Amalner News : गॅस पेटवताच उडाला भडका; तीन घरांना आग लागून नुकसान 

Jalgaon News : अमळनेर तालुक्यातील करणखेडा येथे बापूराव राजधर धनगर यांच्या पत्नी १० एप्रिलला सकाळी स्वयंपाक करीत होत्या. यावेळी गॅस पेटविताच अचानक आगीचा भडका झाला.
Amalner News
Amalner NewsSaam tv

अमळनेर (जळगाव) : सकाळी घरात स्वयंपाक सुरु असताना अचानक गॅस सिलेंडरमधून गॅस लिकेज झाला. (Jalgaon) यामुळे आगीचा भडका उडून दोन घराणं आग लागल्याची घटना अमळनेर (Amalner) तालुक्यातील करणखेडा या गावात घडली. या आगीत दोन्ही घरातील संसारोपयोगी साहित्य जाळून खाक झाले असून सुदैवाने यात जीवितहानी टळली आहे.  (Live Marathi News)

Amalner News
Dhule Lok Sabha : उत्तर महाराष्ट्रात काँग्रेसला दोन धक्के..नाशिक ग्रामीण, धुळे जिल्हाध्यक्षांचे राजीनामे; लोकसभेसाठी उमेदवार जाहीर झाल्यानंतर नाराजीनाट्य

अमळनेर तालुक्यातील करणखेडा येथे बापूराव राजधर धनगर यांच्या पत्नी १० एप्रिलला सकाळी स्वयंपाक करीत होत्या. यावेळी गॅस (Gas) पेटविताच अचानक आगीचा भडका झाला. आगीचा भडका उडाल्याने त्या लागलीच घराबाहेर पडल्या. त्यांनी आरडाओरड केल्याने आजूबाजूच्या नागरिकांनी धावत येत आग (fire) विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु माती व लाकडाचे घर असल्याने घराने लागलीच पेट घेतला. दम्यान शेजारील घरांना आग लागू नये, म्हणून नागरिक धाब्यावर जाऊन खोदण्यास सुरवात केली. तरीदेखील शेजारील दोन घरांना आग लागली होती. आगीची घटना अग्निशमन दलाला कळविल्याने बंबाद्वारे आग विझविण्यात आली. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Amalner News
Marathwada University : वसतीगृह शुल्कात ६० टक्के वाढ; मराठवाडा विद्यापीठाचा निर्णय, दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांच्या जखमेवर मीठ

दोन कुटुंब उघड्यावर
आग लागलेले दोन्ही घरे माती व लाकडाचे असल्याने संपूर्ण नुकसान झाले आहे. यातील दोन घरांचे संपूर्ण नुकसान झाले आहे. तसेच घरातील धान्य, कपडे व संसारोपयोगी साहित्य जाळून खाक झाले आहे. या मुळे त्यांचा संसार उघड्यावर आला आहे. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही. आगीत तिन्ही घरे मिळून सुमारे तेरा लाखांचे नुकसान झाले. दरम्यान, या आगीत संसारोपयोगी साहित्य जळाल्याने दोन्ही कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com