MSRTC Electric Bus : सातपुड्यातील रस्त्यांवरून धावणार इलेक्ट्रिक बस; नंदुरबारच्या चार आगारांना १५० बस

Nandurbar News : राज्य परिवहन महामंडळ सर्व विभागांना इलेक्ट्रिक बस देणार आहे. ग्रामीण भागातील फेऱ्या मारण्यासाठी या बसचा वापर केला जाणार असल्याने महामंडळाची या फायद्याच्याच ठरणार आहेत.
MSRTC Electric Bus
MSRTC Electric BusSaam tv

सागर निकवाडे 

नंदुरबार : राज्य परिवहन महामंडळाकडून राज्यातील सर्व विभागात इलेक्ट्रिक बसगाड्या देण्याचे धोरण स्वीकारण्यात आले आहे. (Electric Bus) राज्यातील सर्व विभागांना टप्प्याप्प्याने या बस पुरविण्यात येणार आहेत. त्यानुसार (Nandurbar) नंदुरबार जिल्ह्यातील चार आगारांना मिळून १५० इलेक्ट्रिक बस देण्यात येणार असून सातपुड्याच्या दुर्गम भागात देखील आता इलेक्ट्रिक बस धावतील. (Breaking Marathi news)

MSRTC Electric Bus
Sambhajinagar News : पाणी टंचाईमुळे संभाजीनगर जिल्ह्यात चारा बंदी; जिल्हाधिकारींनी काढले आदेश

राज्य परिवहन महामंडळ (MSRTC) सर्व विभागांना इलेक्ट्रिक बस देणार आहे. ग्रामीण भागातील फेऱ्या मारण्यासाठी या बसचा वापर केला जाणार असल्याने महामंडळाची या फायद्याच्याच ठरणार आहेत. विशेष म्हणजे शेजारील (Gujrat) गुजरात आणि मध्य प्रदेश राज्याच्या चांगल्या दर्जेदार बस नंदुरबार जिल्ह्यात येत असतात. परंतु महाराष्ट्र महामंडळाच्या बस मोठ्या प्रमाणावर नादुरुस्त आहेत. त्यामुळे प्रवासी दुसऱ्या राज्याच्या बसमध्ये प्रवास करण्यापासून करत असतात. परंतु इलेक्ट्रिक बस येणार असल्याने याच्या फायदा प्रवाशांसोबतच महामंडळाला देखील होणार आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

MSRTC Electric Bus
Kalyan KDMC Fire News: केडीएमसीच्या बारावे येथील कचरा प्लांटला आग, परिसरात धुराचे साम्राज्य

भंगार बसपासून सुटका 

नंदुरबार जिल्हा सातपुड्याच्या दुर्गम रांगांमध्ये बसलेला आहे. जिल्ह्याला इलेक्ट्रिक बस मिळणार असल्याने भंगार बस पासून सुटका मिळणार आहे. नादुरुस्ती बसमुळे प्रवाशांची संख्याही कमी झाली असल्याने महामंडळाला आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. परंतु या ठिकाणी इलेक्ट्रिक बस मिळाल्याने प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com