Kalyan KDMC Fire News: केडीएमसीच्या बारावे येथील कचरा प्लांटला आग, परिसरात धुराचे साम्राज्य

Kalyan's Barave Waste Plant Catch Fire News : केडीएमसीचा कचरा प्लांट बारावे शिवारात आहे. येथे टाकलेला कचरा दोनदा असल्याने आज दुपारी कचऱ्याने अचानक पेट घेतला.
Fire Caught at KDMC's Waste Plant at Barave
Fire Caught at KDMC's Waste Plant at BaraveSaam tv

अभिजित देशमुख 
कल्याण
:

कल्याण- डोंबिवली महापालिकेच्या बारावे परिसरातील सुका कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या (Kalyan) प्लांटमधील कचऱ्याने आज दुपारच्या सुमारास अचानक पेट घेतला.  कोरडा कचरा असल्याने कचऱ्याने क्षणार्धात आगीने (fire) रौद्र रूप धारण केले. यामुळे प्रचंड धुराचे लोट बाहेर निघत असून परिसरात धुराचे साम्राज्य पसरले आहे. (Maharashtra News)

Fire Caught at KDMC's Waste Plant at Barave
Amalner News : गॅस पेटवताच उडाला भडका; तीन घरांना आग लागून नुकसान 

केडीएमसीचा (KDMC) कचरा प्लांट बारावे शिवारात आहे. येथे टाकलेला कचरा दोनदा असल्याने आज दुपारी कचऱ्याने अचानक पेट घेतला. आग लागल्यामुळे परिसरातून धुराचे मोठे लॉट बाहेर पडत होते. दरम्यान पंधरा दिवसांपूर्वी याच प्लांटवर आग लागली होती. त्यानंतर पुन्हा आज आगीची घटना घडली. सातत्याने घडणाऱ्या या आगीच्या घटनांमुळे नागरिकांनी धसका घेतला असून हे आगीचे प्रकार प्रशासनाने थांबविण्यासाठी तात्काळ उपाययोजना करावी; अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Fire Caught at KDMC's Waste Plant at Barave
Sambhajinagar News : पाणी टंचाईमुळे संभाजीनगर जिल्ह्यात चारा बंदी; जिल्हाधिकारींनी काढले आदेश

अग्निशमनचे तीन बंब दाखल (3 Fire Brigade on Spot)

आगीमुळे परिसरात धुराचे साम्राज्य पसरले होते. आगीची माहिती मिळतात (Fire Brigade) अग्निशमन विभागाच्या तीन गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कोरड्या कचऱ्यामुळे आग झपाट्याने पसरत असून आग विझविण्यास थोडा वेळ लागत आहे. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com