Dhananjay Munde shares the stage with CM Devendra Fadnavis during an event in Beed, triggering political speculation. Saam Tv
महाराष्ट्र

अजित पवारांच्या 6 बैठकांना दांडी; शहांच्या भेटीनंतर धनंजय मुंडे अन् CM फडणवीस एकाच व्यासपीठावर, चर्चांना उधाण

Dhananjay Munde Absent From Ajit Pawar Beed Meetings : अजित पवारांच्या बीडमधील सभांना धनंजय मुंडेंची वारंवार गैरहजेरी, अमित शाह भेटीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत एकाच व्यासपीठावर उपस्थितीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

Omkar Sonawane

योगेश काशीद, साम टीव्ही

बीड येथील श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडावरती संत वामनभाऊ महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्याच्या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होत आहे. यावेळी मंत्री पंकजा मुंडे आणि माजी मंत्री धनंजय मुंडे कार्यक्रमास उपस्थित आहेत. धनंजय मुंडे हे राष्ट्रवादीमध्ये अस्वस्थ आहेत. त्यांच्याच पक्षातील बीड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी त्यांच्या विरोधात भूमिका घेत असून ते जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या परळी सोडता कुठल्या कार्यक्रमास उपस्थित राहत नाहीत.

मात्र आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमास त्यांनी हजेरी लावल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बीड जिल्ह्यात सहा सभा झाल्या या एकाही सभेला धनंजय मुंडे हजर नव्हते. वर्षाच्या पहिल्याच दिवशी 1 जानेवारी रोजी बीडमध्ये अजित पवारांची सभा झाली. त्या सभेला धनंजय मुंडे हे कौटुंबिक कारण देत आपण बाहेरगावी आहोत असे सांगितले आणि गैरहजर राहिली.

मात्र, ते धनंजय मुंडेंनी दुसऱ्या दिवशी बीड जिल्ह्यामध्ये कार्यक्रम घेतले आणि आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीड जिल्ह्याच्या दाैऱ्यावर असून त्यांच्या स्वागतासाठी ते दिसून आले. त्यामुळे धनंजय मुंडे राष्ट्रवादीमध्ये अस्वस्थ असल्याचे सांगितले जात आहे.

दिवंगत संतोष देशमुख हत्येनंतर मुंडे यांचा निकटवर्तिय वाल्मीक कराड हा मुख्या आरोपच्या अंतर्गत अद्यापही कारावासात आहे. या प्रकरणामुळे धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. यानंतर मुंडे यांनी सार्वजनिक कार्यक्रमात जाण्यास टाळले. अजित पवार हे अनेकवेळा बीड दौऱ्यावर असता. तेव्हा मुंडे यांची अनुपस्थिती दिसून आली. तसेच काही दिवसपूर्वी मुंडे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची देखील भेट घेतली होती. यामुळे येणाऱ्या काही दिवसात मुंडे यांची भूमिका पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Special Hairstyle: पार्टी, फंशन किंवा लग्नासाठी साडीवर करा 'या' सोप्या आणि सुंदर हेअरस्टाईल

Viral Video : हॉटेल रूमसाठी ऑनलाइन बुकिंग करताना चुकीची लिंक क्लिक झाली; तरुणीसोबत असं काही घडलं की ढसाढसा रडली, पाहा VIDEO

Maharashtra Live News Update : बुरखा घालून येणार्या महिला मतदारांना ओळखण्यासाठी 'पडदानशिन' महिला कर्मचार्याची नियुक्ती होणार

Crime News : लग्नाचं आमिष दाखवून 25 वर्षीय तरुणीवर अत्याचार; बीड पोलिसाचं हादरवणारं कृत्य

धक्कादायक! बायकोचे बॉयफ्रेंडशी प्रेमसंबंध उघड; संतापलेल्या नवऱ्याकडून पोलीस स्टेशनमध्येच पत्नीची गोळ्या झाडून हत्या

SCROLL FOR NEXT