रामू ढाकणे
एकीकडे दुष्काळी स्थितीमध्ये राज्य मंडळात शुल्क माफीचा निर्णय शासन घेते. मात्र दुसरीकडे (Sambhajinagar) विद्यापीठ प्रशासनाने वस्तीगृहाच्या शुल्कात ६४ टक्के वाढ केल्याने विद्यार्थी हैराण झाले आहेत. त्यामुळे परीक्षा शुल्क माफ करून त्यांना दिलासा देण्याऐवजी शुल्क वाढीचा निर्णय म्हणजे विद्यार्थ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखा आहे. (Latest Maharshtra News)
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ (Marathwada University) आणि सलग्न महाविद्यालयांमध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थी (Student) मोठ्या संख्येने प्रवेश घेतात. त्यांना आधीच शिक्षणाचा खर्च परवडणारा नसतो. अशातच विद्यापीठाने वस्तीगृहाच्या शुल्कात गतवर्षीपेक्षा तब्बल ६४ टक्क्यांनी वाढ करण्याचे ठरविल्याने विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. विद्यापीठ प्रशासनाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यामुले ही रक्कम २ हजार २०० वरून ३ हजार ३०० रुपये होणार आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
यंदा सर्वत्र दुष्काळी (drought) परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे काही दिवसांपूर्वी विद्यापीठ प्रशासनाने दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना शुल्क माफी देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र विद्यापीठाने केलेली ही घोषणा फक्त हवेतच असल्याचं चित्र आता स्पष्ट झाले आहे. उलट शुल्क वाढीचा निर्णय घेऊन विद्यार्थ्यांवर बोजा टाकला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.