Sambhajinagar News : पाणी टंचाईमुळे संभाजीनगर जिल्ह्यात चारा बंदी; जिल्हाधिकारींनी काढले आदेश

Sambhajinagar News : गेल्या काही दिवसापासून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पाणी टंचाईचा प्रश्न हा खूप गंभीर बनला आहे. यंदा कमी पाऊस असल्याने जिल्ह्यातील अनेक लहान मोठे प्रकल्प, विहिरी, बंधारे हे कोरडे ठाक
Sambhajinagar News
Sambhajinagar NewsSaam tv
Published On

रामू ढाकणे 

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात पाणी टंचाईचा गंभीर प्रश्न भेडसावत आहे. (Sambhajinagar) जिल्ह्याच्या भूजल पातळीत देखील घट झाली आहे. जिल्ह्यात पाणी टंचाई भेडसावत असल्याने जिल्ह्यात आता चार बंदीचे आदेश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी काढले आहेत. (Tajya Batmya)

Sambhajinagar News
Marathwada University News: वसतीगृह शुल्कात ६० टक्के वाढ; मराठवाडा विद्यापीठाचा निर्णय, दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांच्या जखमेवर मीठ

गेल्या काही दिवसापासून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पाणी टंचाईचा प्रश्न हा खूप गंभीर बनला आहे. यंदा कमी पाऊस (Rain) असल्याने जिल्ह्यातील अनेक लहान मोठे प्रकल्प, विहिरी, बंधारे हे कोरडे ठाक पडत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. परिणामी जिल्ह्यातील एकूण २७० गावे आणि ४८ वाड्यांना सध्या ४४३ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. (Water Scarcity) पाणी टंचाईसोबत पशु पालकांना चार टंचाईचा प्रश्न देखील भेडसावत आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Sambhajinagar News
Amalner News : गॅस पेटवताच उडाला भडका; तीन घरांना आग लागून नुकसान 

जिल्ह्यात पाण्याबरोबरच चारा टंचाईचे संकट निर्माण होण्याची चिन्हे आहेत. ही बाब लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने जिल्ह्याबाहेर चारा विक्री आणि वाहतुकीला बंदी घातली आहे. दरम्यान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एक लाख ५८ हजार २५१ लहान तर ४ लाख ७४ हजार ७५२ अशी एकूण सहा लाख ३ हजार जनावरे असून त्यांना चाऱ्याची कमतरता भासू नये यासाठी हा निर्णय घेतला. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांकडून जिल्ह्याबाहेर चारा नेण्यास आता बंदी घालण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com