषार शेवाळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा (Congress) काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांच्याकडे पाठविला आहे. यानंतर अनिल गोटे हे शेवाळे यांच्या भेटीला आल्याने त्याला महत्व आले आहे. दोघांनी बराचवेळ चर्चा देखील केली.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
विद्यमान खासदार डॉ. सुभाष भामरे (Subhash Bhamre) यांच्या विरोधात मतदार संघात प्रचंड नाराजी असून त्यांचा पराभव करायचा असेल तर डॉ.तुषार शेवाळे हा सक्षम पर्याय आहे. मात्र पक्षश्रेष्ठी कार्यकर्त्याचा विचार न करताच निर्णय घेऊन मनमानी करतात. ती खपवून घेतली जाणार नाही; असे अनिल गोटे यांनी सांगितले. तसेच भाजपचा पराभव करायचा असेल तर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी श्रेयवाद बाजूला ठेवून डॉ.शेवाळे यांच्या उमेदवारीवर एकमत करुन त्यांना बळ द्यावे; असे अनिल गोटे यांनी स्पष्ट केले
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.