धनुभाऊंच्या विरोधकांना दादांचा आशीर्वाद? धनंजय मुंडे- अजित पवारांमध्ये बिनसलं?

Beed Politics Heats Up: नववर्षात अजित पवारांनी धनंजय मुंडेंच्या विरोधकांना ताकद द्यायला सुरुवात केल्याची चर्चा रंगलीय.. मात्र असं नेमकं काय घडलं... ज्यामुळे धनंजय मुंडेंच्या विरोधकांना दादांचा आशीर्वाद असल्याची चर्चा रंगली...
Ajit Pawar seen traveling with Beed MP Bajrang Sonwane, fueling speculation of political shifts against Dhananjay Munde.
Ajit Pawar seen traveling with Beed MP Bajrang Sonwane, fueling speculation of political shifts against Dhananjay Munde.saam tv
Published On

अजित पवारांसोबत हेलिकॉप्टरमधून प्रवास करणारे हे आहेत बीडमधील धनंजय मुंडेंच्या साम्राज्याला आव्हान देणारे पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार बजरंग सोनवणे...देवदर्शनाचं कारण देत अजित पवारांच्या बीड दौऱ्याला धनंजय मुंडेंनी दांडी मारली.. त्यानंतर अजित पवारांनी थेट मुंडेंच्या विरोधकांसोबत प्रवास केल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलंय...हे कमी होतं की काय... पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांनीही पुण्यात अजित पवारांची भेट घेतलीय...

खरंतर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराडचं नाव आल्यानंतर धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला... त्यानंतर संदीप क्षीरसागर, बजरंग सोनवणे आणि सुरेश धसांनी मुंडेंविरोधात घोटाळ्यांच्या आरोपांची मालिकाच सुरु केली... या काळात मुंडे विजनवासात गेले.. मात्र आता धनंजय मुंडे बीडच्या राजकारणात सक्रीय झाले आहेत...याच दरम्यान अजित पवारांनी मुंडेमध्ये बिनसल्याची चर्चा रंगलीय... त्याची काय कारणं असू शकतात...

पक्षांतर्गत विरोधक भुजबळांच्या मेळाव्याला धनंजय मुंडेंची हजेरी

कोकाटेंच्या राजीनाम्यानंतर दादांना डावलून मंत्रिपदासाठी दिल्लीत शाहांची भेट

नववर्षानिमित्त दादांच्या बीड दौऱ्याकडे मुंडेंची पाठ

खरंतर मुंडेंना मंत्रिपद दिल्यास बीडमध्ये उपोषण करण्याचा इशारा सुप्रिया सुळेंनी दिला होता... त्यानंतर अनेक महापालिकांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या आहेत.. त्यामुळे सुप्रिया सुळेंच्या निशाण्यावर असलेल्या धनंजय मुंडेंच्या विरोधकांना बळ देऊन अजित पवार मुंडेंपुढे बीड जिल्ह्यातच मोठं आव्हान उभं करुन कोंडी करणार का? याकडे राज्याचं लक्ष लागलंय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com